Agriculture stories in marathi, Kharif Jowar cultivation technology, AGROWON, Mahrarashtra | Agrowon

खरीप ज्वारी लागवड तंत्रज्ञान
डॉ. हि. वि. काळपांडे, अंबिका मोरे, डॉ. यू. एन. आळसे, आर. एल. औढेकर
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

ज्वारी हे उष्ण तसेच अर्थशुष्क उष्ण कटीबंधीय प्रदेशातील एक महत्त्वाचे पीक आहे. भारतामध्ये अन्नधान्य व चाऱ्यासाठी ज्वारी हे पीक महत्त्वाचे आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशात ज्वारीचा उपयोग पशुखाद्य, इथेनॉल तसेच कागदनिर्मितीसाठी होतो.

ज्वारी हे उष्ण तसेच अर्थशुष्क उष्ण कटीबंधीय प्रदेशातील एक महत्त्वाचे पीक आहे. भारतामध्ये अन्नधान्य व चाऱ्यासाठी ज्वारी हे पीक महत्त्वाचे आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशात ज्वारीचा उपयोग पशुखाद्य, इथेनॉल तसेच कागदनिर्मितीसाठी होतो.

भारतात ज्वारी हे पीक खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात सुमारे ७.५३ दशलक्ष हेक्‍टर क्षेत्रावर घेतले जाते. दर वर्षी साधारणतः ७.२५ दशलक्ष टन धान्य उत्पादन मिळते (२०१२). भारतात ज्वारी संशोधनासाठी विविध कृषी विद्यापीठांमधील ९ केंद्रांबरोबरच, भारतीय कृषी संशोधन परिषदेची ज्वारी संशोधन संस्था हैदराबाद व आंतरराष्ट्रीय संस्था इक्रिसॅट हैदराबाद यासुद्धा कार्यरत आहेत.

महाराष्ट्रात ज्वारीची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात धान्य आणि चाऱ्यासाठी केली जाते. महाराष्ट्रातील ज्वारीच्या २८.५८ लाख हेक्‍टर क्षेत्रापैकी खरिपात ६.१८ लाख हेक्‍टर, तर रब्बीमध्ये २२.४० लाख हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली आहे. खरीप ज्वारीची उत्पादकता ११.७० क्विंटल प्रतिहेक्‍टर असून रब्बी ज्वारीची उत्पादकता फक्त ७.९५ क्विंटल प्रतिहेक्‍टर एवढी आहे. 

ज्वारीचे सुधारित लागवड तंत्रज्ञान

हवामान आणि जमीन ः 

 •  ज्वारी हे सरासरी ५०० ते ९०० मि.मी. पावसाच्या भागात घेतले जाणारे पावसाचा ताण सहन करणारे पीक आहे. पोटरीअवस्था ते पोटरीतून कणीस बाहेर पडेपर्यंतचा काळ पावसाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो. याउलट दाणे पक्व होण्याच्या अवस्थेत पावसाचे प्रमाण कमी असायला हवे; अन्यथा दाणे पावसात सापडून बुरशी रोगाने काळे पडतात. यासाठी ज्वारीची वेळेवर काढणी आणि बुरशी रोगास प्रतिबंधक असणाऱ्या जातीची निवड करावी.
 • ज्वारी पिकास मध्यम ते भारी, उत्तम निचऱ्यांची जमीन चांगली असते. जमिनीचा सामू ६.५ ते ८ पर्यंत असावा.

खरीप ज्वारीचे संकरित व सुधारित वाण 
महाराष्ट्रासाठी खरीप ज्वारी लागवडीकरिता पुढील वाणांची शिफारस केलेली आहे.
कमी कालावधीत येणारे संकरित वाण

कमी कालावधीत येणारे संकरित वाण

वाण पक्व होण्यासाठीचा कालावधी (दिवस) एकरी धान्य उत्पादन (क्विंटल) एकरी कडबा उत्पादन (क्विंटल)
सीएसएच 14 100-105 19-20 32-35
सीएसएच 17- 100-105 17-18 35-40
सीएसएच 01 95-100- 11-12 32-35
सीएसएच 06- 95-100 16-17 32-35
सीएसएच 23 100-105 18-20 32-35

मध्यम कालावधीत येणारे संकरित वाण

वाण पक्व होण्यासाठीचा कालावधी (दिवस) एकरी धान्य उत्पादन (क्विंटल) एकरी कडबा उत्पादन (क्विंटल)
सीएसएच 09 100-115 18-20 40-42
सीएसएच 05 110-120 16-17 35-40
सीएसएच 10 110-115 18-20 40-42
सीएसएच 11 110-120 18-20 38-40
सीएसएच 18 110-115 18-20 35-40
सीएसएच 16 110-120 18-20 40-45
सीएसएच 840 110-115 18-20 40-45
सीएसएच 25 115-120 20-22 42-45
सीएसएच 1635 110-115 18-20 40-42

सुधारित वाण

वाण पक्व होण्यासाठी लागणारा कालावधी (दिवस) एकरी धान्य उत्पादन (क्विंटल) एकरी कडबा उत्पादन(क्विंटल)
सीएसएच 14 115-120 15-16 45-48
सीएसएच 15 115-120 14-15 45-48
पीव्हीके 400 115-120 14-15 48-50
पीव्हीके 801 110-115 13-14 32-35
एसरीव्ही 462 115-120 14-15 35-40
एसपीव्ही 1616  115-120 15-16 35-40
पीव्हीके 809 115-120 15-16 35-40
पीव्हीके 23 115-120 16-18 35-40

खरिपातील महत्त्वपूर्ण वाणांची वैशिष्ट्ये

 • पी.व्ही.के. ८०१ (परभणी श्‍वेता) :   या वाणाचे दाणे टपोरे व पांढरे शुभ्र आहेत. या वाणापासून हेक्‍टरी ३२-३५ क्विंटल धान्याचे व १०-१२ टन चाऱ्याचे उत्पन्न मिळते. ११५-१२० दिवसांत तयार होणारे हे वाण दाण्यावर येणाऱ्या काळ्या बुरशी रोगास सहनक्षम आहे.
 • पी. व्ही. के. ८०९ ः  उंच वाढणाऱ्या या वाणापासून ३५-३६ क्विंटल दाणे, तर १२०-१२२ क्विंटल वाळलेला कडबा मिळतो. दाण्याचा रंग मोत्यासारखा चमकदार असून, हे वाण काळ्या बुरशी रोगास प्रतिकारक्षम आहे. या वाणास पक्वतेसाठी ११८ दिवस लागतात.

संकरित वाण 

 • सी.एस.एच-१४ ः या वाणापासून ४०-४५ क्विंटल धान्याचे, तर ८.५-९ टन कडब्याचे उत्पन्न मिळते. हा वाण १००-१०५ दिवसात तयार होतो. पावसात दाणे विशेष काळे पडत नाहीत.
 • सी.एस.एच.-१६ ः मध्यम ते भारी जमिनीसाठी अखिल भारतीय स्तरावर हा वाण प्रसारित झाला असून, तो १०५-१०७ दिवसात पक्व होतो. या वाणाची उंची १९०-२०० सें.मी. असून धान्य उत्पादन ४०-४२ क्विंटल प्रतिहेक्‍टर तर कडबा उत्पादन ९ ते ९.५ टन प्रतिहेक्‍टर मिळते.
 • सीएसएच- २५ (परभणी साईनाथ/ एस.पी.एच. १५६७) ः उंच वाढणारा हा वाण ११० दिवसांत पक्व होत असून, त्यापासून प्रतिहेक्‍टरी ४३.३ क्वि. धान्य उत्पादन आणि १२०.७ क्वि. कडब्याचे उत्पादन मिळते, तसेच हे वाण बुरशी रोगास प्रतिकारक्षम असल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी उत्तम आहे.
 • एसपीएच १६३५ ः खरीप हंगामात मध्यम ते भारी जमिनीत लागवडीसाठीचा हा वाण १०८ ते ११० दिवसात पक्व होतो. या पासून हेक्‍टरी ३८ ते ४० क्विंटल धान्याचे आणि ११८ ते १२० क्विंटल कडब्याचे उत्पादन मिळते. हा वाण बुरशी रोगास प्रतिकारक्षम असून, धान्याची व भाकरीची प्रत उत्तम आहे.

पूर्व मशागत ः उन्हाळ्यामध्ये एकदा नांगरणी करून २ ते ३ उभ्या, आडव्या वखराच्या पाळ्या कराव्यात. शेवटच्या पाळीपूर्वी १२-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.

पेरणीचा कालावधी ः नैॡत्य मौसमी पाऊस झाल्याबरोबर वापसा येताच पेरणी करावी. जूनच्या तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात पेरणी करावी. उशिरा पेरणी केल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव होऊन ताटाची संख्या घटते. उशिरा पेरणी करताना खोडमाशी नियंत्रणासाठी थायामेथोक्‍झाम (७० टक्‍के) या कीटकनाशकाची ३ ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. 

बियाणे व पेरणी 

 • पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. हेक्‍टरी ७.५ किलो संकरित व १० किलो सुधारित वाणाचे बियाणे पुरेसे होते. पेरणीसाठी मोहरबंद व प्रमाणित बियाणे वापरावे. 
 • जर शेतकरी स्वतःचे बियाणे वापरणार असतील तर त्यांनी पेरणीपूर्वी बियाणे निवडून घ्यावे. थायरमची प्रक्रिया ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात करावी. 
 • दोन ओळींतील अंतर ४५ सें.मी. तर दोन रोपातील अंतर १५ सें.मी. ठेवावे. हेक्‍टरी रोपांची संख्या १ लाख ८० हजारांपर्यंत ठेवावी.

रासायनिक खते ः खरीप ज्वारीस १० ते १२ गाड्या शेणखतासोबत ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश प्रतिहेक्‍टरी शिफारस केलेली आहे. पेरतेवेळी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश जमिनीत खोल पेरावे. शक्‍यतो पहिली मात्रा संयुक्त अथवा मिश्र खतातून द्यावी. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा पेरणीनंतर ३०-३५ दिवसांनी युरियाद्वारे द्यावी.

आंतरमशागत ः खरीप हंगामात तणाचा प्रादुर्भाव जास्त असतो. पेरणीनंतर ४०-४५ दिवसांपूर्वी या काळात दोन खुरपण्या व दोन कोळपण्या कराव्यात. ॲट्राझीन हे तणनाशक हेक्‍टरी एक किलो प्रति १००० लिटर पाण्यात मिसळून पेरणी नंतर परंतु बियाणे उगवण्यापूर्वी जमिनीवर फवारणी करावी. 

आंतरपीक ः

 • मध्यम ते भारी जमीन आणि हमखास पावसाच्या भागामध्ये खरीप ज्वारीमध्ये सोयाबीनची २ ः ४  किंवा ३ ः ६ या प्रमाणात दोन ओळींतील अंतर ४५ सें.मी. ठेवून लागवड करण्याची शिफारस आहे.
 • तुरीचे आंतरपिक ३ ः ३ किंवा ४ ः २ या प्रमाणात घेतल्यास अधिक फायदा मिळेल. 
 • सोयाबीन, मूग, उडीद ही कमी कालावधीची पिके आंतरपिके म्हणून घेताना २ ः ४ या पीक पद्धतीचा अवलंब करावा.

पाणी व्यवस्थापन 
खरीप हंगामात ज्वारीला पाणी देण्याची गरज भासत नाही; परंतु पावसाचा ताण पडल्यास संवेदनशील अवस्थेत एखादे संरक्षित पाणी द्यावे.

कापणी व मळणी 

 • कणसाचा दांडा पिवळा झाला, आतल्या भागातील दाणे टणक झाले व दाण्याचा     खालच्या भागावर काळा ठिपका आला म्हणजे ज्वारीचे पीक शारीरिक दृष्ट्या पक्व झाले आहे असे समजावे. अशा वेळेस दाण्यामध्ये सर्वसाधारणपणे २५-३० टक्के ओलाव्याचे प्रमाण असावे. ज्वारीच्या पिकाची शारीरिक पक्व अवस्थेत (८-१० दिवस पूर्ण पक्वतेच्या अगोदर) कापणी केल्यास उत्पादनात घट न होता बुरशी रोगापासून बचाव होतो. 
 • कापणी उशिरा केल्यास पीक उशिरा येणाऱ्या पावसात सापडण्याची शक्‍यता असते. 
 • साठवणुकीत धान्य चांगले राहण्यासाठी धान्यात ओलाव्याचे प्रमाण ९-१० टक्के असावे. त्यासाठी मळणी नंतर धान्य उन्हात  वाळवून मगच साठवण करावी.

उत्पादन 
संकरित जातीपासून ४०-४५ क्विंटलपर्यंत तर सुधारित जातीपासून ३५-४० क्विंटल प्रतिहेक्‍टरी धान्याचे उत्पादन मिळते, तसेच साधारणपणे ८-१० टन कडब्याचे उत्पादन मिळू शकते.

अधिक उत्पादनासाठी महत्त्वाचे मुद्दे

 • पावसाच्या आगमनाबरोबर पेरणी केल्यास खोडमाशी आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. अधिक उत्पादन मिळते.
 • ज्वारीच्या ताटांची संख्या हेक्‍टरी १ लाख ८० हजार असावी.
 • हमखास पावसाच्या प्रदेशात ८० ः ४० ः ४० तर कमी पावसाच्या प्रदेशात ६०ः३०ः३० ही रासायनिक खताची मात्रा वापरावी.
 • शारीरिक पक्व अवस्थेतच कापणी करावी.
 • आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.

- डॉ. हि. वि. काळपांडे, अंबिका मोरे, डॉ. यू. एन. आळसे, आर. एल. औढेकर
(लेखक ज्वारी संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी य़ेथे कार्यरत आहेत)
संपर्क ः ०२४५२-२२११४८
 

 

इतर अॅग्रो विशेष
अचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...
साखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...
देशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...
राष्ट्रीय कृषिमुल्य आयोगासमोर ऊस...पुणे : कायद्यातील उणिवांचा फायदा घेत ऊस उत्पादक...
नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी...मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍...
थंड वारे वाढणार...पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या...
दर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...
शेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...