agriculture stories in marathi grapes advice for fertilizer management by Dr. Somkuwar | Agrowon

द्राक्षबागेमध्ये खतांचे व्यवस्थापन

डॉ. आर. जी. सोमकुंवर 
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

द्राक्ष विभागामध्ये सध्या दिवसाचे तापमान वाढत असून, रात्रीचे तापमान कमी होत आहे. या वातावरणाचा द्राक्षबागेमध्ये असलेल्या वाढीच्या विविध अवस्थांवर होणारा नेमका परिणाम आणि विपरीत परिणाम टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यांची माहिती घेऊ.

जुनी बाग ः
जुन्या बागांमध्ये झालेल्या सतता आणि जास्त पावसामुळे होणाऱ्या पाण्याच्या निचऱ्यासोबत बोदामधील मुळांच्या कक्षेमध्ये असलेल्या अन्नद्रव्यांचे वहन झाले. याला इंग्रजीमध्ये लिचिंग असे म्हटले जाते. संपूर्ण हंगामासाठी असलेल्या शिफारशीप्रमाणे किंवा आपल्या अनुभवानुसार बागेमध्ये अन्नद्रव्यांचा वापर केला असला, तरी तो त्याच हंगामामध्ये संपूर्णपणे वापरला जाईल, असे नाही. त्याला अनेक कारणे जबाबदार असतात. उदा. वेलीची मुळे किती सक्षम आहेत. बोदामध्ये पाणी किती उपलब्ध झाले, बागेतील तापमान किती आहे, अशा अनेक घटकांचा वापर अन्नद्रव्यांच्या वापरावर परिणाम होत असतो. मात्र, या वर्षीच्या अतिपावसाच्या स्थितीमुळे अन्नद्रव्ये मुलाच्या कक्षेबाहेर निघून गेल्याचे दिसते. परिणामी, अनेक बागांमध्ये द्राक्षवेलीवर अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसून येत आहेत. त्यामध्ये वेलीची पाने पिवळी पडणे, पाने पातळ होणे, पानांच्या शिरा हिरव्या राहून मध्य भाग पिवळा पडणे, पानांचा आकार कमी राहणे, शेंडावाढ थांबणे इ. समस्या दिसून येत आहे. अशक्त असलेली वेल ही रोगास व किडीच्या प्रादुर्भावास लवकर बळी पडताना दिसत आहे.

उपाययोजना ः

  • पानांमध्ये मुख्यतः मॅग्नेशिअम, फेरस व झिंक यांची कमरता दिसून येतात. ज्या बागेमध्ये फुलोरा अवस्था आहे, अशा बागेतील घडाच्या विरुद्ध पान काढून देठ गोळा करावेत. एक एकर क्षेत्रातून सुमारे १०० ते १२० देठ गोळा करून देठ परीक्षणासाठी पाठवावेत.
  • ज्या बागा फुलोरा अवस्थेच्या पुढील अवस्थेमध्ये आहेत किंवा १० ते १५ दिवस होऊन गेले आहेत, अशा बागेमध्ये घडाच्या पुढील पान निवडावे. त्याची तपासणी करून घ्यावी. यामुळे बागेत नेमक्या कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, हे स्पष्ट होईल.
  • साधारण परिस्थितीमध्ये बागेत फेरस सल्फेट २.५ ते ३ ग्रॅम, मॅग्नेशिअम सल्फेट ३ ते ३.५ ग्रॅम व झिंक सल्फेट १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे एक ते दोन फवारण्या महत्त्वाच्या असतील. ज्या बागेत पाने फक्त पिवळी दिसतात व शेंडा थांबला आहे, अशा बागेत नत्राची कमतरता असू शकते. अशा बागेमध्ये नत्राची पूर्तता जमिनीद्वारे करावी.

मुळांचा विकास महत्त्वाचा ः

वेलीस जमिनीतून केलेल्या अन्नद्रव्याची पूर्तता होण्यासाठी मुळे पूर्णपणे कार्यक्षम असणे गरजेचे आहे. ज्या बागेमध्ये बोदात पाणी जास्त काळ टिकून राहिल्यामुळे मुळांनी काम करणे बंद केले आहे किंवा मुळांची कार्य करण्याची क्षमता कमी झाली आहे, तिथे अन्नद्रव्ये जमिनीतून उपलब्ध करूनही फायदा होणार नाही. बोदामध्ये मुळे योग्य रीतीने कार्यरत होण्यासाठी बागेमध्ये वाफसा येणे आवश्यक आहे. त्यासाठी बोद थोडेफार मोकळे करावेत. त्यासाठी बोदाच्या बाजूने नांगर किंवा अन्य अवजाराने लहान चारीही घेता येईल. यामुळे सुमारे २ ते ३ टक्के मुळे तुटतील. परंतु, त्यानंतर १० ते १२ टक्के नवी पांढरी मुळे पुन्हा तयार होतील. अन्नद्रव्याचा पुरवठा वेलीला वाढण्यास मदत होईल.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६०६०
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)


इतर फळबाग
सिट्रस सायला, पाने पोखरणारी अळीचे...सद्यःस्थितीत संत्रा व मोसंबीच्या फळबागांना नवीन...
शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढतोय,...शंखी गोगलगाय किंवा शेंबी हे मृदकाय वर्गातील सजीव...
लिंबूवर्गीय फळपिकावरील पाने खाणाऱ्या...सद्यस्थितीत लिंबूवर्गीय फळबागेमध्ये नवीन नवती...
‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...
व्यवस्थापन मोसंबी बहराचेसध्याच्या वातावरणात मोसंबीच्या आंबे बहराच्या...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
पावसाळी स्थितीतील द्राक्षबागेचे नियोजनगेल्या आठवड्यापासून सर्वच भागात पावसाची नोंद झाली...
प्रयोगशील शेतीतून पीक बदलनोकरीच्या निमित्ताने संजय साळवे यांना गाव सोडावे...
केळी पिकातील खत नियोजनप्रति झाड २०० ग्रॅम नत्र, ६० ग्रॅम स्फुरद व २००...
पावसाळी वातावरणातील द्राक्षबागेतील...गेल्या आठवड्यात ठिकठिकाणी पाऊस झाला, तर काही...
आरोग्यदायी फणसवरून काटेरी पण आतून गोड.. असे म्हटले की फणस हे फळ...
पावसाळी वातावरणातील द्राक्षबागेचे...गेल्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे....
डाळिंबातील बुरशीजन्य मररोगाचे व्यवस्थापनडाळिंब बागेमध्ये सूत्रकृमी, वाळवी, शॉर्ट होल बोरर...
डाळिंब पिकातील बहारनिहाय नियोजनमृगबहार अ) अन्नद्रव्य व्यवस्थापन फळबागेची...
तंत्र करवंद लागवडीचेकरवंदाच्या भरपूर जाती आढळतात. डॉ. बाळासाहेब सावंत...
उशिरा खरड छाटणीच्या बागेतील सूक्ष्मघड...सध्याचे वातावरण ः सध्या द्राक्ष विभागामध्ये...
सुधारित तंत्राने शेवगा लागवडशेवग्याची लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील...
वेलीचा वाढता जोम नियंत्रणात ठेवण्याकडे...द्राक्षबागेत गेल्या दोन दिवसापासून वातावरण...
आधुनिक पद्धतीने करा संत्रा लागवडविशिष्ट अशी आंबट गोड चवीबरोबर प्रतिकारशक्ती...
उन्हाळ्यातील केळी बागेचे व्यवस्थापनउष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी...