लिंबूवर्गीय फळपिकावरील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण

सद्यस्थितीत लिंबूवर्गीय फळबागेमध्ये नवीन नवती फुटत आहे. मोठ्या बागांमध्ये मृग बहाराची फुलधारणा होत आहे. या अवस्थेमध्ये पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसत आहे.
लिंबूवर्गीय फळपिकावरील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण
लिंबूवर्गीय फळपिकावरील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण

सद्यस्थितीत लिंबूवर्गीय फळबागेमध्ये नवीन नवती फुटत आहे. मोठ्या बागांमध्ये मृग बहाराची फुलधारणा होत आहे. या अवस्थेमध्ये पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसत आहे. पाने खाणाऱ्या अळीला लेमन बटरफ्लाय म्हणूनही ओळखतात. या किडीचा त्रास प्रामुख्याने रोपवाटिकेत होतो. याचे पतंग काळ्या पिवळ्या आकर्षक रंगाचे असतात. लहान अळ्या तपकिरी रंगाच्या असून, त्यावर पांढरे ठिपके असतात. पानांवर पक्ष्याची विष्ठा पडल्यासारख्या दिसतात. मोठ्या अळ्या हिरवट रंगाच्या असून, या अळ्या कोवळी पाने खातात. अधिक प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये संपूर्ण झाड पर्णविरहित होऊन जाते. व्यवस्थापन :

  • अंडी, अळ्या व कोष हाताने गोळा करावेत. ते रॉकेल मिश्रित पाण्यात बुडवून मारावेत.
  • झाड हालवून खाली पडलेल्या अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात.
  • बागेतील अथवा आजूबाजूस असलेले बावची सारख्या तणाचा वेळोवेळी बंदोबस्त करावा.
  • ट्रायकोग्रामा, अपेन्टेलस, कॅरोप्स, ब्रॅचीमेरीया या मित्र कीटकांचे संवर्धन करण्याकडे लक्ष द्यावे.
  • सुरुवातीपासून निंबोळी अर्क (५ टक्के ) किंवा कडूनिंबयुक्त कीटकनाशक (ॲझाडिरेक्टिन १० हजार पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रती लीटर याप्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
  • रासायनिक नियंत्रण ः क्विनालफॉस (२५ ईसी) ३ मि. ली. प्रती लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • डॉ. अनंत बडगुजर (सहाय्यक प्राध्यापक), ७५८८०८२०२४ डॉ. संजोग बोकन (संशोधन सहयोगी), ९९२१७५२००० ( कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com