दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस शेतकऱ्यांचे नवीन तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदो
महिला
वातदोषावर उपाय ः हादग्याची फुले, शेंगा
आयुर्वेदानुसार त्रिदोषांपैकी वातदोष कमी होण्याकरिता हादग्याचे सेवन फायदेशीर असते. कफ व पित्तदोष कमी करण्यासाठी हादग्याच्या फुलांच्या भाजीचा चांगला उपयोग होतो.
आयुर्वेदानुसार त्रिदोषांपैकी वातदोष कमी होण्याकरिता हादग्याचे सेवन फायदेशीर असते. कफ व पित्तदोष कमी करण्यासाठी हादग्याच्या फुलांच्या भाजीचा चांगला उपयोग होतो.
हादग्याला ‘अगस्ता’ असेही म्हणतात. या लहान वृक्षाची लागवड घराभोवती, परस बागेत, तसेच शेताच्या बांधावर करतात. हादग्याचा वृक्ष २५ ते ३० फुटांपर्यंत उंच वाढतो. हा वृक्ष जलद वाढतो, पण त्याचे आयुष्यमान कमी असते. खोड व फांद्या नाजूक व ठिसूळ असतात. फांद्या खोडाच्या वरील भागात पसरणाऱ्या व खाली झुकलेल्या असतात.
शेंगा ः
१) झाड परिपक्व झाल्यावर त्याला शेंगा येतात. शेंग फूटभर लांब, चारकोनी व हिरवीगार असते. एका शेंगेत तपकिरी रंगाच्या १५ ते २० बिया असतात. हादग्याला सप्टेंबर ते जानेवारी महिन्यात फुले व फळे येतात. फुलांची व कोवळ्या शेंगांची भाजी करतात.
फुले ः
फुले चवीला थोडी कडवट आणि तुरट असतात. फुले गुणाने थंड आहेत.
फुले दिसायला पांढरी व करंजीसारखी अर्ध गोलाकार असतात. या फुलांचे देखील अनेक रुचकर पदार्थ बनवतात.
औषधी गुणधर्म ः
१) आयुर्वेदानुसार त्रिदोषांपैकी वातदोष कमी होण्याकरिता हादग्याचे सेवन फायदेशीर असते. तसेच कफ व पित्तदोष कमी करण्यासाठी हादग्याच्या फुलांच्या भाजीचा चांगला उपयोग होतो.
२) थंडी वाजून येणाऱ्या तापावर हादग्याच्या फुलांची भाजी उपयुक्त आहे. याच्या सेवनाने सर्दीचा त्रास कमी होतो. भूक लागत नसल्यास, पोट साफ होत नसल्यास हादग्याच्या भाजीने चांगला गुण येतो.
३) स्त्रियांच्या पाळीतील अनियमितता अथवा पाळीसंबधी तक्रारी या भाजीच्या सेवनाने कमी होतात.
४) याच्या शेंगांत व फुलांत ‘अ’ जीवनसत्त्वाचे प्रमाण भरपूर असल्यामुळे त्याच्या अभावाने निर्माण होणारे आजार टाळण्यासाठी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रुग्णाचा त्रास कमी होतो. हादग्याच्या फुलांच्या भाजीने जेवणात रुची निर्माण होते.
फुलांची भाजी
साहित्य ः हादग्याची फुले, कांदा, लसूण, तिखट, मीठ, हिंग, जिरे, तेल, हिरवी मिरची, भिजवलेली मुगाची डाळ इ.
कृती ः फुले स्वच्छ धुऊन चिरून घ्यावीत. कढईत तेल घेऊन चिरलेला कांदा त्यात परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये लसूण, जिरे, हिरवी मिरची घालून परतावी. चिरलेली भाजी घालून मुगाची डाळ घालावी. चांगली शिजू द्यावी.
अशी भाजी मुगाच्या डाळीऐवजी वरून थोडे डाळीचे पीठ लावून परतूनही तयार करतात.
फुलांचे भरीत
साहित्य ः हादग्याची फुले, दही, मीठ, साखर, हिरवी मिरची, कोथिंबीर, तेल, जिरे इ.
कृती ः प्रथम फुले चिरून तेलात परतून घ्यावीत. फुलांमध्ये मीठ, साखर, दही, मीठ, साखर व शेंगदाण्याचे कूट घालावे. हिरव्या मिरचीचे तुकडे घालून खमंग फोडणी द्यावी.
फुलांची भजी ः
साहित्य- हादग्याची फुले, डाळीचे पीठ, हिंग, जिरे, ओवा, तिखट, मीठ व तळण्यासाठी तेल
कृतीः हादग्याची फुले धुऊन कोरडी करावीत. डाळीच्या पिठात पाणी घालून त्यात तिखट, मीठ, हिंग, जिरे व ओवा घालून भज्यापेक्षा पातळसर भिजवून घ्यावे. यात एक एक फूल घालून तळून घ्यावे. गरम भजी अतिशय कुरकुरीत व स्वादिष्ट लागतात.
शेंगांची भाजी
साहित्य ः हादग्याच्या कोवळ्या शेंगा, बारीक चिरलेला कांदा, तेल, मीठ, तिखट, कोथिंबीर
कृती ः कोवळ्या शेंगांचे लहान तुकडे करावेत. कढईत तेल घेऊन त्यात चिरलेला कांदा परतून घ्यावा. निवडलेल्या शेंगांचे तुकडे, तिखट, मीठ घालावे व परतावे. गरजे प्रमाणे पाणी घालवून शिजवावे. चवीप्रमाणे मसाला घालावा. यात शेंगदाण्याचा कूट, किसलेले ओले खोबरे व कोथिंबीर घालावी.
संपर्क ः डॉ. साधना उमरीकर, ९४२०५३००६७
(कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर, जि. जालना, महाराष्ट्र. )
- 1 of 14
- ››