शेतात घेतलेल्या तुतीच्या पिकावरच रेशीम अळ्यांचे संगोपन करून कोषांचे उत्पादन घेतले जाते.
टेक्नोवन
काकडीच्या सालापासून पर्यावरणपूरक पॅकेजिंग
खरगपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी) संशोधकांनी काकडीच्या सालापासून सेल्युलोजचे अतिसूक्ष्म स्फटिक (सेल्युलोज नॅनो क्रिस्टल) तयार केले आहेत.
खरगपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी) संशोधकांनी काकडीच्या सालापासून सेल्युलोजचे अतिसूक्ष्म स्फटिक (सेल्युलोज नॅनो क्रिस्टल) तयार केले आहेत. या स्फटिकांद्वारे पर्यावरणपूरक पॅकेजिंग तयार करणे शक्य होणार आहे.
सध्या कोणत्याही गोष्टीसाठी प्लॅस्टिकचा वापर वेगाने वाढत आहेत. त्यातही एकदा वापरून टाकून देण्याच्या प्लॅस्टिक पॅकिंगमुळे पर्यावरणाला धोका पोचत आहे. प्लॅस्टिकच्या अतिसूक्ष्म कणांचे प्रदूषण विविध खाद्यांमध्ये होत आहे. त्याच प्रमाणे जलचरासह मुक्या प्राण्यांच्या शरीरातही प्लॅस्टिकचे प्रमाण वाढत असल्याचे अनेक संशोधनांमधून पुढे आले आहे. या प्लॅस्टिकला पर्यावरणपूरक पर्याय शोधण्याचे काम जगभरामध्ये केले जात आहे. खरगपूर (पश्चिम बंगाल) येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील प्रो. डॉ. जयिता मित्रा आणि संशोधक एन. साई प्रसन्ना यांनी या विषयावर संशोधन केले आहे. त्या विषयी माहिती देताना डॉ. मित्रा म्हणाले, की प्रक्रिया उद्योगामध्ये काकडीची साल मोठ्या प्रमाणात बाहेर पडते. काकडीची साल आणि शिल्लक राहणारे तुकडे यांचे प्रमाण १२ टक्क्यांपर्यंत असते. या सालीत सेल्युलोज अर्क आम्ही वेगळा केला असून, त्यापासून उत्तम दर्जाचे ताकदवान, पुनर्वापरयोग्य आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे पॅकेजिंग बनवणे शक्य आहे.
प्रक्रिया उद्योगामध्ये विविध पदार्थांच्या साली व अन्य भाग फेकून दिले जातात. त्यातील काकडीच्या सालीमध्ये सेल्युलोजचे प्रमाण सर्वाधिक (१८.२२ टक्के) आढळले आहे. त्यापासून पर्यावरणपूरक असे उत्तम प्रकारचे प्लॅस्टिकसदृश पॅकिंग घटक तयार करणे शक्य आहे. भविष्यामध्ये यापासून कागद, आवरणे, जैविक संयुगे आणि एकदम पारदर्शक फिल्म तयार करता येईल. जैविक पॉलिमर या क्षेत्रामध्ये प्रचंड संधी निर्माण होणार आहेत.
- 1 of 21
- ››