agriculture stories in marathi Magnetic nanoparticles with ionic liquids for water purification | Agrowon

पाणी शुद्धीकरणासाठी नॅनो तंत्रज्ञानाधारित पद्धती विकसित

वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

अधिक पाण्यावर गाळण यंत्रणा या तुलनेने सावकाश आणि अव्यावहारिक ठरतात. या स्थितीवर मात करण्यासाठी संशोधकांनी चुंबकीय अब्जांश (मॅग्नेटिक नॅनो) तंत्रज्ञानावर आधारीत पद्धत विकसित केली आहे. या नॅनो कणांवर आयनोकी द्रवाचे आवरण केल्यामुळे ते सेंद्रिय, असेंद्रिय आणि सूक्ष्मजीव अशा प्रदूषक घटकांसह सूक्ष्म प्लॅस्टिक कणही वेगळे करू शकतात. पुढे नॅनो कण चुंबकाच्या साह्याने सहजतेने वेगळे करता येतात. हे संशोधन जर्नल अॅंगेवांड्टे केमीमध्ये प्रकाशित केले आहे.

अधिक पाण्यावर गाळण यंत्रणा या तुलनेने सावकाश आणि अव्यावहारिक ठरतात. या स्थितीवर मात करण्यासाठी संशोधकांनी चुंबकीय अब्जांश (मॅग्नेटिक नॅनो) तंत्रज्ञानावर आधारीत पद्धत विकसित केली आहे. या नॅनो कणांवर आयनोकी द्रवाचे आवरण केल्यामुळे ते सेंद्रिय, असेंद्रिय आणि सूक्ष्मजीव अशा प्रदूषक घटकांसह सूक्ष्म प्लॅस्टिक कणही वेगळे करू शकतात. पुढे नॅनो कण चुंबकाच्या साह्याने सहजतेने वेगळे करता येतात. हे संशोधन जर्नल अॅंगेवांड्टे केमीमध्ये प्रकाशित केले आहे.

जगातील अनेक देशांमध्ये पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणे हीदेखील चैन ठरते. कारण पाण्याच्या शुद्धीकरण प्रक्रिया या तुलनेने अधिक महागड्या आणि अव्यावहारिक ठरतात. जर्मनीतील उल्म येथील हेल्महोट्झ विद्यापीठ आणि स्पेन येथील सीआयएससी युनिव्हर्सिदाद डी झारागोझा येथील संशोधक कार्स्टेन स्ट्रेब, रॉबेर्ट गिट्टेल आणि स्कॉट जी. मिट्चेल यांनी एकत्रितरीत्या पर्यायी पद्धत विकसित केली आहे. त्यामध्ये चुंबकीय आयर्न ऑक्साईडचे अब्जांशी कण आणि त्यावर सच्छिद्र सिलीकॉन डाय ऑक्साईडचे आवरण यांचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे सामान्य तापमानाला द्रव स्थितीत असलेल्या क्षाराचा थर दिला जातो. येथे संशोधकांनी पॉलीऑक्सोमेटाल्लेट्स या धातूच्या ऑक्सिजन अणूने बद्ध स्वरूपातील कणांचा वापर केला. जड धातूंना बांधून ठेवण्यासाठी टंग्स्टन हा धातू अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यावरील सिलिकॉन ऑक्साईडचे सच्छिद्र आवरणामध्ये सर्व प्रदूषक घटक शोषले जातात. असे सर्व कण चुंबकाच्या साह्याने सहजतेने बाहेर काढता येतात.

निष्कर्ष आणि फायदे ः
प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये शिसे, निकेल, तांबे, क्रोमीयम आणि कोबाल्टचे कण पाण्यातून वेगळे काढणे शक्य झाले. त्याच प्रमाणे सेंद्रिय अशुद्धीकारक घटकही काढता आले. त्याच प्रमाणे विविध जिवाणूंची वाढही कार्यक्षम रोखणे शक्य झाले. या नॅनो कणांच्या पृष्ठभागावर १ ते १० नॅनोमीटर व्यासाचे पॉलिस्टेरिन (सूक्ष्म प्लॅस्टिक) कण शोषले जातात. पर्यायाने तेही पाण्यातून बाहेर काढणे शक्य होते.
मध्यवर्ती आणि साध्या शुद्धीकरण प्रणालीमध्ये ही पद्धत चांगल्या प्रकारे कार्य करू शकते, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे. पर्यायाने मोठ्या प्रमाणातील पाण्याचे साठे या पद्धतीने शुद्ध करता येतील. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या तंत्रानासाठी कोणत्याही पायाभूत सुविधांची फारशी गरज भासणार नाही. त्यामुळे त्याचा वापर कोठेही करणे शक्य होईल.

 


इतर ताज्या घडामोडी
योग्य पद्धतीने करा बटाटा काढणीयंदा बटाटा पिकाची काढणी फेब्रुवारी- मार्च...
मध्य प्रदेशात द्राक्ष लागवडीसाठी ‘...पुणे : मध्य प्रदेशातील बागायतदार शेतकरी आता...
खरबूज लागवड तंत्रज्ञानखरबूज पिकाची लागवड जानेवारी ते मार्च यादरम्यान...
नांदर्खे, खोंडमळीत आधार प्रमाणीकरण,...नंदुरबार  ः महात्मा फुले कर्जमुक्ती...
जळगाव  : आधार प्रमाणीकरण करण्यासाठी...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कांदा दरांवरील दबाव वाढलाजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
गडहिंग्लजमध्ये यंदा अधिक पाणीसाठागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : गतवर्षीच्या ऑगस्ट...
यवतमाळ जिल्हा बॅंकेकरिता तब्बल ३००...यवतमाळ  ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या...
मोसंबीला खतमात्रा देणे अत्यंत आवश्‍यक...औरंगाबाद : ‘‘मोसंबी पीक हे शेतकऱ्यांची...
उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेती...नाशिक : मालेगाव तालुक्यातील वडेल येथील कृषी...
नांदेड विभागात साखरेचे २५ लाख क्विंटलवर...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीत १.२६...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये...
नाशिक : माथाडींच्या संपामुळे बाजार...नाशिक  : राज्यातील माथाडी कामगारांच्या...
‘भीमा’च्या कामगारांचे पैसे पाच...मोहोळ, जि. सोलापूर : कामगारांच्या खात्यावर ५...
सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून भाजप...मुंबई ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव...
करमाळ्यात शुद्ध; पंढरपुरात सर्वांत...सोलापूर : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे ६१५...
शिवस्मारक निविदेत गैरव्यवहार नाही;...मुंबई ः मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात...
तूर खरेदीसाठी हमी देण्याबाबत मंत्रिमंडळ...मुंबई ः ‘‘राज्यात सध्या ३१७ तूर खरेदी केंद्रे...
पुणे जिल्ह्यात भाजीपाला पिकांकडे...पुणे ः गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पोषक...
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी २६ मार्चला...मुंबई ः राज्यसभेच्या ५५ जागांसाठी येत्या २६ मार्च...