agriculture stories in marathi Lasers enable engineers to weld ceramics, no furnace required | Agrowon

भट्टीशिवायही लेसरने जोडता येईल सिरॅमिक 

वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

सध्या सिरॅमिकच्या जोडणीसाठी भट्टी किंवा अधिक ऊर्जेची आवश्यकता भासते. अशा सिरॅमिकच्या जोडणी (वेल्डिंग) साठीही लेसर तंत्रज्ञान फायद्याचे असून, कोणत्याही भट्टीशिवाय ही प्रक्रिया पार पाडता येते. या नव्या तंत्रासाठी केवळ ५० वॉट पेक्षाही कमी क्षमतेच्या लेसरची आवश्यकता असेल. भविष्यामध्ये धातूरहित, ओरखडे न उठणारे सिरॅमिकचा वापर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, आरोग्यविषयक उपकरणे यांच्या निर्मितीसाठी वाढत जाणार आहे. 

सध्या सिरॅमिकच्या जोडणीसाठी भट्टी किंवा अधिक ऊर्जेची आवश्यकता भासते. अशा सिरॅमिकच्या जोडणी (वेल्डिंग) साठीही लेसर तंत्रज्ञान फायद्याचे असून, कोणत्याही भट्टीशिवाय ही प्रक्रिया पार पाडता येते. या नव्या तंत्रासाठी केवळ ५० वॉट पेक्षाही कमी क्षमतेच्या लेसरची आवश्यकता असेल. भविष्यामध्ये धातूरहित, ओरखडे न उठणारे सिरॅमिकचा वापर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, आरोग्यविषयक उपकरणे यांच्या निर्मितीसाठी वाढत जाणार आहे. 

नवे सिरॅमिक वेल्डिंगचे तंत्रज्ञान येथील कॅलिफोर्निया सॅन दियागो विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया रिव्हरसाईड विद्यापीठातील अभियंत्यांच्या गटाने विकसित केले आहे. त्याविषयी माहिती देताना प्रो. जेव्हियर इ. गॅराय यांनी सांगितले, की सिरॅमिक घटक हे पर्यावरणपूरक असूनही, तुलनेने अधिक कठिण, प्रतिरोधक आहे. त्यांचा वापर जैववैद्यकीय उपकरणांमध्ये आणि विविध इलेक्ट्रॉनिक घटकांच्या आवरणासाठी करता येतो. सिरॅमिकचे दोन भाग एकमेकांना तंतोतंत जुळवणे हे अत्यंत आव्हानात्मक मानले जाते. त्यासाठी अत्युच्च तापमानाची आवश्यकता असते. अत्युच्च तापमानामुळे इलेक्ट्रॉनिक घटक त्यात ठेवून, ते बंद करणे शक्य होत नाही. 

  • इ. एच. पेनिल्ला, गॅराय, अॅग्युलार आणि सहकाऱ्यांनी यावर उपाय शोधला असून, अतिवेगवान स्पंदनाच्या लेसरद्वारे (अल्ट्राफास्ट पल्सड लेसर) सिरॅमिकचा तेवढा भाग वितळवून एकमेकांशी जोडला जातो. केवळ त्या सिरॅमिक पृष्ठभागाचेच तापमान वाढवून, तेवढाच भाग वितळवला जातो. यासाठी ५० वॉटपेक्षाही कमी ऊर्जा लागते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिरॅमिक पदार्थ तापवण्याची किंवा भट्टीमध्ये ठेवण्याची आवश्यकता राहत नाही. 
  • या तंत्रासाठी लेसरशी संपर्काची वेळ, कालावधी, लेसरच्या स्पंदनाची संख्या, स्पंदनाचा कालावधी असे लेसरचे विविध निकष बनवण्यात आले आहे. ॲग्युलार यांनी सांगितले, की अतिवेगवान स्पंदनामध्ये दोन पिकोसेकंदाइतका कालावधी असून, त्यामध्ये एक मेगाहर्टझ इतक्या दराने स्पंदन होते. यामुळे पदार्थ वितळण्याचा व्यासही मर्यादित राहून, त्याचा डाग दिसून येत नाहीत. कमी जागेमध्ये वितळण्याची प्रक्रिया घडत असल्यामुळे तो थंडही लवकर होतो. यातून सिरॅमिक घटकांची पारदर्शकता टिकवणे शक्य होते. 
  • सध्या ही प्रक्रिया दोन सेंमीपेक्षा लहान सिरॅमिक भाग जोडण्यासाठी उपयुक्त आहे. भविष्यामध्ये त्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी संशोधकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. हे संशोधन सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. 
टॅग्स

इतर टेक्नोवन
नारळ काढणी, सोलण्यासाठी यंत्रे फायदेशीर नारळ काढणी, झावळ्यांची स्वच्छता, कीडनाशक फवारणी...
कमी खर्चातील सौर ऊर्जा आधारीत...ग्रामीण भागातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी...
जांभूळ प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक...औषधी गुणधर्म असूनही व्यावसायिक तत्त्वावरील लागवड...
यंत्राद्वारे कमी खर्चात भात पेरणी शक्यभाताची रोपवाटिका करणे, जगवणे, रोपांची वाहतूक,...
एका कुटुंबासाठी स्वयंपूर्ण शिवार वसाहतअर्धा एकर शेतजमीन (दोन हजार चौ.मी. सूर्यप्रकाश) व...
कोरडवाहू सोयाबीनसाठी नावीण्यपूर्ण पेरणी...कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीनच्या लागवडीसाठी जोळओळ...
सुधारीत वाण, एकात्मिक तंत्रज्ञानातून...तेलबियांचे घटते क्षेत्र, उत्पादकतेची समस्या...
यंत्राद्वारे भात रोपांची लावणीभात लावणी यंत्राचे वॉकिंग टाईप आणि रायडींग टाईप...
भात पेरणीसाठी सुधारित यंत्रेभात लागवडीसाठी सुधारित यंत्राचा वापर फायदेशीर...
पेरणी यंत्राद्वारे पेरणी करताना...प्रशिक्षित ट्रॅक्‍टरचालक हवा    ...
जनावरांतील निदानासाठी क्ष-किरण तपासणीक्ष-किरण तपासणीद्वारे जनावरांतील जठराचा दाह,...
कामाच्या स्वरूपानुसार करा ट्रॅक्टरची...आज बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे व क्षमतेचे...
रासायनिक खतातील भेसळ कशी ओळखाल?खरीप हंगामातील पेरणीला सुरवात होणार असून, शेतकरी...
‘शनेश्‍वर’ शेतकरी कंपनीने उभारली अवजारे...राघोहिवरे (ता. पाथर्डी, जि. नगर)) या दुष्काळी...
पीक व्यवस्थापनामध्ये ड्रोन...पीक व्यवस्थापन, कीडनाशकांची फवारणी, सिंचन,...
काजूबोंडावरील प्रक्रियेसाठी आवश्यक...काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणात काजूपासून...
आव्हाने जाणून उतरा गूळ उद्योगातगुळाची मागणी गेल्या काही वर्षामध्ये वाढू लागली...
स्प्रेअरची निवड करताना राहा जागरूकपारंपरिक पाठीवरील पंपापासून अत्याधुनिक स्प्रेअरचा...
नेमकेपणाने फवारणी करण्यासाठी यंत्रमानव...सध्या पुणे येथील टाटा टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये...
कृषी उत्पादनांच्या विक्रीसाठी सामाजिक...छोट्या उद्योगापासून बहुराष्ट्रीय कंपन्यापर्यंत...