सोयाबीनचे एकरी ५१.७७ क्विंटल उच्चांकी उत्पादन!

जॉर्जिया येथील व्होलदोस्ता प्रांतामधील रॅंडी डाऊडी या शेतकऱ्याने गतवर्षी सोयाबीनचे एकरी ५१.७७ क्विंटल उत्पादन घेऊन जागतिक सर्वांत जास्त उत्पादनाचा विक्रम स्थापित केला आहे. २०१९ मध्ये सोयाबीन उत्पादन स्पर्धेमध्ये हा त्यांचा विक्रम नोंदवला गेला आहे.
सोयाबीनचे एकरी ५१.७७ क्विंटल उच्चांकी उत्पादन!
सोयाबीनचे एकरी ५१.७७ क्विंटल उच्चांकी उत्पादन!

जॉर्जिया येथील व्होलदोस्ता प्रांतामधील रॅंडी डाऊडी या शेतकऱ्याने गतवर्षी सोयाबीनचे एकरी ५१.७७ क्विंटल उत्पादन घेऊन जागतिक सर्वांत जास्त उत्पादनाचा विक्रम स्थापित केला आहे. २०१९ मध्ये सोयाबीन उत्पादन स्पर्धेमध्ये हा त्यांचा विक्रम नोंदवला गेला आहे.      रॅंडी डाऊडी यांच्याकडे १७०० एकर शेती असून, प्रामुख्याने सोयाबीन, मका आणि भुईमूग पिकाची शेती करतात. शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर, सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त चांगला वापर करून घेणे, पीक व्यवस्थापनातील अन्नद्रव्य व्यवस्थापनासह विविध घटकांचा काटेकोर वापर करणे याकडे त्यांचे लक्ष असते. उत्तम व्यवस्थापनामुळे सोयाबीनचे एकरी १९०.२३ बुशेल्स म्हणजेच एकरी ५१.७७ क्विंटल उत्पादन घेण्यामध्ये रॅंडी यांना यश आले आहे.      रॅंडी यांनी सोयाबीनची पेरणी मार्च महिना अखेर ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण केली. त्यांनी हेप्टी ४५x७ एस या वाणाची लागवड केली होती. या सोयाबीन जातीचा कालावधी १५० ते १६० दिवसांचा आहे. हवामान आणि जमिनीच्या प्रकारानुसार त्यात थोडाफार बदल होऊ शकतो. रॅंडी यांनी सोयाबीन पिकाच्या सिंचनासाठी सेंटर पिव्होट पद्धतीचा अवलंब केला आहे. अन्य सोयाबीन उत्पादकांशी तुलना ः

  • जागतिक पातळीवर सुमारे ९३ देशांमध्ये सोयाबीनची शेती केली जाते. त्यात ब्राझील, अमेरिका, अर्जेंटिना, चीन, भारत, पॅराग्वे, कॅनडा, युक्रेन, बोलीव्हिया, उरुग्वे हे प्रमुख सोयाबीन उत्पादक देश आहेत.
  • भारतामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान ही सोयाबीन उत्पादक प्रमुख राज्ये आहेत. भारतामध्ये सोयाबीन पिकाखाली ११३.९८८ लाख क्षेत्र असून, उत्पादकता ८६५ किलो प्रती हेक्‍टर एवढी आहे.
  • जागतिक पातळीवर सोयाबीन पिकाची उत्पादकता २७७० किलो प्रती हेक्‍टर (म्हणजेच २७.७० क्विंटल प्रती हेक्‍टर) आहे. महाराष्ट्राची सोयाबीनची उत्पादकता केवळ ११.८५ क्विंटल प्रती हेक्‍टर (म्हणजेच एकरी ४.७९ क्विंटल) आहे.
  • राज्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये सोयाबीन पिकाची मोठी लागवड होते. मात्र, हा पट्टा बहुतांश पावसावर अवलंबून (कोरडवाहू) असल्याने एकरी उत्पादन कमी राहते.
  • सिंचनाची सोय असलेल्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे उत्पादन जास्त मिळताना दिसते. काही शेतकरी सोयाबीनसाठी ठिबक सिंचनाचा अवलंब करीत आहेत. उदा. राडेवाडी, ता. पलूस येथील प्रशांत पाटील हे शेतकरी १० वर्षांपासून सातत्याने सोयाबीनचे एकरी २० ते २२ क्विंटल उत्पादन घेत आहेत. त्यांनी २०१६ मध्ये ठिबकवर एकरी २८ क्विंटल उत्पादन घेतले आहे. आपल्याकडे सोयाबीन जातीचा कालावधी १००-११० दिवस आहे. रॅंडी यांच्या जातीचा कालावधी १५० ते १६० दिवसांचा आहे. अर्थात, भारतामध्येही सोयाबीन पिकांमध्ये योग्य अन्नद्रव्य व सिंचन व्यवस्थानाकडे लक्ष दिल्यास उत्पादकता वाढीला मोठी संधी आहे.
  • सेंटर पिव्होट सिंचन पद्धती ः

  •  हा तुषार सिंचनाचा प्रकार आहे.
  • या पद्धतीला ओव्हर हेड अथवा हॅंगिंग स्प्रिंकलरही म्हणतात. या द्वारे पिकांना गोलाकार अथवा सरळ पद्धतीने सिंचन करता येते.
  • एकाच वेळी मोठ्या क्षेत्रास सिंचन करण्यासाठी उपयुक्त असून, प्राथमिक खर्च अधिक असला तरी प्रति एकरी खर्च कमी येतो.
  •  या यंत्रणा ३ ते ५ किलो प्रती चौ.सें.मी. दाबावर चालते. यातील नोझलचा थेंब सूक्ष्म असतो.
  • सेंटर पिव्होट पद्धतीने सिंचनासोबतच पीक संरक्षण व अन्नद्रव्यांची फवारणी शक्य होते. पाणी, मजुरी खर्च आणि वेळेमध्ये मोठी बचत होते.
  • त्याच प्रमाणे जमिनीवर वाफे, सरी वरंबा, कालवे करण्याची गरज राहत नाही. परिणामी जमिनीची धूप होत नाही.
  • परदेशामध्ये ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इस्राईल, ब्राझील, साऊथ आफ्रिका, सौदी अरेबिया, इथिओपिया, झांबिया, झिम्बाब्वे, जॉर्जिया, अर्जेंटिना अशा देशांमध्ये शेतांचा आकार मोठा असल्याने या सिंचन पद्धतीचा वापर होतो. भारतामध्ये शेतांचा आकार मर्यादीत असल्याने ही पद्धत फारशी वापरली जात नाही.
  • बी. डी. जडे, ९४२२७७४९८१ (वरिष्ठ कृषी विद्या शास्त्र, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com