agriculture stories in marathi , Laser printing tech produces waterproof e-textiles in minutes | Page 2 ||| Agrowon

जलरोधक ई कपड्याची निर्मिती लेसर प्रिंटिंगद्वारे शक्य 

वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

भविष्यामध्ये अंगावर वापरता येणाऱ्या उपकरणे, सेन्सर यांचे प्रमाण वाढत जाणार आहे. अशा उपकरणांना ऊर्जा पुरवण्याचे काम आपले कपडेच करू शकतील. अशा कपड्यांच्या निर्मितीसाठी लेसर प्रिंटिंग तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे. या लेसर प्रिंटिंग तंत्रज्ञानामध्ये अगणित क्षमता आहेत. त्याचा प्रत्यय विविध संशोधनातून येत असतो. अशा काही संशोधनाविषयी... 

भविष्यामध्ये अंगावर वापरता येणाऱ्या उपकरणे, सेन्सर यांचे प्रमाण वाढत जाणार आहे. अशा उपकरणांना ऊर्जा पुरवण्याचे काम आपले कपडेच करू शकतील. अशा कपड्यांच्या निर्मितीसाठी लेसर प्रिंटिंग तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे. या लेसर प्रिंटिंग तंत्रज्ञानामध्ये अगणित क्षमता आहेत. त्याचा प्रत्यय विविध संशोधनातून येत असतो. अशा काही संशोधनाविषयी... 

लेसर प्रिंटिंग तंत्राद्वारे केवळ तीन मिनिटांमध्ये १० सेंमी बाय १० सेंमी आकाराचा जल रोधक कपडा बनविण्यात ऑस्ट्रेलिया येथील आरएमआयटी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी यश मिळवले आहे. या कपड्याची तन्यता अधिक असून, ही प्रक्रिया स्वस्त आहे. लेसर तंत्रज्ञानाद्वारे कपड्यांमध्ये ग्राफीन सुपरकॅपेसिटरचा अंतर्भाव सहजतेने करता येतो. हे कॅपेसिटर हे ताकदवान आणि अधिक काळापर्यंत ऊर्जा साठवणीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे आहेत. भविष्यातील स्मार्ट कपड्यांच्या निर्मितीसाठी ई टेक्सटाईल उद्योगामध्ये लेसर तंत्रज्ञान आघाडीवर असेल. 

सध्या ग्राहकोपयोगी, आरोग्य आणि संरक्षण या दृष्टीने महत्त्वाची, पण अंगावर सहजतेने वापरता येईल, अशा उपकरणाचे प्रमाण वेगाने वाढत चालले आहे. या उपकरणासाठी आवश्यक ऊर्जा पुरवण्याची समस्या भविष्यात भेडसावणार आहे. त्या अनुषंगाने कपड्यांद्वारे ऊर्जेची उपलब्धता यासाठी गेल्या काही वर्षांपासून संशोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याविषयी माहिती देताना मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया) येथील आरएमआयटी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. लिट्टी थेक्ककारा यांनी सांगितले, की विविध प्रकारचे सेन्सर, वायरलेस समन्वय- संपर्क, आरोग्याचे सातत्याने निरीक्षण करणारी प्रणाली यांचा वापर कपड्यांमध्ये करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा स्मार्ट कपड्यांसाठी पुरेशी ऊर्जा पुरवणाऱ्या विश्वासार्ह साधनांवरही काम केले जात आहे. त्यासाठी ग्राफीन आधारित सुपर कॅपेसिटर अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. 
हे संशोधन ‘सायंटिफीक रिपोर्टस’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. 

अडचणी आणि अपेक्षा ः 

  • सध्या कपड्यांमध्ये विविध बॅटरी शिवून, ऊर्जेची गरज भागविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, त्यामुळे कपड्यांचे वजन वाढत जाते. आणि ऊर्जा साठवण्याची क्षमताही एका मर्यादेपेक्षा अधिक ठेवणे शक्य होत नाही. 
  • यातील अनेक इलेक्ट्रॉनिक घटकामध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याचा धोकाही जाणवत राहतो. 
  • कपडे सातत्याने शरीरावर असणार असल्यामुळे घाम, आर्द्रता, धूळ यांचाही सामना करण्याइतपत सक्षम असले पाहिजेत. 
  • या सर्व समस्या सोडण्याची क्षमता लेसर प्रिंटिग तंत्रज्ञानाने तयार केलेल्या कपड्यांमध्ये असू शकेल, असा दावा संशोधकांनी केला आहे. 
     

ई टेक्सटाईल उद्योगाला भेडसावू घातलेल्या ऊर्जा साठवणीच्या समस्येवर मात करण्यासाठी लेसर प्रिंटिंग तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे. लेसर तंत्रज्ञानामुळे प्रत्यक्ष वेळेवर वापरता येईल, इतकी अपारंपरिक ऊर्जा साठवता येईल. या कपड्यांची निर्मितीही वेगाने करणे शक्य असून, तुलनेने खर्चही कमी राहण्याची शक्यता आहे. या नव्या तंत्रज्ञानाच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आला आहे. 
- प्रो. मिन गू, शांघाय शास्त्र विद्यापीठ, चीन (मानद प्रोफेसर, आरएमआयटी विद्यापीठ) 


इतर टेक्नोवन
यंत्रांमध्ये वायूरुप इंधनाचा वापर होईल...सध्या बहुतांश वाहने व कृषी यंत्रासाठी खनिज...
मशागतीसाठी सबसॉयलर, मोल नांगराचा वापरपृष्ठभागाखाली तयार झालेला घट्ट थर फोडण्यासाठी...
शेळ्यांच्या सुलभ प्रजननासाठी...सुलभ प्रजनन व्यवस्थापन होण्यासाठी शेळीच्या प्रजनन...
हरितगृह, शेडनेटमधील पीक व्यवस्थापनकोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या...
चिंच प्रक्रियेसाठी बहुपयोगी यंत्रेचिंच गर काढण्यासाठी पुर्णपणे स्वयंचलीत यंत्र...
खाद्यपदार्थ पॅकेजिंग, लेबलींगचे नियमएफ.एस.एस.ए.आय. २००६ च्या कायदे व नियमाअंतर्गत...
दुग्धजन्य प्रक्रिया पदार्थांच्या...पारंपरिकरीत्या दुधापासून खवा, पनीर, दही, लस्सी...
दर्जेदार पशू खाद्य निर्मितीचे तंत्रजनावरांना शारीरिक व दूध उत्पादनासाठी लागणारे घटक...
सोपी, सहज सौर वाळवण यंत्रेसध्या कोरोनाच्या स्थितीमध्ये विक्रीअभावी शेतीमाल...
सौर ऊर्जेद्वारे काजू टरफल तेल निर्मितीसौर ऊर्जेच्या सहायाने काजू बी टरफलापासून तेल...
सिंचनाकरिता चुंबकीय पाणी तंत्राचा वापरक्षारयुक्त पाण्याचा पीक उत्पादन, गुणवत्ता यावर...
पीक व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्ता,...शेती व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर...
ठिबक सिंचनाचा योग्य वापर महत्त्वाचा...ठिबक सिंचन तंत्रामुळे जमिनीत कायम वाफसा ठेवता...
तयार करा कांडी पशुखाद्य खाद्य घटकांची भुकटी करून गोळ्या किंवा कांड्या...
रोवा काठ्या कमी खर्चात अन श्रमात...भाजीपाला विशेषतः वेलवर्गीय पिकांमध्ये मांडवासाठी...
तिहेरी उपयोगाचे रिंग गार्डन!जागतिक पातळीवर शेती ही अन्नाची उपलब्धता...
पदार्थाची प्रत, रंग टिकविण्यासाठी...सौर वाळवणी संयंत्राच्या इनडायरेक्ट सोलर ड्रायर...
सौर ऊर्जेवर चालणारी ई-सायकल !सध्या दुचाकीचे प्रमाण वाढले असले तरी त्यासाठी...
अन्न शिजवण्यासाठी नावीन्यपूर्ण ‘...सरळ ज्वालेवर अन्नपदार्थ भाजण्यापासून माणसांच्या...
जमीन सुपीकता अन् तंत्रज्ञान; दर्जेदार...वडिलोपार्जित बागायती शेती असल्याने नोकरीच्या मागे...