agriculture stories in Marathi Identify the lesions in tomatoes | Agrowon

वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृती

योगेश भगुरे
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

भाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक असतात. वातावरणातील बदल, अन्नद्रव्याची कमतरता अशा बाबींमुळे पिके शारीरिक विकृतीला बळी पडतात. टोमॅटो पिकातील शारिरीक विकृतीविषयी माहिती घेऊ.

भाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक असतात. वातावरणातील बदल, अन्नद्रव्याची कमतरता अशा बाबींमुळे पिके शारीरिक विकृतीला बळी पडतात. टोमॅटो पिकातील शारिरीक विकृतीविषयी माहिती घेऊ.

पिकातील शारीरिक विकृतीमागे वातावरणातील बदल आणि अन्नद्रव्यांची कमतरता ही प्रमुख कारे आहे. वातावरणातील जास्त तापमान, कमी तापमान, जास्त पाऊस किंवा पावसाचा खंड, अन्नद्रव्यांची कमतरता, जमिनीतील कमी - जास्त ओल ही कारणे महत्त्वाची ठरतात. काही वेळा रोग - किडींचा प्रादुर्भाव व शारीरिक विकृती यांची लक्षणे ओळखणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. लक्षणे न ओळखता केलेल्या फवारणीमुळे खर्चात वाढ होते. समस्याही सुटत नाही. टोमॅटो पिकांतील शारीरिक विकृतीची ओळख व त्यामागील कारणांचा शोध घेणे गरजेचे असते. ही कारणे दूर करण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात.

१) फळ तडकणे (फ्रूट क्रॅकींग) ः
फळ तडकने ही टोमॅटो पिकामध्ये जास्त प्रमाणात आढळून येणारी विकृती आहे. फळ पक्वतेच्या अवस्थेत जास्त ऊन, अचानक जास्त पाऊस किंवा जास्त पाणी देणे यामुळे जमिनीतील ओलाव्यात मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे फळ तडकते.
कारणे ः या फळांमध्ये बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता, आनुवंशिक गुणधर्म इ. कारणांमुळे ही समस्या दिसून येते.
उपाययोजना ः

 • जमिनीचे मातीपरिक्षण करून त्या आधारे अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे.
 • प्रतिकारक्षम जातींचा लागवडीसाठी उपयोग करावा. उदा. अर्का सौरभ, अर्का विशाल, पुसा केसरी इ.
 • लागवडीसाठी गादीवाफा व ठिबक सिंचन यांचा वापर करावा.
 • पाणी नियोजन योग्य प्रकारे करावे .
 • माती परिक्षणामध्ये बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास लागवडीवेळी १५ ते २० किलो प्रती हेक्टर बोरॅक्स द्यावे. फवारणीद्वारे ०.५ ते १ ग्रॅम प्रती लीटर पाणी यानुसार पूर्तता करावी.

२) कळीच्या शेवटी सडणे (ब्लॉसम एंड रॉट) ः
या विकृतीमध्ये सुरवातीच्या काळात फळाच्या खालील बाजूला तपकिरी रंगाचा ठिपका दिसून येतो. नंतर हा ठिपका मोठा होऊन तो भाग कुजतो. अशी फळे विक्री योग्य राहत नाही.
कारण ः कॅल्शिअमची कमतरता या विकृतीस कारणीभूत ठरते.
उपाय ः

 • खतांचा संतुलित वापर करावा.
 • गरजेनुसार चिलेटेड कॅल्शिअम ०.५ ते १ ग्रॅम किंवा कॅल्शिअम क्लोराइड २ ते २.५ ग्रॅम प्रती लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

३) फळांवर चट्टे पडणे ः
टोमॅटो फळांच्या उन्हाकडील बाजूवर जास्त उन्हामुळे पांढरट चट्टे पडतात, नंतर तो भाग सुकतो. अशा फळांना बाजारात कमी भाव मिळतो.
उपाय ः

 • लागवडीसाठी जास्त फांद्या व दाट पाने असलेल्या जातींची निवड करावी. उदा. पंजाब चुहारा ही दाट पानांची जात आहे.
 • बांधणी करताना फळे सावलीत राहतील, अशाप्रकारे बांधणी करावी.
 • कीड व रोगांचा वेळीच बंदोबस्त करावा. म्हणजे पानगळ होणार नाही.

४) फळ पोकळ पडणे (पफीनेस) ः
यामध्ये फळाची बाहेरून वाढ ही सामान्य असते. मात्र, फळ आतमध्ये पोकळ असते. त्यात गर कमी असतो. अशी फळे वजनाला हलकी असतात. यामुळे एकूण उत्पादनात घट येते.
कारणे ः जास्त तापमान, योग्यप्रकारे परगीभवन न होणे इ. कारणांमुळे ही समस्या येते.
उपाय ः

 • खतांचा संतुलित वापर करावा.
 • अतिरिक्त पाणी देणे टाळावे .

५) कॅटफेस ः
या विकृतीमध्ये फळांचा आकार मांजरीच्या तोंडासारखा होतो. अशा फळांना बाजारात भाव कमी मिळतो.
कारण ः फुले लागण्याच्या अवस्थेत थंड व ढगाळ वातावरण असल्यास ही समस्या दिसून येते.
उपाय ः
स्वच्छ सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर या विकृतीचे बऱ्यापैकी नियंत्रण होते.

६) ब्लॉची रायपनिंग ः
या विकृतीमध्ये फळे परिपक्व होत असताना आकर्षक लाल रंग न येता फळे हिरवट पांढरी व लालसर दिसतात. याला शेतकरी तिरंगा नावानेही ओळखतात. अशा फळांना बाजारात दर कमी मिळतो.
कारणे ः ढगाळ, थंड, धुके असलेले वातावरण, रिमझिम पाऊस इ. कारणांमुळे ही विकृती दिसून येते.
उपाय ः

 • सहनशील जातीचा लागवडीसाठी वापर करावा. उदा. पुसा रोहिणी, पुसा सदाबहार, अर्का वरदान इ.
 • माती परीक्षणांनुसार अन्नद्रव्याचा संतुलित वापर करावा. नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर टाळावा.

योगेश भगुरे, ९९२२४१४८७३
(साहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, के.डी.एस.पी कृषी महाविद्यालय, नाशिक.)


फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...