लासूर (ता. चोपडा, जि.
ताज्या घडामोडी
जुन्या बागेमध्ये घडाच्या विकासाकडे लक्ष द्यावे
द्राक्ष बागेमध्ये सध्या वातावरण चांगले असले, तरी रात्रीचे तापमान कमी होत आहे. त्याचा बऱ्याच बागेतील वेलींच्या वाढीवर परिणाम होत असल्याचे दिसते. उशिरा छाटणी झालेल्या बागेमध्ये पानांवर अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते. या स्थितीमध्ये करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेऊ.
द्राक्ष बागेमध्ये सध्या वातावरण चांगले असले, तरी रात्रीचे तापमान कमी होत आहे. त्याचा बऱ्याच बागेतील वेलींच्या वाढीवर परिणाम होत असल्याचे दिसते. उशिरा छाटणी झालेल्या बागेमध्ये पानांवर अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते. या स्थितीमध्ये करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेऊ.
जुनी बाग ः सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील काही भागांमध्ये फळछाटणी ही डिसेंबर महिन्यात घेण्यात येते. अशा काही भागांमध्ये अडचणी येत असल्याचे दिसते. बागेत शेंडावाढ होत नसल्याची परिस्थिती या वेळी महत्त्वाची समस्या आहे. जर या बागेत मुळे कार्य करत नसल्यास जमिनीतून दिलेले खत वेलीसाठी उपयुक्त ठरत नाही. त्याच प्रमाणे कमी तापमानाचाही वेलीच्या वाढीवर परिणाम होतो. वेलीची वाढ व पानांद्वारे प्रकाश संश्लेषण क्रिया ही ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमानांमध्ये चांगल्या प्रकारे होते. घडाच्या विकासामध्ये पानांचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक काडीवर घडाच्या पुढे साधारण आकाराचे १० ते १२ पाने आवश्यक असतात. पानांची पूर्तता ही मणी सेंटिगपर्यंत करून घेता येते. त्यानंतर बागेत फुटीची वाढ थांबून घडाचा विकास होण्यास सुरुवात होते.
ज्या बागेत सध्या प्रीब्लूम अवस्था आहे, अशा बागेत पानांची परिस्थिती पाहून अन्नद्रव्यांपैकी नत्राचा वापर करावा. या वेळी फवारणीच्या माध्यमातून व जमिनीद्वारे अन्नद्रव्याचा पुरवठा महत्त्वाचा आहे.
जर मुळे कार्यरत नसल्याची स्थिती बागेमध्ये असेल, तर बोदावर किंवा बाजूला खोदून घ्यावे. बोदामध्ये पाण्याचे प्रमाण जर जास्त झाल्याने मुळे कार्यरत नसल्याचे स्थिती असेल. अशा वेळी बागेतील पाण्यावर नियंत्रण ठेवावे.
- प्रीब्लूम अवस्थेतील काही बागांमध्ये घडांची लांबी वाढत नसल्याची परिस्थिती दिसत आहे. अशा स्थितीमध्ये घडाचा आकार वाढवण्यासाठी जीए३चा वापर केला जातो. याचे चांगले परिणाम मिळण्यासाठी घडाची अवस्था, वापरण्यात आलेली जीए३ ची मात्रा व फवारणीवेळी बागेत असलेले तापमान या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात. घडाची लांबी वाढणे म्हणजे जीए३ च्या वापराने घडातील पेशींची संख्या व आकार वाढणे होय. जीए३ ची कार्यक्षमता वाढण्यासाठी फवारणीपूर्वी बागेत पाच ते सहा तास आधी झिंक व बोरॉनची फवारणी फायद्याची ठरते. या सोबत फवारणी करतेवेळी बागेतील आर्द्रतासुद्धा तितकीच महत्त्वाची असून, ती ६० टक्क्यांच्या आसपास असावी. यामुळे पाने किंवा घड फवारणीचे द्रावण शोषून घेण्यास समर्थ आहे, असा त्याचा अर्थ होतो. जीए३ ची फवारणी साधारणतः ३ वाजल्यानंतर केल्यास त्याचे चांगले परिणाम मिळू शकतील.
- लांब मण्याच्या द्राक्षजातींमध्ये घडाचा आकार वाढला नसल्याची परिस्थिती निर्माण होते. या जातीमध्ये फुलोरा सुरू असताना वापरण्यात आलेली जीए३ ची मात्रा जास्त महत्त्वाची असते. उपलब्ध असलेले जीए३ चे वेळापत्रक किंवा यापूर्वीचा अनुभव वापरून घडाची लांबी वाढवून घ्यावी. बागेत लांब मण्याच्या द्राक्षजातीकरिता २५ टक्के व ५० टक्के फुलोरा अवस्थेत २० पीपीएम जीए३ ची फवारणी फायद्याची ठरते. तर १०० टक्के फुलोरा अवस्थेमध्ये जीए३ हे ४० ते ५० पीपीएम मात्रेमध्ये फायद्याचे ठरते.
- फुलोरा अवस्थेत देठ परीक्षण महत्त्वाचे असते. या वेळी घडाच्या विरुद्ध बाजूचे पान गोळा करून देठ वेगळे करावेत. बागेतून १०० ते १२० देठ गोळा करून त्याचे परीक्षण करून घ्यावे. यामुळे वेलीमध्ये कोणते अन्नद्रव्य किती प्रमाणात आहे, याची खात्री मिळते. त्यानुसार खतांचा नियोजन केल्यास घडांचा चांगला विकास साधणे शक्य होते.
डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६००१
(संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)
- 1 of 1029
- ››