agriculture stories in Marathi Grapes Advice management After Fruit pruning | Agrowon

द्राक्ष फळछाटणीनंतरची कार्यवाही

विलास घुले, रश्मी समर्थ, डॉ. आर. जी. सोमकुंवर
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020

गेल्या काही दिवसामध्ये झालेल्या सतत पावसामुळे द्राक्ष बागेत फळछाटणीच्या कालावधीत येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजनांची माहिती घेऊ.

सध्याच्या परिस्थितीत पावसाळी वातावरण संपत आल्याचे चिन्हे दिसत आहेत. दुपारच्या तापमानामध्ये थोडीफार वाढ होताना दिसते, सायंकाळचे तापमानात घट दिसून येते. यासोबत सकाळी नऊ वाजेपर्यंत धुके पडत असल्याचे जाणवते. ऑक्टोबर महिना हा फळछाटणीच्या दृष्टीने महत्त्वाचा महिना आहे. या महिन्यात आवश्यक ती कार्यवाही तितकेच गरजेचे असते. गेल्या काही दिवसामध्ये झालेल्या सतत पावसामुळे द्राक्ष बागेत फळछाटणीच्या कालावधीत येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजनांची माहिती घेऊ.

फळछाटणीपूर्वी रोग नियंत्रण

पाऊस जरी संपला असला तरी वातावरणातील आर्द्रता अजूनही कमी झालेली नाही. यापूर्वी झालेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे बागेत बऱ्यापैकी पानगळ झालेली दिसेल. अशा बागेमध्ये काडी पूर्ण उघडी पडली असल्यास वेलीवर आता रोगाचे जिवाणू नाहीत असा समज होऊ शकतो. परंतु रोगग्रस्त पाने गळाल्यानंतर जमिनीवर पडलेल्या अवस्थेत उपलब्ध रोगांचे बिजाणू जमिनीवर असतील. पुढील काळात पाऊस झाल्यास पुन्हा छाटणी केल्यानंतरच्या परिस्थितीत नवीन फुटी बाहेर निघताच अशा बागेतील बिजाणू सक्रिय होतील. रोगाचा प्रसार करतात. यालाच ‘प्रायमरी इनॉक्युलम’ म्हणतात. ते नष्ट केल्यास जवळपास ५० ते ६० टक्के रोगनियंत्रण साध्य होऊ शकते.

  • अशा परिस्थितीत फळछाटणीपूर्वी (तीन ते चार दिवसआधी) काड्या, ओलांडे, खोड व खाली जमिनीवर बोद, दोन ओळीतील साचलेल्या पानांवर व तसेच बांधावर एक टक्के बोर्डो मिश्रणाची एकदा फवारणी घ्यावी. त्यानंतर फवारणी फळछाटणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी व डोळे कापसण्याच्या दोन दिवस आधी अशा प्रकारे फवारण्यांचे नियोजन करावे.
  • या सोबत शक्य असल्यास खोड व ओलांड्यावर सल्फरची २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणीद्वारे धुवून घ्यावे. यामुळे खोड व ओलांड्यावर दडलेले भुरीचे बिजाणू नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
  • शक्य असल्यास ट्रायकोडर्मा ५ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे खाली कुजलेल्या पानांवर घेतल्यास रोग नियंत्रणास चांगला फायदा होऊ शकेल.

एक सारखे डोळे फुटण्याकरिता उपाययोजना ः

द्राक्ष बागेत फळछाटणीनंतर एकाच वेळी डोळे फुटणे, घड एकाच वेळी बाहेर पडणे व जीएची १० पीपीएम तीव्रतेची फवारणी एकाच वेळी शक्य होणे या महत्त्वाच्या गोष्टी समजल्या जातात. या साठी डोळे जर लवकर व एकाच वेळी फुटल्यास हे सहजशक्य होते. डोळे एकावेळी फुटण्याकरिता हायड्रोजन सायनामाईडचे पेस्टिंग महत्त्वाचे असते. काडीची जाडी किती आहे, वातावरणातील तापमान व आर्द्रता किती आहे, तसेच फळछाटणीवेळी डोळे किती फुगले होते, या साऱ्या गोष्टींवर हायड्रोजन सायनामाईडची मात्रा अवलंबून असते.

  • काडीच्या जाडीनुसार व वातावरणानुसार हायड्रोजन सायनामाईडची उपलब्धता करावी. साधारणतः बागेत उपलब्ध काडीच्या जाडीनुसार उदा. ६ मि.मी. ( २५ ते ३० मिली), १० ते १२ मि.मी. (४० मिली) या प्रमाणे त्याचा वापर करावा.
  • जाड काडीवर हायड्रोजन सायनामाईड पुन्हा एकदा लावून काडीला पिळा दिल्यास लवकर फुटण्यासाठी मदत होईल.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे, महाराष्ट्र.)


इतर फळबाग
मणी तडकण्याच्या समस्येसाठी राहा सतर्कनुकत्याच झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागेमध्ये...
केळी सल्लामृग बागेतील केळी गर्भावस्थेत आहेत. कांदेबाग लागवड...
मणी तडकण्यासह भुरी रोगाचा प्रादुर्भाव...सध्याच्या वातावरण परिस्थितीत बऱ्याच ठिकाणी ढगाळ...
द्राक्ष बागेत घडांना पेपर लावताना...अलीकडे वातावरणातील बदलांमुळे द्राक्ष बागेमध्ये सन...
डाळिंब पिकातील रोगांचे व्यवस्थापनतेलकट डाग रोग तेलकट डागासाठी फळ पिकाच्या...
डाळिंब पिकातील बहारनिहाय अन्नद्रव्ये,...मृग बहार (मे-जून पीक नियमन) बागेची अवस्था ः फळ...
वाढत्या थंडीमध्ये फळबागांचे व्यवस्थापनसध्या वाढलेल्या थंडीचा परिणाम  कृषी...
भुरी, डाऊनी मिल्‍ड्यू रोगाच्या...बदलत्या हवामानामुळे द्राक्ष बागायतदारांसमोर नवे...
फळबागकेंद्रित शेतीतून अर्थकारण केले...केळवद (ता. चिखली, जि. बुलडाणा) येथील गणेश...
द्राक्ष बागांमध्ये भुरी,डाऊनी वाढण्याची...सध्याच्या काळात हवामानामध्ये बदल होत आहेत. या...
पेरू फळबागेतील अन्नद्रव्य व्यवस्थापनपेरू हे बहुवार्षिक फळपीक असून, त्याला वर्षभर फुले...
केळी पिकातील करपा, कंद कुजव्या रोगाचे...उशिरापर्यंत लांबलेला पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे...
मणीगळ, मणी विरळणी यांकडे लक्ष द्यावेसध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेतील वातावरणाचा...
कृषी सल्ला ( कोकण विभाग)नारळ   फळधारणा वाढत्या तापमानासोबतच...
आंब्यावरील कीड, रोग नियंत्रण व्यवस्थापनकोकणातील हवामानाची सद्यःस्थिती जाणून घेता काही...
तापमानात घट होण्याच्या स्थितीत...सध्याच्या परिस्थितीत निवार चक्रीवादळ तमिळनाडू व...
ढगाळ, पावसाळी वातावरणात करावयाच्या...सध्याच्या परिस्थितीत ठिकठिकाणी ढगाळ वातावरण असून...
हिवरेबाजार शिवारात सीताफळांचा गोडवाआदर्श गाव हिवरेबाजार (ता.जि. नगर) गावासह...
थंडीमध्ये केळी बागेची घ्यावयाची काळजीसद्यःस्थितीत खानदेश व महाराष्ट्रातील अन्य भागात...
कीड रोगांच्या नियंत्रणासाठी आतापासूनच...कोकण विभागातील उष्ण व दमट हवामान आंबा पिकावर...