हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
ताज्या घडामोडी
आरोग्यदायी विड्याचे पान
रविवार, 20 सप्टेंबर 2020
विड्याचे पान सगळ्यांना सुपरिचित आहेच! विड्याचे पान औषध म्हणूनही तितकेच महत्त्वाचे काम करते. प्रामुख्याने कफ कमी करण्यासाठी विड्याचे पान गुणकारी असते.
कोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी विड्याच्या पानाला मानाचे आणि महत्त्वाचे स्थान असते. विविध समारंभात, छोट्या घरगुती कार्यक्रमात मुखशुद्धीकर म्हणून विड्याचे पान दिले जातेच. त्यामुळे विड्याचे पान सगळ्यांना सुपरिचित आहेच! विड्याचे पान औषध म्हणूनही तितकेच महत्त्वाचे काम करते.
- प्रामुख्याने कफ कमी करण्यासाठी विड्याचे पान गुणकारी असते. अर्धा चमचा सितोपलादी चूर्ण मधासह चाटण करून पानांना लावावे. आणि लवंग लावून बंद करावे. हे पान सेवन केल्याने कफ कमी होण्यास मदत होते. पान देठासहित घ्यावे.
- श्वसनाचा त्रास होत असल्यास, विड्याचे पान देठासहित घेऊन सितोपलादी चूर्ण, वेलची, ज्येष्ठमध यांच्यासह सेवन करावे.
- पावसात भिजणे आणि हवाबदलामुळे सर्दीचा त्रास होतो. अशावेळी देठासहित विड्याच्या पानाला मध आणि पिंपळी चूर्णाचे चाटण लावून रात्री सेवन करावे. सर्दीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
- भूक वाढवण्यासाठी आणि अन्नपचनासाठी विड्याच्या पानात बडीशेप, ओवा घालून एक दिवसाआड किंवा रोज सेवन करावे.
- बऱ्याचदा घशात कफाचा चिकटा होऊन आवाज बसतो. अशावेळी विड्याच्या पानांचा रस आणि २ मिरे कुटून त्याची पावडर मधातून चाटण घ्यावे. चिकटा कमी होण्यास मदत होते.
- विड्याची पाने, ज्येष्ठमध, लवंग, वेलची, गुलकंद, कात, चुना, बडीशेप एकत्र करून कुटून केलेला तांबूल पाचक म्हणून काम करतो.
पथ्य ः
आंबट दही, ताक, थंड पदार्थ, काकडी, थंड दूध या पदार्थांमुळे कफ वाढतो. त्यामुळे या पदार्थांचे सेवन करणे टाळावे.
काळजी ः
- वारंवार कफ, सर्दीचा त्रास होत असल्यास, तज्ञ्जांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार घ्यावा. योग्य त्या तपासण्या कराव्यात.
- विड्याचे पान औषधी असले तरी त्यामध्ये तंबाखू, गुटखा इत्यादी घालून सेवन करणे हानिकारक ठरते.
इतर ताज्या घडामोडी
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८...
सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग...डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन...नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती...
पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून...