agriculture stories in marathi kiwi fruit processing | Agrowon

किवी फळापासून प्रक्रिया पदार्थ

सचिन शेळके, कृष्णा काळे
रविवार, 12 जानेवारी 2020

किवी फळ हे चॉकलेटी व हिरवे रंगाचे केसाळ, आंबट व गोड फळ आहे. मूलतः चीनमधील या फळाची भारतात लागवड हिमाचल प्रदेश, सिक्कीम, मेघालय, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये केली जाते. किवी फळझाडांची लागवड प्रामुख्याने पर्वतीय प्रदेशात आढळते.

किवी फळ बहुगुणी असून त्यात क, के, आणि ई ही जीवनसत्त्वे अधिक प्रमाणात आहेत. याचबरोबर किवीमध्ये पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असून, शरीराला आवश्यक असणारी ‘अँटिऑक्सिडंट घटक ही भरपूर प्रमाणात आहे.

शास्त्रीय नाव : ॲक्टिमीडिया डेलिसिओेसा
पोषक मूल्ये प्रति १०० ग्रॅम

किवी फळ हे चॉकलेटी व हिरवे रंगाचे केसाळ, आंबट व गोड फळ आहे. मूलतः चीनमधील या फळाची भारतात लागवड हिमाचल प्रदेश, सिक्कीम, मेघालय, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये केली जाते. किवी फळझाडांची लागवड प्रामुख्याने पर्वतीय प्रदेशात आढळते.

किवी फळ बहुगुणी असून त्यात क, के, आणि ई ही जीवनसत्त्वे अधिक प्रमाणात आहेत. याचबरोबर किवीमध्ये पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असून, शरीराला आवश्यक असणारी ‘अँटिऑक्सिडंट घटक ही भरपूर प्रमाणात आहे.

शास्त्रीय नाव : ॲक्टिमीडिया डेलिसिओेसा
पोषक मूल्ये प्रति १०० ग्रॅम

 • उष्मांक : ६१ किलोकॅलरी
 • कर्बोदके : १४.६६ ग्रॅम १५ टक्के
 • साखर : ८.९९ ग्रॅम
 • चरबी : ०.५२ ग्रॅम
 • प्रथिने : १.४४ ग्रॅम
 • पाणी - ८३ टक्के
 • जीवनसत्त्वे : क - ९२.७ मि.ग्रॅम ११२ टक्के, के - ४०.३ मि. ग्रॅम ३८ टक्के, ई - १.४६ मि. ग्रॅम १० टक्के.
 • खनिजे ः
 • १. कॅल्शिअम - ३४ मि. ग्रॅम - ३ टक्के
 • २.लोह - ०.३१ मि. ग्रॅम - २ टक्के
 • ३. तांबे - ०.१३ मि. ग्रॅम - ७ टक्के

औषधी गुणधर्म :
किवीमधील फायबर आणि पोटॅशिअम हृदयाच्या आरोग्यास समर्थन देते. पोटॅशिअमचे सेवन, सोडिअमचे प्रमाण कमी राहिल्यास हृदय व रक्त वाहिन्यांसंबंधी आजारांचा धोका वाढतो. या फळांमध्ये ती भरपूर प्रमाणात असल्यामुळे फायदा होतो.

 • किवी फळातील पोटॅशिअम मुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
 • किवी या फळामध्ये क जीवनसत्त्व हे ‘संत्रा’ फळाच्या तुलनेत पाच पटीने जास्त असतात.
 • किवी फळाच्या रसामुळे मुतखडा कमी होण्यास मदत होते.
 • किवी फळाचा रोजच्या आहारामध्ये वापर केल्यास बद्धकोष्ठता कमी होते.
 • या फळाच्या सेवनामुळे रक्तातील प्लेटलेटस् वाढतात.

प्रक्रियायुक्त पदार्थ :
१. किवी बर्फी :

 • ५० किलो किवी हे फळे स्वच्छ पाण्याने धुऊन त्यातील गर काढून घ्यावा. काढलेला गर एका कढईमध्ये घेऊन त्यामध्ये १० किलो साखर टाकून त्याचे मिश्रण तयार करावे. या मिश्रणाला १० ते १५ मिनिटे ६० अंश सेल्सिअस इतकी उष्णता द्यावी. एका कढईमध्ये ५ लिटर दूध घेऊन त्यामध्ये ५ किलो खवा व ४ किलो दूध पावडर मिसळून घ्यावी. हे मिश्रण घट्ट होईपर्यंत उष्णता द्यावी.
 • तयार झालेल्या मिश्रणामध्ये किवीची साखर मिसळून तयार केलेला गर मिसळून घ्यावा. त्याला मंद आचेवर (१५ ते २० अंश सेल्सिअस तापमान ) १५ मिनिटांपर्यंत उष्णता द्यावी.
 • तयार झालेले मिश्रण हे एका तुपाचा लेप दिलेल्या सपाट ट्रेमध्ये पसरवून थंड करून घ्यावे. मिश्रण थंड झाल्यानंतर योग्य आकारात कापून घ्यावे. तयार झालेली बर्फी हवाबंद डब्यामध्ये ठेवावी.

२. जॅम -

 • परिपक्व किवीची फळे निवडून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावेत. धुतलेल्या किवीपासून गर वेगळा करावा. जॅम बनविण्याकरिता गराच्या वजनाएवढी साखर मिसळावी. त्यात प्रतिकिलो जॅम बनविण्याकरिता १.५ ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळून एकजीव मिश्रण करावे.
 • हे मिश्रण मंद आचेवर ढवळत राहावे. तयार झालेल्या मिश्रणाचा ब्रिक्स ६८.५ अंश इतका झाल्यावर उष्णता देणे बंद करावे.
 • तयार झालेला जॅम निर्जंतुक केलेल्या काचेच्या भरणीत गरम गरम भरावा. बाटल्याची साठवणूक थंड व कोरड्या जागी करावी.

३. जेली-

 • किवीपासून रस काढून घ्यावा. रसाच्या वजनाएवढी साखर आणि प्रतिकिलो सायट्रिक ॲसिड १.५ ग्रॅम मिसळावे.
 • जेलीला घट्टपणा येण्याकरिता पेक्टिन (फूडग्रेड) ४-६ ग्रॅम वापरून मंद आचेवर तापवावे.
 • तापवत असताना ब्रिक्स तपासून पाहावा. ६७.५ ब्रिक्स अंश झाल्यावर जेली तयार झाल्याचे समजून उष्णता देणे बंद करावे.
 • तयार झालेली जेली निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरावी. झाकण लावून हवाबंद करावे. जेलीची साठवण थंड व कोरड्या ठिकाणी करावी.

सचिन शेळके, ८८८८९९२५२२
(अन्नप्रक्रिया व तंत्रज्ञान विभाग, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे अन्नतंत्र महाविद्यालय, लोदगा, लातूर.)


इतर कृषी प्रक्रिया
भाजीपाला साठवणीसाठी ‘शून्य ऊर्जा शीत-...काढणी, साठवणूक आणि प्रक्रिया यातील अयोग्य हाताळणी...
बाजरी मूल्यवर्धनातून वाढवा नफाबाजरीच्या पिठाचा वापर इतर पिठात मिसळून केल्यास...
आरोग्यदायी नाचणीनाचणीमध्ये कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसीन, थायामीन...
शेळीपालन : परतफेड हप्ते ठरवण्यासाठी ...शेळीपालनामुळे शेतमजूर स्त्रियांच्या उत्पन्नामध्ये...
पोल्ट्री सुरू करायचीय, नक्की वाचा......विमलताई या गावातील समाजकार्यास वाहून घेतलेल्या...
आवळ्याचे गुणकारी पदार्थआवळा हे फळ इतर फळांसारखे वर्षभर टिकत नाही,...
डाळनिर्मितीला भारतात मोठी संधीभारतातील एकूण गरजेपैकी ६० टक्के डाळ देशांतर्गत...
काथ्या उद्योगासाठी अनुदान आणि वितरणकाथ्या उद्योगात रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत....
अन्नप्रक्रिया उद्योगात आहेत मुबलक संधीशेती व्यवसाय हा केवळ शेतमालाची उत्पादकता वाढवणे...
किवी फळापासून प्रक्रिया पदार्थकिवी फळ हे चॉकलेटी व हिरवे रंगाचे केसाळ, आंबट व...
दुग्ध व्यवसायाच्या प्रकल्प अहवालात काय...खरेतर राहुलला आता दूध व्यवसायाने झपाटले होते. दूध...
फळे, भाजीपाल्याचे निर्जलीकरण, साठवणूकशून्य ऊर्जा शीतकक्ष हा फळे व भाज्या जास्त काळ...
विड्याच्या पानापासून पावडर, पापड, खाकरापानवेलीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी पानापासून...
आरोग्यदायी पेरूपासून प्रक्रियायुक्त...पेरू हे फळ फक्त चविष्टच नाही तर त्याचे...
अन्न शिजविण्याच्या विविध पद्धतीप्राचीन काळी माणूस शिकार करून कच्चे मांस किंवा...
ज्वारी पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण...भारत हा जगातील ज्वारी उत्पादनात चौथ्या क्रमांकाचा...
मागणी नसलेल्या माशांपासून मूल्यवर्धित...माशांच्या अनेक जाती अशा आहेत, की त्यांना मासळी...
रेनबो ट्राउट माशापासून मूल्यवर्धित...रेनबो ट्राउट हा थंड पाण्यात सापडणारा मासा मुळात...
सुधारित पद्धतीने टिकवा मासेमासे खारवून टिकविणे ही पद्धत तुलनात्‍मक स्‍वरूपात...
मैद्याच्या प्रतीवर ठरतो बेकरी...बेकरी उद्योगातील प्रमुख उत्पादनांमध्ये बिस्किटे,...