agriculture stories in marathi, Icrisat, poly mulching technique use in ground nut | Page 2 ||| Agrowon

अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांनी स्विकारले पॉली मल्चिंगसह इक्रिसॅट तंत्र

भारत कुशारे 
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

खरिपात भात व पुढे डिसेंबरच्या सुमारास भुईमूग अशा पीक पद्धतीचा अवलंब पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. कोसबाड हिल, डहाणू येथील कृषी विज्ञान केंद्राने आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी भुईमुगाच्या यशस्वी शेतीसाठी पॉली मल्चिंग व इक्रिसॅट तंत्रज्ञान रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. इच्छाशक्ती, जिद्द आणि प्रतिकूल परिस्थितीतही तंत्रज्ञान आत्मसात करण्याची आस या गुणांद्वारे भोयेपाडा मोर्हडा (जि. पालघर) या दुर्गम भागातील पांडुरंग देवराम चौधरी यांनी उन्हाळी भुईमूग लागवड यशस्वी करून त्यास मार्केटही मिळवले आहे. 
 

खरिपात भात व पुढे डिसेंबरच्या सुमारास भुईमूग अशा पीक पद्धतीचा अवलंब पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. कोसबाड हिल, डहाणू येथील कृषी विज्ञान केंद्राने आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी भुईमुगाच्या यशस्वी शेतीसाठी पॉली मल्चिंग व इक्रिसॅट तंत्रज्ञान रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. इच्छाशक्ती, जिद्द आणि प्रतिकूल परिस्थितीतही तंत्रज्ञान आत्मसात करण्याची आस या गुणांद्वारे भोयेपाडा मोर्हडा (जि. पालघर) या दुर्गम भागातील पांडुरंग देवराम चौधरी यांनी उन्हाळी भुईमूग लागवड यशस्वी करून त्यास मार्केटही मिळवले आहे. 
 
पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. सरासरी २५०० मिमी पाऊस पडतो. शेती प्रामुख्याने खरिपातच केली जाते. जिल्ह्यातील दुर्गम आणि पूर्णतः आदिवासी लोकवस्तीच्या मोखाडा तालुक्यातील भोयेपाडा मोर्हडा गावदेखील दुर्गम आणि जंगलाने वेढलेले आहे. पालघरपासून सुमारे ११० किलोमीटरवर वसलेल्या या गावात प्रगतिशील शेती करणे आव्हानात्मक असते. खरिपात पावसाच्या पाण्यावर भात, नागली, वरई, उडीद ही पिके घेतली जातात. खरीप संपल्यानंतर रोजगारासाठी गावातील बहुसंख्य तरुण मुंबई, नाशिक येथे स्थलांतर करतात. 

चौधरी यांची शेती 
गावातील पांडुरंग चौधरी यांना आर्थिक गरीब परिस्थितीमुळे पाचवीच्या पुढे शिक्षण घेता आले नाही. लहान वयात शेतीची जबाबदारी आली. आज त्यांचे वय ३३ वर्षे आहे. आई श्रीमती रखमा, पत्नी सौ. विमल तर गौरव, भारत व गायत्री ही मुले असा त्यांचा परिवार आहे. त्यांची सहा एकर शेती असून त्यात ते खरिपात भात, नागली, खुरासणी ही पिके घेतात. गावाजवळ धरण आहे. खरिपानंतर १०-१५ गुंठ्यात धरणाच्या पाण्यावर ते मिरची घेतात. उर्वरित क्षेत्र ओसाड असते. मिरचीचे अर्थकारण फारसे समाधानकारक नव्हते. 

केव्हीकेने दाखविला मार्ग 
सन २०१४ मध्ये कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), कोसबाड हिल, डहाणू, जि. पालघर यांनी भोयेपाडा तुळ्याचा पाडा (मोर्हंडा) गावाचे सर्वेक्षण करीत प्रमुख समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी भात, नागली, खुरासणी, परसबाग, कोंबडीपालन आदी प्रात्यक्षिके राबवण्याचे ठरवले. भांडवलाची कमतरता, बाजारपेठेचा अभाव, लागवड पद्धतीच्या माहितीचा अभाव या बाबी समोर होत्या. मात्र येथील शेतकऱ्यांत प्रगतिशील शेती करण्याची जिद्द व क्षमता पाहाता या समस्यांवर मात करणे शक्य होते. हीच बाब जाणून केव्हीकेचे तज्ज्ञ भारत कुशारे यांनी खरीप भातानंतर भुईमुगाचे पर्यायी पीक घेण्याचा मार्ग या शेतकऱ्यांना दाखविला. त्यानुसार पांडुरंग यांनी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांना एकत्र केले. कुशारे यांनी तंत्रज्ञान प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. 

लागवड तंत्रज्ञान नियोजन 

 • भात-भुईमूग पीक पद्धती राबवण्यासाठी पाणी व बाजारपेठेच्या अंदाजानुसार डिसेंबर २०१५ 
 • मध्ये भुईमूग लागवडीचे नियोजन केले. थंडीमुळे उगवण होण्यास अडचण येऊ नये म्हणून पॉली मल्चिंगचा वापर केला. सन २०१६ पासून इक्रिसॅट तंत्राचा वापर एक एकरात सुरू झाला. आता अडीच एकरांत लागवड होते. 

पांडुरंग यांची शेतीची वैशिष्ट्ये 

 • सहा एकरांपैकी खरिपात दोन एकर भात, एक एकर नागली, खुरासणी, उडीद. एक एकर वरकस 
 • जमिनीवर काजू व आंबा. उन्हाळी भुईमूग २.५ एकर 
 • इक्रिसॅट तंत्रज्ञानाचा भुईमूग लागवडीसाठी अवलंब 
 • अधिक उत्पादन देणाऱ्या जातींचा तसेच ठिबकचा वापर 
 • परिसरात भुईमूग पीक नवे असल्याने कीड- रोगांचे प्रमाण कमी 
 • खते व पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन 

भात –भुईमूग पीक पद्धतीचे चौधरींना झालेले फायदे 

 • जमिनीचा पोत सुधारला. 
 • भुईमुगाचा पाला जनावरांसाठी उपलब्ध झाला. 
 • सरासरी ११० ते ११५ दिवसांचा रोजगार उन्हाळी हंगामात उपलब्ध झाला. 
 • कुटुंबाचे रोजगारासाठीचे स्थलांतर थांबले. 
 • भुईमुगाचा नगदी पर्याय मिळाल्याने कुटुंबाची आर्थिक घडी मजबूत झाली. 
 • जमीन मध्यम प्रकारची, उत्तम निचरा होणारी, थोडी लालसर आणि सामू कमी असल्याने 
 • भुईमुगास योग्य ठरली. 
 • भुईमुगामुळे जमिनीचा पोत सुधारून खरिपात भाताचे उत्पादन वाढण्यास मदत झाली. 
 • घरासाठी खाद्यतेलाचा प्रश्न सुटला. 

असे आहे इक्रिसॅट तंत्र 

 • रुंद वरंबा आणि सरी पद्धत (गादी वाफा) 
 • रुंद वरंबा तयार करण्यासाठी लांबी जमिनीच्या उताराप्रमाणे ९ ते १५ मीटर आणि वरंब्याची रुंदी ९० सेंमी जमिनीच्या मगदुराप्रमाणे ठेवली. 
 • वरंब्याच्या दोन्ही बाजूस १५ सेंमी रुंदीच्या सऱ्या. वरंब्याची उंची १५ सेंमी. 
 • बियाण्याची ३० बाय १० सेंमी. अंतरावर टोकण. 
 • स्प्रिंकलर वा ड्रीप वापरल्यास ९० सेंमी. गादीवाफाही येतो. 

या तंत्राचे फायदे 

 • गादीवाफ्यावरील जमीन भुसभुशीत राहते. त्यामुळे मुळांची कार्यक्षमता वाढून पिकाची वाढ जोमदार होते. 
 • जमिनीत पाणी व हवा यांचे प्रमाण संतुलित ठेवता येते. त्यामुळे पिकाची कार्यक्षमता वाढते. 
 • पिकास पाण्याचा ताण बसत नाही. जास्त पाणी दिल्यामुळे सरीतून पाण्याचा निचरा करता येतो. 
 • तुषार सिंचनाद्वारे तसेच पाटाने पाणी देता येते. 
 • पिकाची आणि शेंगांची वाढ एकसारखी होते. 
 • जमिनीत आऱ्या सहज घुसून शेंगा पोसतात. दाणे व्यवस्थित भरले जातात. 
 • संतुलित खत व्यवस्थापन केल्याने अन्नद्रव्ये कमतरता लक्षणे दिसत नाहीत. पिकाची योग्य वाढ होऊन उत्पादनात वाढ होते.
 • पीक काढणीच्या वेळी वेल सहज उपटले जातात. शेंगा जमिनीत राहात नाहीत. 

बीजप्रक्रिया 

 • पेरणीपूर्वी दोन ग्रॅम कार्बेन्डॅझिम प्रति किलो बियाणे प्रक्रिया 
 • एकरी ४० किलो बियाण्याचा वापर 
 • टी.ए.जी.२४, टी. जी.३८ व टी.जी ३९ (मोठे दाणे) या उपट्या प्रकारातील जातींची निवड 
 • एकरी १० किलो नत्र, २० किलो स्फुरद पेरणीच्या वेळी. २२ किलो युरिया आणि १२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून. 
 • शेणखत दिल्याने सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज कमी झाली. 
 • उन्हाळी हंगामात ८ ते १० दिवसाच्या अंतराने १२ वेळेस ड्रीपने पाणी, 
 • विशेषतः फांद्या फुटण्याची, आऱ्या उतरण्याची व शेंगा भरण्याची अवस्था या वेळेस पाणी देण्याची विशेष काळजी घेतली. 
 • शेंगा भरण्याच्या अवस्थेवेळी कॅल्शियमची फवारणी 

उत्पादन (क्विंटल प्रति एकर) 

वर्ष तंत्रवापर वाण ओले उत्पादन सुके उत्पादन पाला उत्पादन 
२०१६ पॉली मल्चिंग टी.ए.जी.२४ २७ १७ २८ 
२०१७ इक्रिसॅट टी.जी.३८ १८ ११ २० 
२०१८ इक्रिसॅट टी.जी ३९ २३.५ १५ २५ 
२०१९ इक्रिसॅट टी.जी ३९ २२ १४.३ २३

उत्पादन खर्च- एकरी- २५ हजार रुपयांपर्यंत 
सरासरी दर (प्रति किलो) 
४० रुपये- वाळलेल्या शेंगा 
३० रुपये ओल्या शेंगा. 

विक्री व्यवस्था 

 • ओल्या शेंगांना मागणी जास्त असल्याने पांडुरंग त्यांच्याच विक्रीवर अधिक भर देतात. 
 • नाशिक, मुंबई, त्र्यंबकेश्‍वर येथील आठवडी बाजारात विक्री केली. मात्र यंदा नारायणगाव (जि. पुणे) येथील एका कंपनीला किलोला ५५ रु. दराने वाळलेल्या शेंगांची विक्री केली. यासाठी जव्हार येथील संस्थेने मदत केली. 

समस्या 
पॉली मल्चिंग पेपरची जास्त किंमत तसेच आदिवासी भागात तो उपलब्ध होणे कठीण झाले. 
पीक काढणीनंतर प्लास्टिक शिल्लक राहत असल्याने जनावरांना चारा म्हणून उपयोग करण्यात अडचण येते. 

(लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, डहाणू, जि. पालघर केव्हीके येथे विषय विशेषज्ज्ञ आहेत.) 
संपर्क- ९८५०२६०३५५ 

उन्हाळी भुईमुगाने पैसे चांगले दिलेच, पण रोजगारासाठीचे स्थलांतर थांबले. इक्रिसॅट तंत्र व सूक्ष्म सिंचनाचा वापर केल्यास उत्पादनात दीडपट ते दुपटीने फरक पडला. पूर्वी कुडाच्या घरात राहायचो. सुधारीत शेतीतून पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. 
- पांडुरंग चौधरी 
९७६६४८१६४५ 


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
कांदा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेकांदा वाळवून कांद्याच्या फ्लेक्स, चिप्स, चकत्या,...
दुचाकीला ट्रॉलीचे जुगाड अन् सुरू झाला...बीड : शेतात सालदार म्हणून काम करणाऱ्या सचिन...
हवामान अनुकूल रुंद वरंबा सरी तंत्रज्ञानबदलत्या हवामानामध्ये राज्यातील प्रमुख पिकांसाठी...
यांत्रिक पद्धतीने भात लागवड ठरतेय...चांदखेड (ता. मावळ जि. पुणे) परिसरातील वाढत्या...
पशुआहारातील घटकांची तपासणी महत्वाचीआपल्याला उपलब्ध झालेला पशुआहार किंवा त्यासाठी...
काजूगर निर्मितीचा स्वयंचलित अत्याधुनिक...रत्नागिरी जिल्ह्यात गव्हाणे येथे रत्नागिरी कृषी...
आंतरमशागतीसाठी अवजारे ठरतात फायदेशीरतण नियंत्रणासाठी दातेरी हात कोळपे, सायकल कोळपे,...
नारळ काढणी, सोलण्यासाठी यंत्रे फायदेशीर नारळ काढणी, झावळ्यांची स्वच्छता, कीडनाशक फवारणी...
कमी खर्चातील सौर ऊर्जा आधारीत...ग्रामीण भागातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी...
जांभूळ प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक...औषधी गुणधर्म असूनही व्यावसायिक तत्त्वावरील लागवड...
यंत्राद्वारे कमी खर्चात भात पेरणी शक्यभाताची रोपवाटिका करणे, जगवणे, रोपांची वाहतूक,...
एका कुटुंबासाठी स्वयंपूर्ण शिवार वसाहतअर्धा एकर शेतजमीन (दोन हजार चौ.मी. सूर्यप्रकाश) व...
कोरडवाहू सोयाबीनसाठी नावीण्यपूर्ण पेरणी...कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीनच्या लागवडीसाठी जोळओळ...
सुधारीत वाण, एकात्मिक तंत्रज्ञानातून...तेलबियांचे घटते क्षेत्र, उत्पादकतेची समस्या...
यंत्राद्वारे भात रोपांची लावणीभात लावणी यंत्राचे वॉकिंग टाईप आणि रायडींग टाईप...
भात पेरणीसाठी सुधारित यंत्रेभात लागवडीसाठी सुधारित यंत्राचा वापर फायदेशीर...
पेरणी यंत्राद्वारे पेरणी करताना...प्रशिक्षित ट्रॅक्‍टरचालक हवा    ...
जनावरांतील निदानासाठी क्ष-किरण तपासणीक्ष-किरण तपासणीद्वारे जनावरांतील जठराचा दाह,...
कामाच्या स्वरूपानुसार करा ट्रॅक्टरची...आज बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे व क्षमतेचे...
रासायनिक खतातील भेसळ कशी ओळखाल?खरीप हंगामातील पेरणीला सुरवात होणार असून, शेतकरी...