agriculture stories in marathi grapes advice for old vineyard | Agrowon

जुन्या बागेमध्ये घडाच्या विकासाकडे लक्ष द्यावे

डॉ. आर. जी. सोमकुंवर
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

द्राक्ष बागेमध्ये सध्या वातावरण चांगले असले, तरी रात्रीचे तापमान कमी होत आहे. त्याचा बऱ्याच बागेतील वेलींच्या वाढीवर परिणाम होत असल्याचे दिसते. उशिरा छाटणी झालेल्या बागेमध्ये पानांवर अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते. या स्थितीमध्ये करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेऊ.

द्राक्ष बागेमध्ये सध्या वातावरण चांगले असले, तरी रात्रीचे तापमान कमी होत आहे. त्याचा बऱ्याच बागेतील वेलींच्या वाढीवर परिणाम होत असल्याचे दिसते. उशिरा छाटणी झालेल्या बागेमध्ये पानांवर अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते. या स्थितीमध्ये करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेऊ.

जुनी बाग ः सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील काही भागांमध्ये फळछाटणी ही डिसेंबर महिन्यात घेण्यात येते. अशा काही भागांमध्ये अडचणी येत असल्याचे दिसते. बागेत शेंडावाढ होत नसल्याची परिस्थिती या वेळी महत्त्वाची समस्या आहे. जर या बागेत मुळे कार्य करत नसल्यास जमिनीतून दिलेले खत वेलीसाठी उपयुक्त ठरत नाही. त्याच प्रमाणे कमी तापमानाचाही वेलीच्या वाढीवर परिणाम होतो. वेलीची वाढ व पानांद्वारे प्रकाश संश्‍लेषण क्रिया ही ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमानांमध्ये चांगल्या प्रकारे होते. घडाच्या विकासामध्ये पानांचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक काडीवर घडाच्या पुढे साधारण आकाराचे १० ते १२ पाने आवश्यक असतात. पानांची पूर्तता ही मणी सेंटिगपर्यंत करून घेता येते. त्यानंतर बागेत फुटीची वाढ थांबून घडाचा विकास होण्यास सुरुवात होते.
ज्या बागेत सध्या प्रीब्लूम अवस्था आहे, अशा बागेत पानांची परिस्थिती पाहून अन्नद्रव्यांपैकी नत्राचा वापर करावा. या वेळी फवारणीच्या माध्यमातून व जमिनीद्वारे अन्नद्रव्याचा पुरवठा महत्त्वाचा आहे.
जर मुळे कार्यरत नसल्याची स्थिती बागेमध्ये असेल, तर बोदावर किंवा बाजूला खोदून घ्यावे. बोदामध्ये पाण्याचे प्रमाण जर जास्त झाल्याने मुळे कार्यरत नसल्याचे स्थिती असेल. अशा वेळी बागेतील पाण्यावर नियंत्रण ठेवावे.

  • प्रीब्लूम अवस्थेतील काही बागांमध्ये घडांची लांबी वाढत नसल्याची परिस्थिती दिसत आहे. अशा स्थितीमध्ये घडाचा आकार वाढवण्यासाठी जीए३चा वापर केला जातो. याचे चांगले परिणाम मिळण्यासाठी घडाची अवस्था, वापरण्यात आलेली जीए३ ची मात्रा व फवारणीवेळी बागेत असलेले तापमान या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात. घडाची लांबी वाढणे म्हणजे जीए३ च्या वापराने घडातील पेशींची संख्या व आकार वाढणे होय. जीए३ ची कार्यक्षमता वाढण्यासाठी फवारणीपूर्वी बागेत पाच ते सहा तास आधी झिंक व बोरॉनची फवारणी फायद्याची ठरते. या सोबत फवारणी करतेवेळी बागेतील आर्द्रतासुद्धा तितकीच महत्त्वाची असून, ती ६० टक्क्यांच्या आसपास असावी. यामुळे पाने किंवा घड फवारणीचे द्रावण शोषून घेण्यास समर्थ आहे, असा त्याचा अर्थ होतो. जीए३ ची फवारणी साधारणतः ३ वाजल्यानंतर केल्यास त्याचे चांगले परिणाम मिळू शकतील.
  • लांब मण्याच्या द्राक्षजातींमध्ये घडाचा आकार वाढला नसल्याची परिस्थिती निर्माण होते. या जातीमध्ये फुलोरा सुरू असताना वापरण्यात आलेली जीए३ ची मात्रा जास्त महत्त्वाची असते. उपलब्ध असलेले जीए३ चे वेळापत्रक किंवा यापूर्वीचा अनुभव वापरून घडाची लांबी वाढवून घ्यावी. बागेत लांब मण्याच्या द्राक्षजातीकरिता २५ टक्के व ५० टक्के फुलोरा अवस्थेत २० पीपीएम जीए३ ची फवारणी फायद्याची ठरते. तर १०० टक्के फुलोरा अवस्थेमध्ये जीए३ हे ४० ते ५० पीपीएम मात्रेमध्ये फायद्याचे ठरते.
  • फुलोरा अवस्थेत देठ परीक्षण महत्त्वाचे असते. या वेळी घडाच्या विरुद्ध बाजूचे पान गोळा करून देठ वेगळे करावेत. बागेतून १०० ते १२० देठ गोळा करून त्याचे परीक्षण करून घ्यावे. यामुळे वेलीमध्ये कोणते अन्नद्रव्य किती प्रमाणात आहे, याची खात्री मिळते. त्यानुसार खतांचा नियोजन केल्यास घडांचा चांगला विकास साधणे शक्य होते.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६००१
(संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)


इतर फळबाग
संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणेसंत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती,...
लक्षात घ्या चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्मजमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि...
सीताफळातील बहार व्यवस्थापनफेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता...
सीताफळात योग्य परागसिंचन होणे आवश्यकसीताफळाची फळधारणा तापमानावर जास्त अवलंबून...
नारळाला द्या शिफारशीत खतमात्रानारळ झाडाच्या सभोवताली पहिले वर्ष १ फूट, दुसरे...
असे करा लिंबूवर्गीय फळपिकांचे व्यवस्थापनसध्या काही संत्रा बागांना पूर्ण ताण बसून आंबिया...
दीड वर्षात पपईसह पाच पिकांचा 'तनपुरे...पपईच्या दीर्घ कालावधीच्या पिकात कांदा, पपई...
जीवनसत्त्व, क्षार घटकांचा पुरवठा करणारे...अंजिरामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ हे घटक मुबलक...
द्राक्ष रिकट पूर्व तयारीसह व्यवस्थापनसध्याच्या वातावरणाचा विचार करता किमान...
केळी सल्लासूत्रकृमीग्रस्त जमिनीस खोल नांगरट देऊन उन्हात २...
केळीवरील सोंडकिडीचे कामगंध...जागतिक पातळीवर केळीचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या...
दर्जेदार केळी उत्पादनाचे तंत्रकेळी घडातील फळांच्या आकारात एकसमान बदल होऊन घड...
द्राक्ष सल्ला : तापमानातील चढ-उताराचे...सध्याच्या तापमानाचा विचार करता द्राक्षबागेत...
पिवळ्या पर्णछत्राची समस्या, कारणे जाणून...पावसाळा सरल्यानंतर थंडी पडली की बऱ्याच बागांमध्ये...
लिंबूवर्गीय फळपीक सल्ला सद्य:स्थितीत शेतकऱ्यांनी आंबिया बहरासाठी ...
असे करा रुगोज चक्राकार पांढरी माशीचे...थंडी वाढू लागल्यानंतर कडाक्याच्या थंडीला सुरुवात...
अशी करा पपईची लागवडपपई लागवड वर्षभर मुख्यत्वे जून-जुलै, सप्टेंबर-...
नवीन द्राक्ष बागेमध्ये रिकट घेण्याचा काळसध्या वातावरण कमी होत असून, काही ठिकाणी ढगाळ...
असे करा संत्रा बागेत आंबिया बहरासाठी खत...संत्रा-मोसंबी बागेपासून आर्थिक उत्पादन...
फळबागेत आच्छादन कराफळपिकांमध्ये साधारणपणे १० अंश सेल्सिअसपेक्षा...