agriculture stories in marathi Grapes advice, It is time to take Re cut | Agrowon

नवीन द्राक्ष बागेमध्ये रिकट घेण्याचा काळ

विलास घुले, डॉ. आर. जी. सोमकुंवर
गुरुवार, 16 जानेवारी 2020

सध्या वातावरण कमी होत असून, काही ठिकाणी ढगाळ वातावरणही दिसून येत आहे. या वातावरणाचे सध्या द्राक्ष बागेमध्ये असलेल्या विविध स्थितीवर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना यांची माहिती घेऊ.

१) नवीन कलम केलेली बाग

सध्या वातावरण कमी होत असून, काही ठिकाणी ढगाळ वातावरणही दिसून येत आहे. या वातावरणाचे सध्या द्राक्ष बागेमध्ये असलेल्या विविध स्थितीवर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना यांची माहिती घेऊ.

१) नवीन कलम केलेली बाग

या बागेमध्ये रिकट घेण्याचा कालावधी जवळ येत आहे. रिकट हा साधारणतः जानेवारी-फेब्रुवारी या कालावधीमध्ये घेतला जातो. अशा वेळी बागेतील किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या पुढे वाढण्यास सुरुवात होते. परिणामी रिकट नंतर फूट एकसारखी आणि लवकर निघण्यास मदत होते. रिकट घेण्यापूर्वी कलम जोडाच्या वर ६ ते ७ पेरे परिपक्व असल्यास नवीन निघणाऱ्या फुटींवर चांगले परिणाम दिसून येतात. ज्या बागेत ही परिस्थिती उपलब्ध नाही, अशा ठिकाणी रिकट थोडा उशिरा घ्यावा. या पू्र्वी वेलीवर पोटॅशिअम सल्फेट (०-०-५०) ची ४ ते ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे २ ते ३ फवारण्या घ्याव्यात. फुटींचा शेंडा वाढत असल्यास शेंडा पिचिंग करून घ्यावे.

कलम जोडाच्या वर काडी परिपक्व झालेली असल्यास रिकटची तयारी करावी. या वेळी दोन वेलीमध्ये ३ ते ४ इंच खोल व २ फूट रुंदीची चारी वेलींच्या खोडापासून ८ ते ९ इंच अंतर सोडून घ्यावी. या चारीमध्ये साधारणतः दीड घमेले शेणखत, २०० ते २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, १५ किलो फेरस सल्फेट टाकून त्यावर हलकासा मातीचा थर टाकून झाकून घ्यावे. यामुळे तयार झालेल्या बोदामध्ये हवा खेळती राहून पांढरी मुळे शक्य तितक्या लवकर तयार होतील. पुढील काळामध्ये ती जमिनीतून अन्नद्रव्ये उचलून घेतील. ही कार्यवाही रिकट पूर्वी किमान १५ दिवस आधी करावी.

ज्या ठिकाणी रिकट घ्यावयाचा आहे, अशा बागेमध्ये पानगळ करून घेणे महत्त्वाचे आहे. यामुले काडीवरील डोळे फुगण्यास मदत होईल. रिकटनंतर नवीन फुटील लवकर निघतील. आवश्यकता भासल्यास पानगळीसाठी वेलीवर इथेफॉन २.५ ते ३ मि.लि. प्रतिलिटर याप्रमाणे फवारणी करता येईल.

२) जुनी बाग

या बागेत पाणी उतरल्यानंतरच्या अवस्थेत सुकवा दिसून येईल. ज्या बागेत घडांची संख्या आवश्यकतेपेक्षा अधिक आहे, अशा बागेमध्ये सुकव्याचे प्रमाण अधिक असेल. या प्रमाणे काही बागांमध्ये यापूर्वीचे शिल्लक डाऊनी मिल्ड्यूचे अंश कार्यान्वित झाल्याची स्थिती असून, मण्याचे देठ काळपट झाल्याचे दिसून येत आहे. डाऊनीचे जिवाणू देठातील रस शोषून घेतला असल्यास मण्याची पकड कमी होईल. परिणामी सुकवा झाल्याची स्थिती दिसून येईल. या स्थितीमध्ये बागायतदार कॅल्शिअम व मॅग्नेशिअमची फवारणी करताना दिसून येतात. मात्र, मण्यातील पेशी जुन्या झाल्यामुळे यावेळी या अन्नद्रव्यांचे शोषण करणे शक्य होतन नाही. म्हणजेच वापरलेल्या खतांचा फायदा वेलीला होत नाही. ५ ते ६ मि.मी. आकारापासून १४ ते १५ मि.मी आाकारापर्यंत कॅल्शिअम व मॅग्नेशिअम यांची फवारणी फायदेशीर ठरते. त्यानंतर वापरलेल्या खतयुक्त फवारणीचा फारसा फायदा होत नाही.

संपर्क ः डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६००१
(संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)


फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...