agriculture stories in marathi Improved sowing technique gives more harvest | Agrowon

सुधारित पेरणी पद्धतीने मिळवली उत्पादनात वाढ

जितेंद्र दुर्गे
बुधवार, 17 जून 2020

अकोला जिल्ह्यातील निंभा (ता. मुर्तिजापूर) येथील गजाननराव किसनराव ईसाळ यांनी गेल्या वर्षी बीटी कपाशीची सुधारीत जोड ओळ पद्धतीने, तर सोयाबीनची सोड ओळ(पट्टा पेर) पद्धतीने पेरणी केली. या सुधारित तंत्र व योग्य व्यवस्थापनामुळे कपाशीच्या उत्पादनात एकरी ७ क्विंटलने, तर सोयाबीनच्या उत्पादनात एकरी २ क्विंटलने वाढ झाली.

अकोला जिल्ह्यातील निंभा (ता. मुर्तिजापूर) येथील गजाननराव किसनराव ईसाळ यांनी गेल्या वर्षी बीटी कपाशीची सुधारीत जोड ओळ पद्धतीने, तर सोयाबीनची सोड ओळ(पट्टा पेर) पद्धतीने पेरणी केली. या सुधारित तंत्र व योग्य व्यवस्थापनामुळे कपाशीच्या उत्पादनात एकरी ७ क्विंटलने, तर सोयाबीनच्या उत्पादनात एकरी २ क्विंटलने वाढ झाली.

गेल्या वर्षी उन्हाळ्यातील तीव्र पाणी टंचाई व पावसाचे उशिरा आगमन यामुळे खरिपाच्या सर्वच पिकांच्या पेरण्या उशिरा (२५ जून पासून तर तब्बल ५ ते १० जुलै पर्यंत) झाल्या. अशा संकटकाळात अकोला जिल्ह्यातील निंभा (ता. मुर्तिजापूर) येथील गजाननराव किसनराव ईसाळ यांनी कपाशी लागवडीचे नियोजन सुरू केले. त्याच वेळी जांभा खुर्द गावामध्ये श्री. चक्रपाणी शेतकरी बचत गट व नामदेव महाराज ॲग्रो प्रोड्युसर कंपनी यांनी आयोजित केलेल्या खरीपपुर्व शेतकरी कार्यशाळेमध्ये गजाननराव यांना बीटी कपाशीची जोडओळ पद्धत, सोयाबीन सोड ओळ पद्धतीचे मार्गदर्शन मिळाले. गजाननराव यांचा मुलगा शुभम हा कृषी पदवीला आहे. त्यानेही या सुधारित पद्धतीने लागवडीचा आग्रह धरला. ३ एकर क्षेत्रात २८ जून २०१९ रोजी बीटी कपाशीची लागवड केली.

कपाशी लागवडीची सुधारीत जोडओळ पद्धत ः

 • गजाननराव यांची जमीन मध्यम भारी प्रकारची आहे.
 • दोन ओळीतील अंतर २.५ फूट व दोन झाडांतील अंतर १ फूट या प्रमाणे काकरीच्या साहाय्याने उभे व आडवे काकर पाडून घेतले.
 • शेतात तयार झालेल्या प्रत्येक चौफुलीवर कपाशीचे एक बियाणे डोबले.
 • जोडओळ पद्धतीने पेरणी करायची असल्याने प्रत्येक दोन ओळीनंतर तिसरी ओळ खाली (मुकी) ठेवली. प्रत्येक तिसरी ओळ खाली ठेवल्यामुळे आपसूक शेतात जोड ओळ पेरणी झाली. प्रत्येक जोडओळीनंतर ५ फुटाचा खाली पट्टा शिल्लक राहिला.
 • तीन एकर क्षेत्रासाठी बीटी कपाशी बियाण्याची ७ पाकिटे लागली. शेतात कपाशीची २.५ फूट x १ फूट - ५ फूट - २.५ फूट x १ फूट अशी पेरणी साधली गेली.

व्यवस्थापन ः

 • कपाशीचे पीक एक महिन्याचे झाल्यानंतर एकर एक बॅग या प्रमाणे ३ बॅग १०:२६:२६ हे खत सरत्याच्या साह्याने प्रत्येक जोडओळीच्या दोन्ही बाजूने दिले.
 • कपाशीचे पिकात तणनियंत्रणासाठी रोपटे अवस्थेपासून चार डवऱ्याचे फेर व दोन वेळा निंदणी केली.
 • पीक पाती अवस्थेत येताना ३ बॅग युरिया, १ बॅग डीएपी हे खत तीन एकर क्षेत्रात जोडओळीच्या दोन्ही बाजूने सरत्याने दिले.
 • पीक संरक्षणासाठी पाते अवस्था सुरु झाल्यापासून चार फवारण्या घेण्यात आल्या.
 • पीक ७५ दिवसाचे असताना कपाशीचे शेंडे खुडले.

उत्पादन खर्च (तीन एकरसाठी) ः
जमीन तयार करणे रु. ४८००/-, कपाशी डोबणी व बियाणे रु. ६०४०/-, खत व्यवस्थापन (मजुरीसह) रु. ८५८०/-, डवरणी, निंदणी व शेंडे खुडणे रु. ६०००/-, पीक संरक्षण (मजुरीसह) रु. ८०००/-, वेचणी रु. २५,२००/-, अन्य आवश्यक खर्च रु. १०,०००/-
एकूण खर्च रु. ६८,६२०/-

उत्पादन व उत्पन्न ः

 • कपाशीच्या एकंदर पाच वेचण्या झाल्या. त्यातून तीन एकर क्षेत्रात ५० क्विंटल ४० किलो कपाशी उत्पादन मिळाले.
 • कपाशीला रु. ५१०० प्रति क्विंटल असा दर मिळाला. तीन एकरातून एकूण २,५७,०४०/- रुपये उत्पन्न मिळाले.
 • यामधून उत्पादन खर्च वजा करता निव्वळ नफा ः रु. १,८८,४२०/-

अन्य शेतकऱ्यांशी तुलना ः
निंभा परिसरात अन्य शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने बीटी कपाशीचे ७ ते १० क्विंटल (सरासरी एकरी ७.५ क्विंटल) उत्पादकता मिळाली. या सुधारित जोडओळ पद्धतीने केलेल्या लागवड व योग्य व्यवस्थापनामुळे गजाननराव यांना एकरी १६.८ क्विंटल उत्पादन मिळाले. म्हणजेच एकरी रु. ३७२५०/- एवढा अधिक फायदा प्राप्त झाला.

सोयाबीनसाठी वापरली सोडओळ (पट्टा पेर) पद्धत
गजाननराव यांनी ४ जुलै २०१९ रोजी २० एकर क्षेत्रात सलग सोयाबीनची 'सोडओळ' (पट्टापेर) पद्धतीने पेरणी केली. ट्रॅक्टरचलीत सात दाती पेरणी यंत्राचा वापर करताना पेरणीयंत्राच्या बियाण्याच्या कप्प्यातील मधले चार नंबरचे छिद्र बोळा दाबून बंद केले. त्यामुळे ट्रॅक्टर प्रत्येकवेळी पलटून येताना व जाताना सोयाबीनच्या तीन ओळीच्या बाजूला पुन्हा तीन ओळी या प्रमाणे पेरणी झाली. प्रत्येक सातवी ओळ खाली राहीली. शेतात सहा - सहा ओळींचे सोयाबीनचे पट्टे तयार झाले.
२० एकर क्षेत्रात २० बॅग सोयाबीन बियाणे लागले. (३० किलो प्रति बॅग) नेहमीच्या पेरणीच्या तुलनेमध्ये पाच बॅग कमी लागल्या. परिणामी ७८०० रुपये वाचले.
पेरणी यंत्राद्वारे पेरणी वेळीच एकरी डीएपीची एक बॅग व सल्फर १० किलो या प्रमाणे दिले.
तणांचा प्रादुर्भाव अधिक झाल्याने २ वेळा निंदणी, २ डवऱ्याचे फेर व एक वेळा तणनाशकाची फवारणी करावी लागली.
पीक संरक्षणासाठी तीन फवारण्या कराव्या लागल्या.

उत्पादन खर्च (२० एकरसाठी) ः
मशागत रु. २८,०००/-, बियाणे खर्च रु. ३०,८००/-, ट्रॅक्टरपेरणी खर्च रु. ८०००/-, रासायनिक खत (मजुरीसह ) खर्च रु. ३४,८००/-, तणनियंत्रण खर्च रु. २८,२००/-, पीकसंरक्षण (मजुरी व निविष्ठा ) खर्च रु. १५,५७०/-, पीक कापणी व मळणी खर्च रु. २४,०००/- व अन्य आवश्यक खर्च रु. १०,०००/-
२० एकरासाठी एकूण खर्च - रु. १,७९,३९०/-

उत्पादन ः

 • प्रति एकर ८ क्विंटल याप्रमाणे वीस एकर क्षेत्रातून १६० क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळाले. तरी गेल्या वर्षी पाऊस अधिक झाल्याने थोडे उत्पादन कमी आल्याचे मत गजाननराव व्यक्त करतात.
 • सोयाबीन उत्कृष्ट दर्जाचे असल्यामुळे रु. ४२००/- प्रति क्विंटल असा दर मिळाला. एकूण ६,७२,००० रुपये उत्पन्न मिळाले.
 • त्यातून उत्पादन वजा केला असता रु. ४,९२,६१०/- निव्वळ नफा मिळाला.

अन्य शेतकऱ्यांशी तुलना ः
निंभा परिसरातील सोयाबिन पिकाची उत्पादकता साधारण ५-७ क्विंटल (सरासरी ६ क्विंटल) प्रति एकर एवढी होती. गजाननराव यांना सोयाबीनच्या सोडओळ पद्धतीने व्यवस्थापन केल्याने उत्पादनात एकरी २ क्विंटल वाढ प्राप्त झाली. उत्पन्नात एकरी रु. ८४०० अधिक मिळाले.

सुधारित नावीन्यपूर्ण पेरणी पद्धतीचा अनुभव ः

 • सुधारीत जोडओळ पद्धतीने कपाशीची लागवड केल्यास एकरी ११८३३ झाडे बसतात. ५ फुटाचा खाली पट्टा सोडूनही एकरी ४४४६ एवढी झाडे जास्त लागली. पारंपरिक पद्धतीत ३ फूट x २ फूट (जमिनीच्या प्रकारानुसार) लागवड होते. त्यात सामान्यपणे ७४०७ झाडे बसतात.
 • दोन जोडओळीमध्ये ५ फुटाचा खाली पट्टा असल्याने पिकामध्ये हवा खेळती राहिली, भरपूर सूर्यप्रकाश मिळाला. पिकाची वेळोवेळी निगराणी, निरीक्षण शक्य झाले.
 • आंतरमशागतीची कामे उदा. निंदणी, डवऱ्याचे फेर, तणनाशकाची फवारणी, कीडनाशकांच्या फवारण्या इ. सुलभपणे करता आल्या.
 • पावसात ऑगस्ट महिन्यात पावसाच्या खंडामध्ये पाइप टाकून स्प्रिंकलरद्वारे पाणी देणे शक्य झाले.
 • अळीवर्गीय कीडी, रसशोषक किडी व बुरशीजन्य रोगांचे प्रमाण कमी राहिले.
 • कपाशीच्या मजुराद्वारे ५ वेचण्या करणेही सोपे झाले.
 • सोयाबिन पिकाच्या फुलोरा अवस्थेपश्चात पिकात दाटी होते. मात्र, या पट्टा ठेवलेला असल्याने आंतरमशागत, फवारणी, निगराणी, सूर्यप्रकाशाचे वितरण सोपे व सुलभ झाले.
 • सोयाबीनची प्रत्येक सातवी ओळ खाली ठेवून सुद्धा उत्पादनात वाढ शक्य झाली.

गजाननराव ईसाळ, ९४२३३५५०५१
जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७

(लेखक श्री शिवाजी कृषी महाविद्यालय,अमरावती येथे सहयोगी प्राध्यापक आहेत.)


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक...पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब'...
येवला बाजार समितीचा ‘अंनिस’कडून गौरवयेवला, जि. नाशिक : ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढत...
सोयाबीन विक्रीची घाई नकोनागपूर : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक...
‘गुलाब’ चक्रीवादळ आज पूर्व किनाऱ्याला...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे...
साहित्य संमेलनातून वैचारिक दिशा...औरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी...
लहान संत्रा फळांचे करायचे काय?नागपूर : लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड...
दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’नगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...