ज्वारी उत्पादनवाढीची सूत्रे

ज्वारी हे कमी पावसात धान्य व कडब्याचे हमखास उत्पादन देणारे पीक आहे. पावसाची अनियमितता, बदलते हवामान, वाढती लोकसंख्या, जनावरांना लागणारा चारा, जागतिक स्तरावरील इंधन समस्या या सर्व बाबींचा विचार करता ज्वारी हे बहुउपयोगी शाश्वत पीक आहे.
ज्वारी उत्पादनवाढीची सूत्रे
ज्वारी उत्पादनवाढीची सूत्रे

ज्वारी हे कमी पावसात धान्य व कडब्याचे हमखास उत्पादन देणारे पीक आहे. पावसाची अनियमितता, बदलते हवामान, वाढती लोकसंख्या, जनावरांना लागणारा चारा, जागतिक स्तरावरील इंधन समस्या या सर्व बाबींचा विचार करता ज्वारी हे बहुउपयोगी शाश्वत पीक आहे. ज्वारी हे अन्नधान्य व चारा देणारे उष्ण व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशातील महत्त्वाचे पीक आहे. ज्वारी खालील क्षेत्र व उत्पादनात भारतामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. हवामान विषुववृत्तापासून ४५ अक्षांशापर्यंत या पिकाची लागवड होते. हे पीक उष्ण हवामानात सुद्धा येते. ज्वारी हे सरासरी ५०० ते ९०० मि.मि. पावसाच्या प्रदेशात घेतले जाणारे पावसाचा ताण सहन करणारे पीक आहे. १०० मि.मि. पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी. पोटरी अवस्था ते पोटरीतून कणीस बाहेर पडे पर्यंतचा काळ पावसाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो. याउलट दाणे पक्व होण्याच्या अवस्थेत पावसाचे प्रमाण कमी असायला हवे. अन्यथा दाणे पावसात सापडून बुरशीजन्य रोगाने काळे पडतात. यासाठी ज्वारीची वेळेवर काढणी करावी. बुरशी रोगास प्रतिबंधक असणाऱ्या जातीची निवड करावी. जमीन पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत हे पीक उत्तम येते. यासाठी मध्यम ते भारी जमीन निवडावी. ज्वारीचे पीक हे ५.५ ते ८.४ (सामू) असलेल्या जमिनीत घेता येते. खरीप ज्वारीचे सुधारित वाण : परभणी शक्ती (पीव्हीके १००९), पीव्हीके ४०० (पांचाली) , पीव्हीके ८०१ (परभणी श्वेता), पीव्हीके ८०९, एस. पी. एच. १६४१, सीएसएच १६, सीएसएच ३० इ. पूर्वमशागत व भर

  • जमिनीची पूर्वमशागत चांगली केल्यास जमिनीत हवा खेळती राहते. तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • पूर्वीचे पीक निघाल्यावर जमिनीची नांगरट करावी. उन्हाळ्यामध्ये एकदा नांगरणी करून वखराच्या २ ते ३ खोल पाळ्या देऊन जमिनीची चांगली मशागत करावी.
  • ज्वारी हे पीक पाणथळ जमिनीत वाढत नाही. पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचे सपाटीकरण करून घ्यावे.
  • शेतातील काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे.
  • शेवटच्या पाळीपूर्वी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.
  • पेरणीची वेळ नैऋत्य मौसमी पाऊस झाल्याबरोबर वापसा येताच पेरणी करावी. खरीप ज्वारीची पेरणी नियमित पावसाळा सुरू झाल्यावर जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. उशिरा पेरणी केल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढून झाडांची संख्या कमी होते. उत्पादनात घट होते लागवडीचे अंतर व विरळणी

  • अंतर : खरीप ज्वारीसाठी हेक्टरी झाडांची योग्य ती संख्या मिळण्यासाठी दोन ओळींमध्ये ४५ सें.मी., तर दोन झाडातील अंतर १५ सें.मी. इतके अंतर ठेवावे.
  • बियाणे ः हेक्टरी ७.५ किलो संकरित वाणांचे, तर १० किलो सुधारित वाणाचे बियाणे वापरावे
  • खोली ः ३ ते ४ सें. मी. खोलीवर पेरणी करावी. बी जास्त खोलीवर जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • विरळणी ः पेरणीपासून १२ ते १५ दिवसांनी विरळणी करावी.
  • रासायनिक खते

  • ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, ४० किलो पालाश प्रतिहेक्टरी
  • द्यावे. यांपैकी ४० किलो नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीवेळी द्यावे.
  • उर्वरित ४० किलो नत्र मात्रा ज्वारीच्या पिकाला २५ ते ३० दिवसांनी द्यावी. खते देताना जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करावी.
  • जमिनीत उपलब्ध पालाशचे प्रमाण जास्त असल्यास पालाशची मात्रा त्यानुसार कमी करावी अथवा देणे टाळावी.
  • आंतर मशागत

  • खरीप ज्वारीच्या उत्पादन वाढीस आंतरमशागतीचे फार महत्त्व आहे. ज्वारीचे पीक हे पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारे पीक असल्यामुळे जमिनीत जास्तीतजास्त ओलावा टिकवून ठेवणे अधिक उत्पादनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे.
  • ज्वारीचे पीक ४० दिवसांचे होईपर्यंतच २-३ वेळा कोळपणी करावी.
  • तणांचा जास्त प्रादुर्भाव असल्यास आवश्यकतेनुसार १ ते २ वेळा निंदणी करावी.
  • आंतरपीक

  • मध्यम ते भारी जमीन आणि हमखास पावसाच्या भागामध्ये खरीप ज्वारी : सोयाबीन २ :४ किंवा ३ :६ या प्रमाणात दोन ओळींतील अंतर ४५ सें.मी. ठेवून लागवड करण्याची शिफारस आहे.
  • ज्वारी : तुरीचे आंतरपीक ३:३ किंवा ४:२ या प्रमाणात घेतल्यास अधिक फायदा मिळतो.
  • सोयाबीन, मूग, उडीद ही कमी कालावधीची पिके आंतरपिके म्हणून घेताना २:४ ज्वारी : मूग किंवा उडीद या पीक पद्धतीचा अवलंब करावा.
  • पाणी व्यवस्थापन

  • खरीप ज्वारी हे कोरडवाहू पीक असल्यामुळे ओलिताची गरज भासत नाही. मात्र, पाऊस न पडल्याने पिकाला ताण पडल्यास पिकाची वाढ खुंटू नये, यासाठी पिकाच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षित पाणी द्यावे.
  • जोमदार वाढीचा काळ (२८-३० दिवस).
  • पीक पोटरीत येण्याचा काळ (५० ते ७५ दिवस)
  • फुलोरा अवस्था (८० ते ९० दिवस)
  • दाणे भरण्याचा काळ (९५ ते १०० दिवस)
  • अधिक उत्पादनवाढीसाठी हे लक्षात ठेवा १. पावसाच्या आगमनाबरोबर पेरणी केल्यास खोडमाशी आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. अधिक उत्पादन मिळते. २. ज्वारीच्या ताटांची संख्या हेक्टरी १,८०,००० असावी. ३. हमखास पावसाच्या प्रदेशात ८० : ४० : ४० तर, कमी पावसाच्या प्रदेशात ६०:३०:३० ही रासायनिक खताची मात्रा वापरावी. ४. आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. ५. शारीरिक पक्व अवस्थेतच कापणी करावी. डॉ. के. आर. कांबळे (प्रभारी अधिकारी), ९४२१३२५५७५ प्रितम भुतडा (साहाय्यक कृषिविद्यावेत्ता), ९४२१८२२०६६ (ज्वारी संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com