हरयाणामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी राबवताहेत मत्स्यप्रकल्प

हरयाणा येथील जिंद आणि करनाल जिल्ह्यातील पाच गावांतील शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी केंद्रीय खारवट माती संशोधन संस्थेमार्फत पथदर्शी प्रकल्प राबवला जात आहे. त्या अंतर्गत पीक सल्ले, मत्स्यपालन यावर भर देण्यात आला असून, निविष्ठांचे प्रमाण कमी राखतानाच उत्पादन वाढवण्याकडे लक्ष दिले जात आहे.
हरयाणामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी राबवताहेत मत्स्यप्रकल्प
हरयाणामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी राबवताहेत मत्स्यप्रकल्प

हरयाणा येथील जिंद आणि करनाल जिल्ह्यातील पाच गावांतील शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी केंद्रीय खारवट माती संशोधन संस्थेमार्फत पथदर्शी प्रकल्प राबवला जात आहे. त्या अंतर्गत पीक सल्ले, मत्स्यपालन यावर भर देण्यात आला असून, निविष्ठांचे प्रमाण कमी राखतानाच उत्पादन वाढवण्याकडे लक्ष दिले जात आहे. केंद्र सरकारच्या ‘मेरा गाव, मेरा देश’ या योजनेअंतर्गत पीक उत्पादनातील अनावश्यक निविष्ठांचे प्रमाण कमी राखत खर्चाचे प्रमाण कमी करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या करनाल (हरयाणा) येथील केंद्रीय खारवट माती संशोधन संस्थेमार्फत प्रयत्न केले जात आहेत. या संस्थेतील संशोधकांनी जिंद आणि करनाल जिल्ह्यातील पाच गावे निवडली असून, त्यामध्ये पथदर्शी प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी मत्स्यपालन या पूरक व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे. जिंद येथील धत्रह येथे सुमारे १२.५ एकर क्षेत्रावर पसरलेला आहे. त्याचा कार्यक्षम असे ६, ४, आणि २.५ एकरचे तीन भाग करण्यात आले आहेत. त्यात इंडियन मेजर कार्प, कटला, रोहू आणि मृगल या जातीच्या मत्स्यपालनाला प्रारंभ केला आहे. माशांमध्ये रोग प्रादुर्भावामध्ये शास्त्रज्ञांची मदत ः तीन महिन्याच्या जतनामध्ये शेतकऱ्यांना माशांमध्ये दोन वेळा रोगांचा मोठा प्रादुर्भाव दिसून आला. १) पहिल्या प्रादुर्भावावेळी, मृत आणि रोगग्रस्त माशांचे विश्लेषण करण्यात आले. या माशांच्या त्वचेवर चिकट पदार्थ वाढला होता आणि त्यांचे कल्ले निस्तेज झाले होते. काही माशांच्या शरीरावर अॅंकर वर्म (Lernaeids) दिसून आल्या. माशांची भूक मंदावलेली होती. या कृमीच्या नियंत्रणासाठी तलावाच्या पृष्ठभागावर एक आठवड्यासाठी विशिष्ट कीटकनाशकाच्या योग्य प्रमाणात फवारण्या करण्यास सांगण्यात आले. काही दिवसानंतर माशांमध्ये सुधारणा दिसली. त्यांची भूक वाढून खाद्य घेण्यास सुरुवात केली. परिणामी वजनामध्ये वाढ दाखवण्यास सुरुवात झाली. २) दुसऱ्या प्रादुर्भावावेळी, माशांचे पर, कल्ले आणि अंतर्गत अवयवांत रक्तस्राव होत असल्याचे दिसून आले. यामागील कारणांचा शोध घेतला असता पाण्याची गुणवत्ता बिघडल्याचे लक्षात आले. परिणामी माशांवर ताण येऊन प्रादुर्भावाला सुरुवात झाली होती. एकदा वैद्यकीय निदान निश्चित झाल्यानंतर त्यासाठी योग्य औषधाचा ०.१ पीपीएम प्रमाणामध्ये आठवड्यातून तीन वेळा वापर करण्यात आला. त्यानंतर माशांची पुन्हा तपासणी केली असता मृत माशांचे प्रमाण कमी झाल्याचे व माशांमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून आले. पुढे नियमित वाढीसाठी प्रतिजैविके आणि योग्य औषधांचा वापर करावा लागला. यामुळे खर्चामध्ये काही प्रमाणात वाढ झाली. पर्यायाने अपेक्षित नफा मिळाला नाही. आत्मविश्वासात वाढ ः संस्थेच्या संशोधकांच्या शेतीसाठी दिल्या गेलेल्या नियमित सल्ल्यांमुळे शेतकऱ्यांच्या मासिक निविष्ठा खर्चामध्ये ५३ टक्के घट झाली. उत्पादनामध्येही दर्जा आणि गुणवत्तेसह वाढ झाली. मत्स्यतलावातील माशांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी वेळीच केलेल्या मदतीमुळे अनावश्यक औषधांचा वापर टाळणे शक्य झाले. माशांच्या उत्पादनामधून अपेक्षित नफा मिळाला नसला तरी भविष्यामध्ये अधिक चांगले उत्पादन घेण्याचा आत्मविश्वास शेतकऱ्यांमध्ये तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले. पुढील दोन वर्षामध्ये २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शास्त्रज्ञांनी कंबर कसली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com