agriculture stories in marathi, Helping hands from within: Live-in bacteria protect plants against infections | Agrowon

वनस्पतींच्या संरक्षणामध्ये कार्यरत मुळांवरील जिवाणूंचा घेतला शोध

वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

वनस्पतीच्या मुळांमध्ये राहत असलेल्या सूक्ष्मजीवांमुळे वनस्पतींची वाढ आणि विविध ताणांसाठी सहनशीलतेला चालना मिळत असल्याचे नेदरलॅंड्स पर्यावरण संस्थेमधील संशोधनामध्ये दिसून आले आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने विशिष्ट प्रकारची संयुगे बनवणाऱ्या ७०० पेक्षा अधिक जनुकीय समुदायांचा शोध घेतला आहे. पूर्वी केवळ १२ जनुकीय समुदायांचीच माहिती होते. हे संशोधन ‘जर्नल सायन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

वनस्पतीच्या मुळांमध्ये राहत असलेल्या सूक्ष्मजीवांमुळे वनस्पतींची वाढ आणि विविध ताणांसाठी सहनशीलतेला चालना मिळत असल्याचे नेदरलॅंड्स पर्यावरण संस्थेमधील संशोधनामध्ये दिसून आले आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने विशिष्ट प्रकारची संयुगे बनवणाऱ्या ७०० पेक्षा अधिक जनुकीय समुदायांचा शोध घेतला आहे. पूर्वी केवळ १२ जनुकीय समुदायांचीच माहिती होते. हे संशोधन ‘जर्नल सायन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

वनस्पतींच्या मुळांवर राहणाऱ्या काही जिवाणूंच्या प्रजाती या विविध बुरशीच्या प्रादुर्भावापासून मुळांचे संरक्षण करतात. अशा मुळांवर किंवा परिसरामध्ये राहणाऱ्या जिवाणूंचे जनुकीय विश्लेषण करण्यासाठी नेदरलॅंड येथील वॅगनिंगन, लेडन, रॉटरडॅम या संस्थांसह ब्राझील, कोलंबिया आणि अमेरिका येथील संशोधकांनी एकत्रित अभ्यास केला. जमिनीखाली असलेल्या या जिवाणूंच्या विविधता उलगडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. त्याविषयी माहिती देताना संशोधक जोस राईझमेकर यांनी सांगितले, की वनस्पती मुळांवरील या जिवाणूंच्या गुणधर्म, संरचना यांच्या कोणत्याही पूर्व माहितीशिवाय अभ्यास करण्यासाठी डीएनए सिक्वेन्सिंग तंत्राचा वापर करण्यात आला. वनस्पती, प्राणी आणि माणसे यांच्या विविध कार्यासाठी जिवाणू हे आवश्यक आहेत. आमच्या अभ्यासामध्ये प्रामुख्याने मुळांचे विविध बुरशीजन्य घटकांपासून संरक्षण करणाऱ्या जिवाणूंवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्याचा फायदा अधिक शाश्वत आणि कीडनाशकांशिवाय पिकांचे उत्पादन घेण्यासाठी होऊ शकतो.
बुरशींचा प्रादुर्भाव होण्याच्या स्थितीमध्ये वनस्पतींच्या मुळांमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी घडतात?
मुळांना मदत करणारे घटक चिटीनॅसेस ही विकरे हल्ला करणाऱ्या बुरशींच्या पेशीभित्तिका तोडण्याचे काम करतात. अशा विकरांची निर्मिती करणाऱ्या चिटिनोफॅगा आणि फ्लॅवोबॅक्टेरियम प्रजातींचा उपयोग करून मुळांच्या संरक्षणासाठी सूक्ष्म यंत्रणा तयार करणे संशोधकांना शक्य होणार आहे. या तंत्राचे प्रयोग शर्कराकंदावर करण्यात आले असून, त्याचे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत.

जनुकीय खजिना

वनस्पतींच्या मुळांवर राहणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या जनुकीय माहितीच्या तुलनात्मक अभ्यासासाठी वॅगेनिंगन विद्यापीठ आणि संशोधन (WUR) यांनी एक संगणकीय आज्ञावली तयार केली आहे. त्यामुळे एकाच वेळी हजारो प्रजातींची एकमेकांशी तुलना करता येते. या पद्धतीचा वापर करून संशोधकांनी विशिष्ट प्रकारची संयुगे बनवणाऱ्या ७०० पेक्षा अधिक जनुकीय समुदायांचा शोध घेतला आहे. त्यातील केवळ १२ जनुकीय समुदायांचीच आधी माहिती होती. खरे म्हणजे जनुकीय माहितीचा खजिना सापडला असला तरी त्यातील अनेकांचे नेमके कार्य काय हेही माहिती नाही. हे संशोधन म्हणजे हिमनगाचे टोक असल्याचे मत राईजमेकर्स यांनी व्यक्त केले.

मुळांकडे परत चला...

पर्यावरणशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, मुलद्रव्यीय जीवशास्त्र, जैवमाहितीशास्त्र आणि संख्या शास्त्र अशा विविध शास्त्रशाखांचे शास्त्रज्ञ एकत्र आल्यामुळे हे संशोधन शक्य झाले आहे. या शास्त्रज्ञांनी मुळांकडे परत चला (बॅक टू रुट्स) हा प्रकल्प राबवला असून, त्याला डच रिसर्च कौन्सिल अर्थसाह्य करण्यात आले आहे. 


इतर ताज्या घडामोडी
पदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
महात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून...नगर  ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांमध्ये `कोरोना`...पुणे : निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला जेमतेम २८...
केळी पिकवून विकण्यासाठी अखेर...परभणी : ‘लॅाकडाऊन’मुळे केळीच्या दरात मोठी घसरण...
कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी (ता.५) सायंकाळी...
जनावरांतील उष्माघाताचे नियंत्रणउन्हाच्या संपर्कात आल्यामुळे जनावरांच्या शरीराचे...
अकोल्यात भाजीपाला, फळविक्रीची ११०...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील...
‘वीज दर कपातीत शेतकऱ्यांवरील अन्याय दूर...अकोला ः राज्य वीज नियामक आयोगाने नुकतीच उद्योग,...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात फुले...नांदेड : ‘लॅाकडाऊन’मुळे नांदेडसह अन्य ठिकाणच्या...
फूल विक्रीचा व्यवसाय डबघाईस; फेकून...शिरपूरजैन, जि. वाशीम : येथील फूल उत्पादक शेतकरी...
बेदाणा निर्मितीसाठी आवश्यक रसायने...नाशिक : द्राक्षापासून बेदाणा निर्मितीसाठी...
नाशिक जिल्ह्यात बेदाणा निर्मितीच्या...नाशिक : ऐन द्राक्ष हंगामाच्या अंतिम टप्प्यात...
मराठवाड्यात फळे, भाजीपाल्याची ८१ हजार...औरंगाबाद : एकीकडे दररोज सकाळीच भरणाऱ्या किरकोळ...
माळीनगरमध्ये आता नीरापासून गुळ उत्पादन लवंग, जि. सोलापूर : सध्या नीरा उत्पादनाचा हंगाम...
आरोग्य कर्मचाऱ्यासांठी सुरक्षेची पूर्ण...नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘कोरोना’...
अमरावती बाजार समितीची ३२ अडत्यांवर...अमरावती ः किरकोळ भाजी विक्री न करण्याचे आदेश...
‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा...मुंबई : ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा,...
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे...सोलापूर : कोरोना विषाणु संसर्गाच्या...
इस्लामपूरकरांना भाजीपाल्यासह साखरवाटप नवेखेड, जि. सांगली : बोरगाव (ता. वाळवा)...
राज्यातील अतिरिक्त १० लाख लिटर दूध...संगमनेर, जि.नगर : कोरोना विषाणूचा...