agriculture stories in marathi Instant pot for food cooking | Agrowon

अन्न शिजवण्यासाठी नावीन्यपूर्ण ‘इन्स्टंट पॉट’

डॉ. आर. टी. पाटील
बुधवार, 4 मार्च 2020

सरळ ज्वालेवर अन्नपदार्थ भाजण्यापासून माणसांच्या स्वयंपाकाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर लाकडाचा वापर करण्यायोग्य चुली, कोळशाची शेगडी यांचा वापर झाला. यातील धुरामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी धुराड्यासह किंवा चिमणीसह चुली, रॉकेलवर चालणारे स्टोव्ह आणि आता एलपीजी वायूवर चालणारे गॅस स्टोव्ह सर्रास वापरले जातात. त्याला विद्युत शेगड्यांचीही जोड मिळाली आहे. अन्नपदार्थ शिजवण्याच्या पद्धतीमध्येही उघड्या भांड्यामध्ये शिजवण्यापासून वाफेच्या दाबामध्ये (प्रेशर कुकर) शिजवणे, विजेच्या साह्याने दाबाखाली अन्न शिजवणे असे आमूलाग्र बदल झालेले दिसून येतात.

सरळ ज्वालेवर अन्नपदार्थ भाजण्यापासून माणसांच्या स्वयंपाकाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर लाकडाचा वापर करण्यायोग्य चुली, कोळशाची शेगडी यांचा वापर झाला. यातील धुरामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी धुराड्यासह किंवा चिमणीसह चुली, रॉकेलवर चालणारे स्टोव्ह आणि आता एलपीजी वायूवर चालणारे गॅस स्टोव्ह सर्रास वापरले जातात. त्याला विद्युत शेगड्यांचीही जोड मिळाली आहे. अन्नपदार्थ शिजवण्याच्या पद्धतीमध्येही उघड्या भांड्यामध्ये शिजवण्यापासून वाफेच्या दाबामध्ये (प्रेशर कुकर) शिजवणे, विजेच्या साह्याने दाबाखाली अन्न शिजवणे असे आमूलाग्र बदल झालेले दिसून येतात. त्यात आता आणखी एका प्रकाराची भर पडली आहे, ती म्हणजे इस्टंट पॉट. साधारण ९० च्या दशकामध्ये प्रेशर कुकरचा वापर वेगाने सुरू झाला. त्यानंतर इलेक्ट्रिक प्रेशरचे पेटंट फाइल झाले. त्यानंतर तिसऱ्या पिढीतील प्रेशर कुकर म्हणजेच इन्स्टंट पॉट बाजारात आले आहेत.

काय आहे हे इन्स्टंट पॉट

हा एक इलेक्ट्रिक प्रेशर कुकरचा नवा प्रकार असून, त्यात सात प्रकारे अन्न शिजवता येते. यामध्ये दाबाखाली शिजवणे, भात शिजवणे, ब्राउनिंग, सावकाश शिजवणे या पद्धतीने अन्न शिजते. सोबतच अन्न गरम ठेवता येते. आतील उष्ण वातावरण टिकून राहत असल्याने त्याचा वापर दही किंवा योगर्ट तयार करण्यासाठीही होऊ शकतो.

  • वाफवणे, भाजणे, सावकाश शिजवणे किंवा कॅनिंग या क्रिया करता येतात.
  • हे स्टेनलेस स्टिलपासून बनवलेले असून, स्वच्छता सोपी होते.
  • या पद्धतीमुळे स्वयंपाकाच्या वेळेमध्ये बचत होते. या इन्स्टंट पॉटमुळे पदार्थ शिजवण्यासाठी २० ते ६० मिनिटे पुरेशी होतात. सामान्यतः एखाद्या महिलेचा स्वयंपाकासाठी प्रतिदिन चार तासांपर्यंत वेळ जातो.
  • यामध्ये शिजवण्यासाठी अन्न ठेवल्यानंतर अन्य कामे करण्यासाठी मोकळीक मिळते. अन्न तयार झाल्यानंतर पुढे १० तासांपर्यंत गरम राहू शकते.

शिजवण्याचा स्मार्ट प्रकार

  • जेवणासाठी अन्न शिजवणे हे केवळ काही मिनिटांचे काम राहते. अगदी अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक होतो. आपल्या पारंपरिक प्रेशर कुकरप्रमाणे एकाच वेळी दोन भांडी यात ठेवता येतात.
  • यात चौदा बटने दिली असून, त्यानुसार चौदा प्रकारे अन्नावर प्रक्रिया करता येतात.
  • १. दाबावर शिजवणे, २. सावकाश शिजवणे, ३. थोड्या तेलात तळणे, ४. वाफवणे, ५. अंडी, ६. केक, ७. दही, योगर्ट, ८. लापशी किंवा खीर, ९. मिश्रधान्य, १०. भात, ११. सूप, १२. बीन्स, १३. पोल्ट्री, १४. मांस.
  • या नावीन्यपूर्ण शिजवण्याच्या तंत्रामुळे महिला, मुली किंवा पुरुषांचाही स्वयंपाकामध्ये उत्साह वाढू शकतो. विशेषतः ज्या घरामध्ये दोघेही नोकरी किंवा व्यवसायामध्ये कार्यरत आहेत, त्यांच्यासाठी हे तंत्र अधिक फायदेशीर ठरणार आहे.

(लेखक सिफेट या संस्थेचे माजी संचालक आहेत.)


इतर टेक्नोवन
दर्जेदार पशू खाद्य निर्मितीचे तंत्रजनावरांना शारीरिक व दूध उत्पादनासाठी लागणारे घटक...
सोपी, सहज सौर वाळवण यंत्रेसध्या कोरोनाच्या स्थितीमध्ये विक्रीअभावी शेतीमाल...
सौर ऊर्जेद्वारे काजू टरफल तेल निर्मितीसौर ऊर्जेच्या सहायाने काजू बी टरफलापासून तेल...
सिंचनाकरिता चुंबकीय पाणी तंत्राचा वापरक्षारयुक्त पाण्याचा पीक उत्पादन, गुणवत्ता यावर...
पीक व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्ता,...शेती व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर...
ठिबक सिंचनाचा योग्य वापर महत्त्वाचा...ठिबक सिंचन तंत्रामुळे जमिनीत कायम वाफसा ठेवता...
तयार करा कांडी पशुखाद्य खाद्य घटकांची भुकटी करून गोळ्या किंवा कांड्या...
रोवा काठ्या कमी खर्चात अन श्रमात...भाजीपाला विशेषतः वेलवर्गीय पिकांमध्ये मांडवासाठी...
तिहेरी उपयोगाचे रिंग गार्डन!जागतिक पातळीवर शेती ही अन्नाची उपलब्धता...
पदार्थाची प्रत, रंग टिकविण्यासाठी...सौर वाळवणी संयंत्राच्या इनडायरेक्ट सोलर ड्रायर...
सौर ऊर्जेवर चालणारी ई-सायकल !सध्या दुचाकीचे प्रमाण वाढले असले तरी त्यासाठी...
अन्न शिजवण्यासाठी नावीन्यपूर्ण ‘...सरळ ज्वालेवर अन्नपदार्थ भाजण्यापासून माणसांच्या...
जमीन सुपीकता अन् तंत्रज्ञान; दर्जेदार...वडिलोपार्जित बागायती शेती असल्याने नोकरीच्या मागे...
कृषिक्षेत्रासाठी उपयुक्त ‘ब्लॉक चेन’...कृषिक्षेत्र हे अन्नसुरक्षेच्या दृष्टीने सर्वात...
प्रक्रिया उद्योगासाठी सोलर ड्रायरसौरऊर्जेचा वापर करून पदार्थ वाळवणे हा...
अचूक सिंचनासाठी स्वयंचलित यंत्रणास्वयंचलित सूक्ष्म सिंचन यंत्रणेद्वारे (ऑटोमेशन)...
इंधनबचतीसाठी पर्यावरणपूरक सौर चूलसौरऊर्जेच्या साह्याने रोजच्या जेवणातील सर्व...
तयार खाद्यपदार्थ, पूर्वमिश्रणे...सध्याच्या घाईगडबडीच्या युगामध्ये लोक तयार...
ऊस शेतीसाठी आवश्यक यंत्रेऊस उत्पादनात केवळ मजुरीवर ३५ ते ४० टक्के खर्च...
जलशुद्धीकरणासाठी सौर शुद्धजल संयंत्रदुर्गम भागांत तसेच समुद्रकिनाऱ्यावर पिण्यायोग्य...