agriculture stories in marathi, Harvesting genes to improve watermelons | Page 2 ||| Agrowon

कलिंगडांच्या जनुकीय प्रदेशांचा घेतला जातोय शोध

वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट कलिंगडाच्या सात जातींतील जनुकांचा एकत्रित अभ्यास करत आहे. या जनुकांचे नेमके गुणधर्म जाणून घेतल्यामुळे वातावरण बदलाच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन देणाऱ्या जातींची पैदास करणे शक्य होणार आहे. सहा जंगली जातींतील जनुकांच्या विविधतेचा फायदा पिकांमध्ये विविध प्रतिकारकता विकसित करण्यासाठी होणार आहे.

आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट कलिंगडाच्या सात जातींतील जनुकांचा एकत्रित अभ्यास करत आहे. या जनुकांचे नेमके गुणधर्म जाणून घेतल्यामुळे वातावरण बदलाच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन देणाऱ्या जातींची पैदास करणे शक्य होणार आहे. सहा जंगली जातींतील जनुकांच्या विविधतेचा फायदा पिकांमध्ये विविध प्रतिकारकता विकसित करण्यासाठी होणार आहे.

कलिंगड म्हटले आपल्या डोळ्यासमोर प्राधान्याने मोठ्या आकाराचे, लाल व गोड गराचे फळ येते. हे फळ सामान्य वाळवंटी प्रदेशामध्ये येणारे असले तरी जागतिक पातळीवरील टोमॅटोनंतरचे दुसरे सर्वात लोकप्रिय फळ ठरते. वास्तविक टोमॅटोची गणना भाजीमध्ये केली जात असल्यामुळे कलिंगडाची लोकप्रियता सर्वाधिक असल्याचेही म्हटले जाते. मात्र, भविष्यातील तीव्र वातावरणाच्या स्थितीमध्ये योग्य रीतीने वाढून, उत्पादकता टिकवणाऱ्या कलिंगडाच्या लागवडीखालील एक आणि सहा जंगली जातींवर संशोधकांनी लक्ष केंद्रित केले आहे. सध्या जरी या जाती फिकट, कठीण आणि कडसर चवीच्या असल्या तरी त्यांचे जनुकीय गुणधर्म नव्या जातींच्या पैदाशीसाठी उपयुक्त ठरणार आहेत.

या जातींमध्ये कीड रोगांसाठी प्रतिकारकता असून, दुष्काळाच्या स्थितीमध्ये तग धरण्याची क्षमता आहे. भविष्यामध्ये फळांचा दर्जा सुधारणे शक्य आहे. सध्या या महत्त्वाच्या अशा जनुकीय गुणधर्मांचा वापर अधिक उत्पादनक्षम अशा गोड कलिंगडामध्ये करण्याचा विचार आहे. त्याविषयी माहिती देताना बॉयसे थॉम्पसन संस्थेतील संशोधक झांगजून फेई यांनी सांगितले, की माणसांनी सुमारे ४ हजार वर्षांपूर्वी कलिंगडाच्या स्थानिकीकरण करून, ते लागवडीखाली आणले. हळूहळू निवडपद्धतीने लाल, गोड अशा फळांची पैदास करत गेले. मात्र, या प्रक्रियेमध्ये त्यांची रोग आणि अन्य प्रकारच्या ताणांना प्रतिकार करण्याची क्षमता कमी होत गेली.

कलिंगडाच्या जनुकांच्या अभ्यासासाठी संशोधकांनी दोन टप्प्यांची प्रक्रिया राबवली असून, नेचर जेनेटिक्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी सुधारित संदर्भ जनुके (रेफरन्स जिनोम) मिळवली असून, त्याचा वापर वनस्पती शास्त्रज्ञ किंवा पैदासकारांना नव्या जातींच्या विकासासाठी सहजतेने करता येणार आहे. २०१३ मध्ये प्रथम फुई यांच्या नेतृत्वामध्ये पूर्व आशियाई देशांमध्ये लागवडीखाली असलेल्या ९७१०३ या जातींची संदर्भ जनुक रचना तयार करण्यात आली. पूर्वी जुन्या शॉर्ट रिड सिक्वेन्सिंग तंत्राचा वापर केला जात असे. त्या तुलनेमध्ये आता लाँग रिड सिक्वेन्सिंग तंत्र विकसित झालेले असल्यामुळे अधिक दर्जेदार जिनोम मिळवणे शक्य झाले आहे.

त्यांच्या गटाने सात जातींच्या सुमारे ४१४ प्रजातींच्या कलिंगडांच्या सुसंगतवार जनुकीय रचना मिळवल्या आहेत. त्यांची तुलना नव्या तयार केलेल्या संदर्भ जनुकांची करून, उत्क्रांतीच्या प्रक्रियेतील विविध टप्पे मिळवण्यात येत आहेत.
 

आमच्या विश्लेषणातून पुढे आलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्याच्या पैदास प्रक्रियेमध्ये वापरली जाणारी एक जंगली प्रजाती, C. amarus ही आजवर समजाप्रमाणे सध्याच्या जातींची पूर्वज नसून, वेगळ्या परंपरेतील आहे. आधुनिक जाती या गेल्या काहीशे वर्षांमध्ये सुधारित झाल्या आहेत. त्यातून फळांच्या दर्जाविषयी-विशेषत मोठा आकार, गोडी आणि कुरकुरीतपणा यासाठी जनुकांचे प्रदेश मिळवण्यात आले आहेत.
- झांगजून फेई, संशोधक, बॉयसे थॉम्पसन संस्था.

जनुकीय संशोधनाचे असे आहेत फायदे ः

  • गेल्या २०-३० वर्षांमध्ये पैदासकारांनी कलिंगडाच्या दोन जवळच्या प्रजाती C. amarus आणि अन्य दोन जंगली प्रजाती C. mucusospermus आणि C. colocynthis यांच्या संकरातून सूत्रकृमी, दुष्काळ आणि फ्युजारीयम विल्ट, भुरी अशा रोगांसाठी अधिक प्रतिकारक जाती विकसित केल्या आहेत.
  • अॅमनोन लेवी हे अमेरिकन कृषी संशोधन सेवेतील चार्ल्सटन (दक्षिण कॅरोलिना) येथील भाजीपाला प्रयोगशाळेमध्ये कलिंगड पैदासकार आणि जनुकशास्त्रज्ञ आहेत. ते म्हणाले, की गोड कलिंगडामध्ये अत्यंत अरुंद जनुकीय पाय असून, जंगली प्रजातींमध्ये जनुकीय विविधता मोठ्या प्रमाणात आहे. या विविधतेचा फायदा नव्या पर्यावरणीय ताणांसाठी व रोगकिडींसाठी सहनशील जाती विकसित करणे शक्य आहे.
  • या आंतरराष्ट्रीय संशोधक गटामध्ये बिजिंग अॅकॅडमी ऑफ अॅग्रीकल्चर अॅण्ड फॉरेस्ट्री सायन्सेस येथील संशोधकांचाही समावेश होता. या फेई व सहकाऱ्यांच्या गटाने नेचर जेनेटिक्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित संशोधनामध्ये ११७५ कलिंगडे व अन्य जातींचे विश्लेषण मांडले आहे. त्यातून फळांचे वजन, दर्जा व अन्य गुणधर्मांशी जोडलेले २०८ जनुकीय प्रदेश ओळखले आहेत. त्याचा फायदा जगभरातील पैदासकारांना होऊ शकतो.

इतर ताज्या घडामोडी
१ डॉक्‍टर अन्‌ १६ हजार जनावरे !इस्लामपूर, जि. सांगली : वाळवा तालुक्‍यात राज्य...
एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनातून...नाशिक : पॉलिहाउस मध्ये वर्षानुवर्ष एकच पीक...
रत्नागिरीत वाऱ्यांसह ढगाळ वातावरण;...रत्नागिरी : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी...
पाणी शुद्धीकरणासाठी नॅनो...अधिक पाण्यावर गाळण यंत्रणा या तुलनेने सावकाश आणि...
ढगाळ हवामानामुळे फळबाग उत्पादक धास्तावलेपुणे ः आॅक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने...
परभणी : दोन हजारांवर शेतकऱ्यांना...परभणी  : मुख्यमंत्री सौर कृषिपंप...
औरंगाबाद विभागात १६ कारखान्यांना गाळप...औरंगाबाद : मराठवाड्यासह खानदेशातील १९ साखर...
बदलत्या हवामानामुळे पिकांवरील परिणामाचा...सोलापूर ः सातत्याने बदलणारे हवामान आणि त्याचा...
पुणे जिल्ह्यात कांदा रोपांच्या दरात वाढपुणे  ः वाढलेल्या कांदा दरामुळे पुणे...
मधुक्रांती प्रदर्शनास उद्यापासून प्रारंभनाशिक  : मधमाशीपालन या विषयावरील ‘मधुक्रांती...
गायी, म्हशींचे कृत्रिम रेतन करताना...पुणे  : गाय, म्हशीला कृत्रिम रेतन करताना...
कलम केलेल्या द्राक्ष बागेमध्ये करावयाची...द्राक्ष बागेमध्ये सध्या वाढीच्या विविध...
जामखेड पालिकेने बाजार समितीला ठोकले टाळेजामखेड, जि. नगर ः नगरपरिषदेने कृषी उत्पन्न बाजार...
सातारा जिल्ह्यात ३१ हजार क्विंटल बियाणे...सातारा ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ३५ हजार ९१२...
जळगावात भरताची वांगी १८०० ते ३५०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ४...
एकात्मिक सेंद्रिय रासायनिक नियोजनाची...पन्नास वर्षांपूर्वी अन्नधान्यासाठी आयातीवर...
शेखर गायकवाड प्रभारी कृषी आयुक्तपुणे  : राज्यात ओला दुष्काळ, पीकविमा, रब्बी...
इथेनॉलनिर्मिती, मिश्रणासाठी बनवले नवे...वाहनातून होणाऱ्या कर्ब उत्सर्जनाचे प्रमाण कमी...
परभणी जिल्ह्यात पणन महासंघातर्फे दोन...परभणी : ‘‘महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
पगारासाठी ‘आदिनाथ’च्या कामगारांचे आंदोलनकरमाळा, जि. सोलापूर : करमाळा येथील श्री आदिनाथ...