agriculture stories in marathi IDEAL AWARD CEREMONY FOR FARMERS | Agrowon

आयडियल फाउंडेशनतर्फे ४१ शेतकऱ्यांचा पुरस्काराने सन्मान 
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

जालना : निसर्गाशी झुंज देत शेती उत्पादनाचे शिखर गाठणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचे काम 'आयडियल'च आहे. हा सोहळा मराठवाड्यातील जालनासारख्या ठिकाणी घेऊन या भागातील शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याचे कौतुकास्पद काम आयडियल फाउंडेशनने केले आहे, असे मत पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले.

जालना : निसर्गाशी झुंज देत शेती उत्पादनाचे शिखर गाठणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचे काम 'आयडियल'च आहे. हा सोहळा मराठवाड्यातील जालनासारख्या ठिकाणी घेऊन या भागातील शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याचे कौतुकास्पद काम आयडियल फाउंडेशनने केले आहे, असे मत पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले.

सांगली येथील आयडियल फाउंडेशनतर्फे जालना येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटकाच्या विविध भागातून प्रतिकूल परिस्थितीत चांगले उत्पादन घेणाऱ्या ४१ शेतकऱ्यांचा यावेळी आयडियल फार्मर ॲवॉर्डने सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ, कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत, जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, आयडियल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश औताडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

सिंधूताई सकपाळ म्हणाल्या, पुरुष शेतकऱ्यांबरोबर महिला शेतकऱ्यांचाही सन्मान या सोहळ्यात होत असून, ही खूप आनंददायी बाब आहे.

कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले, की शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव देण्यासाठी व आयात शुल्क वाढवून निर्यातीस चालना देण्यासाठी कृषिमूल्य आयोग सक्रिय आहे. याचे निश्‍चित चांगले परिणाम दिसतील. 
यावेळी डॉ. एस. डी. सावंत यांनी द्राक्ष, डाळिंब यासह भाजीपाला पीक उत्पादनवाढीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

आयडियल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश औताडे यांनी शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी दिली. फाउंडेशनचे उपाध्यक्ष वैभव जाधव यांनी प्रास्ताविक तर आयडियल ॲग्री सर्चचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पाटील यांनी आभार मानले. 

इतर बातम्या
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
मांजरपाड्याचे पाणी दरसवाडी धरणात पोचलेनाशिक : येवल्याच्या दुष्काळी भागात पाणी...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...