काश्मीर येथील फुलोत्पादनाचा केंद्रातर्फे आढावा

पुराने उद्ध्वस्त झालेली काश्मीरमधील फूलशेती पुन्हा सुधारण्यासाठी आणि काश्मीर खोऱ्यातील फुलांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीनगरला त्याची ओळख पुन्हा मिळवून देण्यासाठी भारत शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी केंद्र शासनाने एकूण फुलोत्पादनाचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे.
काश्मीर येथील फुलोत्पादनाचा केंद्रातर्फे आढावा
काश्मीर येथील फुलोत्पादनाचा केंद्रातर्फे आढावा

पुराने उद्ध्वस्त झालेली काश्मीरमधील फूलशेती पुन्हा सुधारण्यासाठी आणि काश्मीर खोऱ्यातील फुलांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीनगरला त्याची ओळख पुन्हा मिळवून देण्यासाठी भारत शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी केंद्र शासनाने एकूण फुलोत्पादनाचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. त्याविषयी माहिती देताना साहाय्यक फुलोत्पादन अधिकारी इमरान अहमद यांनी सांगितले, की कोणत्याही सुशोभीकरण व्यवसायाचा पाया हा फुले आणि त्यासाठी असलेल्या रोपवाटिका हाच असतो. २०१४ मधील प्रचंड पुराच्या स्थितीमुळे विविध फूल उत्पादनासाठी आवश्यक कंद, मातृवृक्ष इ. ना मोठे नुकसान पोचले होते. त्यातून अद्याप शेतकरी अद्याप सावरलेले नाहीत. प्रत्यक्ष फुल उत्पादन केंद्रामध्येही वाहून गेलेली माती पुन्हा भरणे, शेतजमिनी करणे यासाठी बराच कालावधी लागला. आता या क्षेत्रांमध्ये कार्नेशनची लागवड करण्यात येणार आहे. फूल उत्पादक शेतकरी मुश्ताक अहमद यांनी सांगितले, की गुलाब आणि अन्य प्रकारच्या परदेशी रोपांची निर्मिती रोपवाटिकेमध्ये करण्यात येत आले. या साऱ्या कामांचा आढावा घेण्यात आला. खास फुलोत्पादन विभाग जम्मू आणि काश्मीरमध्ये फुलोत्पादन विभागाची निर्मिती १९६९ मध्ये करण्यात आली. त्यांचा पदभार दीर्घकाळ वनस्पतिशास्त्रज्ञ प्रो. के. एन. कौल यांच्याकडे होता. या विभागाकडे काश्मीरमधील ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील २७५ पेक्षा अधिक बागा सांभाळण्याची जबाबदारी आहे. येथे फुलोत्पादनाला चालना देण्यासाठी खास रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. येथील कार्नेशन, लिलियम, हायड्रेजियास आणि ट्युलिप इ. फुलांच्या रोपांच्या खरेदीसाठी व नियंत्रित पद्धतीच्या लागवडीसाठी ५० टक्क्यापर्यंत अनुदान दिले जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com