agriculture stories in marathi Human ancestors may have eaten hard plant tissues without damaging teeth | Agrowon

माणसाचे प्राचीन पूर्वज खात झाडांचे कठीण भाग

वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

माणसांच्या प्राचीन पूर्वजांच्या आहारामध्ये झाडांचे कठीण भागही सध्याच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचे वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधनामध्ये आढळले आहे. मानवाच्या जीवाश्मांवरून उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये आहारामध्ये नेमका कशाप्रकारे बदल होत गेला, याविषयी अभ्यास करण्यात आला.

माणसांच्या प्राचीन पूर्वजांच्या आहारामध्ये झाडांचे कठीण भागही सध्याच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचे वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधनामध्ये आढळले आहे. मानवाच्या जीवाश्मांवरून उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये आहारामध्ये नेमका कशाप्रकारे बदल होत गेला, याविषयी अभ्यास करण्यात आला.

कोणत्याही प्राण्यांच्या आहारातील घटकांचा परिणाम त्यांच्या दातावर होत असतो. त्यात विशेषतः खातेवेळी होणाऱ्या इजा, जखमा, तुकडे पडणे यांचाही समावेश असतो. त्याचप्रमाणे जे खाल्ले जाते, त्यानुसार दातांच्या इनॅमलवर सूक्ष्मजीवशास्त्रीय परिणामही होतात. या साऱ्या घटकांच्या अभ्यासातून वॉशिंग्टन विद्यापीठातील जैविक पुरातत्त्व संशोधक अॅडम व्हॅन कॅश्टेरेन व भौतिक पुरातत्त्व संशोधक प्रो. डेव्हिड ए. स्ट्रेट यांनी काढलेले निष्कर्ष सायंटिफिक रिपोर्टसमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

कठीण कवचाची फळे, बिया आणि वनस्पतींचे अंश यांचे दाताच्या पोतावर परिणाम होतात. त्यामध्ये सूक्ष्म असे खड्डे पडतात. आफ्रिकेमध्ये सुमारे ७० लाख वर्षांपूर्वी माकडे किंवा कपिवर्गीय प्राण्यांपासून मानवाची उत्क्रांती होत गेली. या प्राचीन पूर्वज प्रजातींचे दात मोठे, जबड्यांचे स्नायू अधिक मोठे असले पाहिजेत. मात्र, बहुतांश ऑस्ट्रेलोपाथ जीवाश्मांमध्ये अशा खुणा दिसत नसल्याने अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. त्यामुळे याची तपासणी करण्याचा निर्णय संशोधकांनी घेतला.

अभ्यासाचे फायदे...

पूर्वीच्या एका अभ्यासामध्ये दाताच्या सपाट पृष्ठभागावर ग्रीट म्हणजेच दगडाच्या लहान कणांच्या परिणामांचा अभ्यास केला होता. मात्र, वनस्पतीच्या कठीण भागांच्या संपर्कामुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास झाला नव्हता. त्यासाठी सध्याच्या या माकडांच्या जातीच्या आहारामध्ये असलेल्या तीन प्रकारच्या बियांच्या कठीण कवचांचा वापर करण्यात आला. त्यामुळे दातांच्या इनॅमलमध्ये मोठे खड्डे, चरे पडत नाहीत किंवा तडे जात नाहीत, हे स्पष्ट झाले. या संशोधनामुळे भविष्यातील जीवाश्मांतील दातावरील लक्षणांनुसार त्यांच्या आहाराविषयी अधिक मूलभूत माहिती मिळवणे सोपे जाणार आहे.

 


इतर ताज्या घडामोडी
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...
निर्यातबंदीमुळे कांदा फुगवटा;...पुणे: कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने...
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...