agriculture stories in Marathi Ice cream from sapota | Agrowon

चिकूपासून बनवा आइस्क्रीम

सचिन शेळके
सोमवार, 27 जुलै 2020

नोव्हेंबर महिन्यापासून जास्त प्रमाणात चिकू फळांची आवक होते. चिकू गरापासून आइस्क्रीम तयार करणे शक्य असून, त्याला बाजारात चांगली मागणी आहे.

आइस्क्रीम हा लहानथोराच्या आवडीचा विषय आहे. त्याला चिकू  (शा. नाव ः मैनिलकारा जपोटा) सारख्या गोड, थंड आणि भरपूर औषधी गुणधर्माने युक्त फळांची जोड दिल्यास फायदेशीर ठरू शकते. यातून पिकल्यानंतर अल्पायुषी असलेल्या या फळाला चांगले मूल्य मिळण्यासही मदत होते.
       चिकूमध्ये ग्लुकोज व फ्रुक्टोजयुक्त शर्करेचे प्रमाण जास्त (१२ ते १४ टक्के) असते. सुक्रोजचे प्रमाण फक्त दोन टक्के असते. यामुळे त्यापासून तयार केलेल्या आइस्क्रीममध्ये गोडवा आणणारे अन्य पदार्थ कमी वापरावे लागतात. चिकूतील अँटीऑक्सिडेन्ट घटक आणि भरपूर प्रमाणातील लोह, क जीवनसत्त्व आणि पोटॅशिअम, तंतुमय पदार्थ हे आइस्क्रीमची पोषकता वाढवतात.

चिकू आइस्क्रीम ः

 • मिक्सरमधून काढलेला चिकूचा गर मसलीन कापडामधून गाळून घ्यावा.
 • ५०० मि.ली. दूध, २५० ग्रॅम साखर, ५० ग्रॅम दूध पावडर एकत्र करून गॅसवर १० मिनिटे ठेवून सतत हलवत राहावे.
 • मिश्रण थंड झाल्यानंतर फ्रिजमध्ये ८ तासासाठी ठेवावे. चांगल्या प्रकारे फेटावे.
 • नंतर २०० ग्रॅम चिकूचा गर मिसळावा. पुन्हा १० मिनिटे चांगले फेटून घ्यावे.
 • नंतर राहिलेला २०० ग्रॅम चिकूचा दर मिसळून चांगले एकजीव करावे.
 • मिश्रण हवाबंद डब्यात ठेवावे.
 • हा डबा ८ ते १० तास फ्रिजरमध्ये ठेवावा.
 • त्यानंतर तयार झालेल्या थंड चिकू आइस्क्रीमचा आस्वाद दीर्घकाळापर्यंत घेऊ शकतो.

चिकू चटणी ः

 • ३५० ग्रॅम चिकूचे बारीक तुकडे करून घ्यावेत.
 • त्यामध्ये १० ग्रॅम मीठ, १० ग्रॅम जिरेपूड , ४ ते ५ हिरव्या मिरच्या, ७ ते ८ लसूण पाकळ्या, २५ ग्रॅम कोथिंबीर व ३५ ग्रॅम चिंच हे सर्व साहित्य एकत्र मिसळून घ्यावे.
 • या मिश्रणाची मिक्‍सरमध्ये चटणी वाटून घ्यावी. ही चटणी चवदार लागते.
 • घरातील सर्वांना चटकदार चटणी नक्कीच आवडते.

इतर कृषी प्रक्रिया
लघू प्रक्रिया उद्योगांना चांगली संधीलघू उद्योगासाठी बँकेकडून कर्ज मिळविण्यासाठी...
ड्रॅगन फळापासून कॉर्डीयल, स्क्वॅश...ड्रॅगन फळ हे हायलोसेरियस आणि सेलेनेसियस या...
खपली गहू बिस्किटे, हळद पावडर उद्योगात...दसनूर (जि.जळगाव) येथील वैशाली प्रभाकर पाटील यांनी...
मखानापासून बनवा बर्फी, लाह्या अन् चिक्कीदलदलीच्या क्षेत्रात उगवणारे मखाना हे भरपूर...
कृषी क्षेत्रामध्ये आहेत व्यावसायिक संधीव्यावसायिक संधी म्हणून शेती व संलग्न बाबींकडे...
चिकूपासून बनवा आइस्क्रीमआइस्क्रीम हा लहानथोराच्या आवडीचा विषय आहे. त्याला...
पपईपासून पेपन,पेक्टिन निर्मितीपपईचे फळ पचनास मदत करते. त्याचा गर व बिया औषधी...
भोपळ्यापासून बर्फी, चिक्कीभोपळा हृदयरोगांसाठी  उपयुक्त आहे. यातील घटक...
चिकूपासून बनवा मूल्यवर्धित पदार्थचिकू  (शा. नाव ः मैनिलकारा जपोटा) हे गोड,...
प्रक्रिया उद्योगातही मशरूमला मागणीवाळवलेल्या मशरूमला बाजारपेठेत चांगली मागणी आणि...
शेळीच्या दुधापासून दही, लोणी, चीज, मलईशेळीचे दूध पचनास हलके असते. शेळीच्या दुधापासून...
श्रीवर्धनी सुपारीचे संवर्धन आवश्यकसुपारी हे परपरागीकरण होणारे झाड असल्याने...
फणसामध्ये आहे प्रक्रिया उद्योगाची संधीफणसातील गरे तसेच बिया खाण्यायोग्य असून गरापासून...
फणसापासून तयार करा खाकरा, केक अन् लोणचेविविध पदार्थांचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी फणस बी...
प्रक्रिया उद्योगात गवती चहाला मागणीगवती चहामध्ये अत्यावश्यक तेल असते. हे तेल सुगंधीत...
बहुगुणी शेवग्याचे मूल्यवर्धित पदार्थशेवग्यामध्ये उच्च पौष्टिक आणि औषधी मूल्य आहेत....
प्रक्रिया अन् आरोग्यासाठी शेवगाशेवग्याचे मूळ, फूल, पाने व साल यांचा वापर...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारे मेगा...शेतकरी, प्रक्रिया करणारे आणि किरकोळ विक्रेत्यांना...
कोकमपासून प्रक्रियायुक्त पदार्थकोकम फळ कच्चे असताना व पिकून लाल रंगाचे झाल्यावर...
करवंदापासून बनवा चटणी,जॅम, लोणचेकरवंद प्रक्रियेसाठी मोठ्या भांडवली गुंतवणुकीची...