जवसापासून मिळू शकेल आहारात वापरण्यायोग्य तेल

जवसापासून मिळू शकेल आहारात वापरण्यायोग्य तेल
जवसापासून मिळू शकेल आहारात वापरण्यायोग्य तेल

जवसाचे तेल हे प्राधान्याने व्यावसायिक कारणांसाठी वापरले जात होते. मात्र, या तेलाचा उपयोग मानवी आहारामध्ये शुद्ध अथवा मिश्रण स्वरूपामध्ये करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने संशोधन केले आहे. यासाठी खास एक जात विकसित केली असून, त्यामध्ये लिनोलेनिक आम्लाचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. भारतामध्ये खाद्य तेलांचे उत्पादन कमी असून, ती गरज पूर्ण करण्यासाठी आयातीवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे उपलब्ध सर्व प्रकारच्या तेलबियापासून खाद्य तेल बनवण्याच्या संशोधन प्रक्रियेला चालना मिळाली. जवसाच्या तेलामध्ये अल्फा लिनोलेनिक आम्लाचे प्रमाण अधिक असल्याने मानवी आहारामध्ये त्यांचा वापर शक्य होत नव्हता. केवळ उद्योगांमध्ये अखाद्य तेल म्हणूनच त्याचा वापर होत असे. यावर मात करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन संस्थेतील संशोधकांनी लिनोलेनिक आम्लाचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षाही कमी असलेली जात विकसित केली आहे. या जातीचे नाव टीएल ९९ आहे. या जवसापासून तयार केलेल्या तेलाचा दर्जा उत्तम असून, साठवण कालावधीही चांगला आहे. गेल्या वर्षापासून या जवसाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. अन्य खाद्यतेलांसोबत जवस तेलाचे मिश्रण केल्यास त्याचाही साठवण कालावधी वाढत असल्याचे दिसून आले आहे. कोल्ड प्रेस पद्धतीने काढलेल्या जवस तेलाचा वापर केळी चिप्स, पापड, पकोडे, पुरी आणि भाजी अशा अनेक पदार्थांच्या निर्मितीसाठी करता येऊ शकतो. अन्य तेलासोबत मिश्रणामध्येही या पदार्थांच्या चवीवर कोणताही विपरीत परिणाम दिसलेला नसल्याचे अहवालामध्ये नमूद केले आहे. थोडक्यात जवस तेल हे खाद्यतेलांच्या श्रेणीमध्ये आणण्यासाठी तयार आहे. तेलाचा उपयोग ः भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या माहितीनुसार, जवस ही वनस्पती अल्फा लिनोलेनिक आम्लाचा चांगला स्रोत आहे. हे सर्वात महत्त्वाच्या ओमेगा ३ मेदाम्लांपैकी एक असून, आरोग्यासाठी फायदेशीर मेदापैकी आहे. यातील आरोग्यवर्धक घटकांमुळे हृदयरोगाचा आजार कमी करण्यास मदत करते. यात विद्राव्य आणि अविद्राव्य तंतुमय पदार्थ असून, ते पचनसंस्थेसाठी उपयुक्त आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com