agriculture stories in marathi grapes advice by Dr. Somkuwar, Dr. ajaykumar Upadhyay | Agrowon

सतत पाऊस, ओलावा स्थितीत अन्नद्रव्यांची पूर्तता महत्त्वाची

डॉ. अजयकुमार उपाध्याय, डॉ. आर. जी. सोमकुंवर
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

द्राक्ष लागवडीखालील क्षेत्रामध्ये अजूनही पाऊस सुरू असल्याचे चित्र आहे. बागेत परतीची पाऊस वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेतील बागांसाठी हानिकारक ठरत आहे. सध्याच्या परिस्थितीत बागेत प्रीब्लूम अवस्था ते मणी सेटिंगची अवस्था दिसून येते. या व्यतिरिक्त काही बागेत फळछाटणी ही नुकतीच झाली किंवा आता डोळे फुटत असलेली परिस्थिती आहे. अशा बागेत या वेळी येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती घेऊ.

द्राक्ष लागवडीखालील क्षेत्रामध्ये अजूनही पाऊस सुरू असल्याचे चित्र आहे. बागेत परतीची पाऊस वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेतील बागांसाठी हानिकारक ठरत आहे. सध्याच्या परिस्थितीत बागेत प्रीब्लूम अवस्था ते मणी सेटिंगची अवस्था दिसून येते. या व्यतिरिक्त काही बागेत फळछाटणी ही नुकतीच झाली किंवा आता डोळे फुटत असलेली परिस्थिती आहे. अशा बागेत या वेळी येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती घेऊ.

१) शेंडा वाढ, गळकूज होणे ः
प्रत्येक बागेत सतत होत असलेल्या पावसामुळे वेलीवर सध्या वाढ जोरात सुरू आहे. बागेतील सतत वाढत असलेल्या आर्द्रतेमुळे फक्त शेंडावाढ होत नसून, बगलफुटीसुद्धा जोमात होत आहे. यामुळे कॅनोपीमध्ये गर्दी वाढून दमट वातावरण तयार झालेले दिसून येईल. यामुळे दोडा अवस्थेतील द्राक्ष घडांची गळ होताना दिसून येईल. हे टाळण्याकरिता बागेत शेंडापिंचिंग करणे, बगलफुटी काढणे, व पालाशची पूर्तता फवारणीद्वारे करणे गरजेचे आहे. याच सोबत गळ होण्यापासून संरक्षण करण्यासाठी सायटोकायनीनयुक्त संजीवकांची फवारणी (०.७५ ते १ मि.लि. प्रति लिटर पाणी) करावी. बागेतील वाढीचा जोम कमी करण्यासाठी पालाशची पूर्तता करणे आवश्यक आहे.

२) अन्नद्रव्य व्यवस्थापन ः
सध्या प्रत्येक ठिकाणी बागेत वेलीवरील पाने पिवळी पडलेली दिसून येतील. पाने फक्त पिवळी झालेली नसून, पातळ आणि अशक्तही दिसत आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी जमिनीतून खतांचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, जमीन ओली असल्याच्या स्थितीमध्ये खतांचा वापर फायद्याचा नसेल. जमिनीला वाफसा येत नाही, तोपर्यंत जमिनीतून खतांचा पुरवठा टाळावा. त्यापेक्षा फवारणीच्या माध्यमातून खतांचा पुरवठा करावा. या वेळी पाने पिवळी व अशक्त असल्यामुळे कमी प्रमाणात पण कमी काळात जास्त फवारणीद्वारे (अधिक वारंवारितेने) खते देणे फायद्याचे असेल.

  • द्राक्षबागेत मणी सेंटिंगपर्यंत नत्राचा वापर करण्याचे टाळावे. वाफसा परिस्थिती तयार झाल्यानंतर फक्त जमिनीतून खतांचा वापर करावा. वेलीच्या वाढीनुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये (फेरस, मॅग्नेशिअम व झिंक) आणि मुख्य अन्नद्रव्ये (नत्र, स्फुरद, पालाश) द्यावीत.
  • ज्या बागेत पाने पिवळी पडलेली आहेत, अशा बागेमध्ये जर पूर्ण कॅनोपी असल्यास मॅग्नेशिअमची आवश्यकता असेल. याच कॅनोपीमध्ये युरिया १ ग्रॅम अधिक झिंक सल्फेट ०.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
  • यानंतर मॅग्नेशिअम सल्फेट ३ ग्रॅम अधिक फेरस सल्फेट २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. ही फवारणी करण्यापूर्वी फवारणी पाण्याचा सामू हा अॅसिडिक (म्हणजेच ५.५ ते ६ पीएच) असावा. पाण्याचा हा सामू मिळवण्यासाठी सायट्रिक ॲसिडचा वापर करता येईल.
  • मण्यांचा विकास होत असलेल्या अवस्थेमध्ये (मणी सेटिंग ते ८ मि.मी.) कॅल्शिअमची पूर्तता करावी. कॅल्शिअम नायट्रेट किंवा कॅल्शिअम क्लोराईड २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी किंवा कॅल्शिअम इसेंस ०.७५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६०६०
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)


इतर फळबाग
उन्हाळ्यातील केळी बागेचे व्यवस्थापनउष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी...
नियोजन संत्रा बाग लागवडीचे..हलक्‍या जमिनीत निचरा चांगला होतो. मात्र या...
असे करा द्राक्षबागेतील स्ट्रोमॅशिअम...खोडकिडीचे प्रौढ भुंगेरे साधारणतः मान्सूनपूर्व,...
दर्जेदार पेरू, सीताफळाच्या उत्पादनावर भरमाझ्याकडे पेरू आणि सीताफळाची लागवड आहे. पेरूच्या...
गावोगावी फिरून विकली पंधरा टन द्राक्ष कोरोनामुळे बाजार समित्या बंद झाल्या, व्यापारीही...
जास्तीच्या ओलाव्यामुळे येणाऱ्या ...गेल्या आठवड्यात बऱ्याच भागात पाऊस झाला व काही...
केळी पीलबागेचे व्यवस्थापन, खर्च कमी... माझी काळी कसदार दहा एकर शेती आहे. दोन...
आरोग्यदायी कलिंगडकलिंगडात जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असून...
थेट ग्राहकांना विकली २० टन द्राक्ष   बागेत द्राक्ष घड काढणीला आले आणि कोरोनाचे...
‘हापूस'च्या नऊ हजार पेट्यांची ...हंगाम तोंडावर आला असतानाच कोरोनाने देशभरात पाय...
सीताफळातून लाभले आर्थिक स्थैर्यपांगारे (ता.पुरंदर,जि.पुणे) येथील प्रयोगशील...
लिंबूवर्गीय फळपीक सल्लाशेतीमध्ये काम करण्याची परवानगी असली तरी ते काम...
डाळिंब सल्लामृग बहार / अर्ली मृग बहार (जून - जुलै...
फळझाडांचे आच्छादन, ठिंबक सिंचन महत्वाचेउन्हाळ्यात फळबागांना पाण्याची टंचाई जाणवते. अशा...
संत्रा पिकाची पाने पिवळी पडण्याची कारणे...संत्रा बागेत पाने पिवळी पडण्याची समस्या अनेक...
द्राक्षबागेतील अवस्थांनुसार व्यवस्थापनसध्याच्या काळात बागेतील घडांच्या स्थितीनुसार...
असे करा दर्जेदार चिकू उत्पादनाचे नियोजनचिकू फळांना योग्य दर मिळण्यासाठी योग्य आकार व...
द्राक्षबागेतील वेगवेगळ्या अवस्थांनुसार...सध्याच्या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेत वेगवेगळ्या...
अवकाळी पावसानंतर लिंबूवर्गीय फळबागेचे...स ध्या अनेक जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह...
बागेमध्येच उपलब्ध मण्यांपासून बेदाणे...सध्या वेलीवरील द्राक्ष मण्यांचे बेदाणे करण्याची...