agriculture stories in Marathi medicinal plants for animal health | Agrowon

यकृत आजारावर चिरायता, कटुकी, माका उपयोगी

डॉ. सुधीर राजूरकर
मंगळवार, 26 जानेवारी 2021

प्रतिजैविकांच्या वापरामुळे पोटातील उपयुक्त सूक्ष्मजीव देखील मरतात. पर्यायाने जनावरांमध्ये अपचन, भूक मंदावण्याची लक्षणे दिसतात. यावर औषधी वनस्पती उपयोगी ठरतात.

जनावरांमध्ये आजारावर उपचार करताना प्रतिजैविकांचा वापर केला जातो. यामुळे घातक सूक्ष्मजीवांचे नियंत्रण होते. त्याच सोबत पोटातील उपयुक्त सूक्ष्मजीव देखील मरतात. पर्यायाने जनावरांमध्ये अपचन, भूक मंदावण्याची लक्षणे दिसतात. यावर औषधी वनस्पती उपयोगी ठरतात.

जनावरांची भूक ही अपचनामुळे कमी होते, परंतु त्यासोबत इतर संसर्गजन्य आजारांमध्ये जनावरांनामध्ये प्रतिजैविकांचा वापर होतो. त्यामुळे देखील जनावरांची भूक मंदावते. रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये पोटामध्ये पचनास उपयुक्त असे सूक्ष्मजीव असतात. उपचारासाठी प्रतिजैविकांचा वापर काही दिवसांसाठी करावा लागतो. अशा वेळेस ही प्रतिजैविके घातक सूक्ष्मजीवांच्या विरोधात काम करतात. त्याच सोबत पोटातील उपयुक्त सूक्ष्मजीव देखील मरतात. पर्यायाने जनावरांमध्ये अपचन, भूक मंदावणे ही लक्षणे दिसतात. याशिवाय इतर वेगवेगळ्या औषधांचा परिणाम यकृतावर होतो. यासारखीच लक्षणे आढळतात. अशावेळी यकृत उत्तेजक औषधीच्या वापराची आवश्यकता असते.
आज बाजारपेठेत अनेक यकृत उत्तेजक औषधी उपलब्ध आहेत. यातील बहुतांशी औषधी या आयुर्वेदिक म्हणजेच औषधी वनस्पतींच्या वापराने तयार केलेल्या आहेत. या सर्व औषधी वनस्पती आपल्या आसपास आढळतात. या वनस्पतींचा वापर करून आपण स्वतः आपल्या जनावरांवर उपचार करू शकतो.

यकृत उत्तेजक वनस्पती ः

चिरायता
१) अन्नपचनासाठी यकृत निरोगी असणे अत्यंत आवश्यक असते. कारण अन्नाच्या पचनास उपयुक्त असलेले पाचक रस यकृताद्वारे स्त्रवले जातात. अथवा यकृताच्या मदतीने त्यांची निर्मिती चांगल्या प्रकारे होते.
२) यकृताच्या आजारात यकृत पेशींवर विपरीत परिणाम होऊन त्यांची कार्यक्षमता कमी होते. अशी कार्यक्षमता कमी झालेल्या पेशींची शक्ती वाढवण्याचे कार्य चिरायता करते.
३) विविध संसर्गामुळे होणारा कावीळ हा यकृताच्या कार्यशक्तीवर विपरीत परिणाम करतो यावरदेखील चिरायता अत्यंत गुणकारी ठरते.
४) चिरायता या वनस्पतीला कडू चिरायता, काडे चिरायता अशा नावाने ओळखतात, चवीला अत्यंत कडू असणारी ही वनस्पती ती सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळते. यकृत उत्तेजक म्हणून कावीळ आजारांमध्ये ही अत्यंत उपयुक्त ठरते.

शरपुंखा
१) यकृताच्या पेशींना बळ देऊन त्यांची कार्यक्षमता वाढवणे, विविध पाचक रसांची निर्मिती शरीरात व्हावी यासाठी शरपुंखा ही वनस्पती अत्यंत उपयुक्त ठरते.
२) ही वनस्पती सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळते. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत आढळत असल्यामुळे हिला उन्हाळी असेदेखील म्हणतात.

कटुकी
१) यकृताच्या आजारात यकृत पेशींवर विपरीत परिणाम होऊन त्यांची कार्यक्षमता कमी होते. अशी कार्यक्षमता कमी झालेल्या पेशींची शक्ती वाढवण्याचे कार्य कटुकी करते.
२) विविध संसर्गामुळे होणारा कावीळ हा यकृताच्या कार्यशक्ती वर विपरीत परिणाम करतो यावरदेखील कटुकी अत्यंत गुणकारी ठरते.
३) याच वनस्पतीला कुटकी म्हणून देखील ओळखतात. चवीला अत्यंत कडू असणारी ही वनस्पती यकृत उत्तेजक म्हणून अत्यंत प्रसिद्ध आहे.

आवळा ः
१) हे फळ ताजे वापरावे. ताजे फळ उपलब्ध नसल्यास वाळवलेले म्हणजेच आवळकंठीचा वापर करावा.
२) शरीरातील विविध क्रियांमध्ये सर्व पेशी भाग घेतात. याच दरम्यान शरीरास उपायकारक घटक शरीरात ठेवून अपायकारक घटक शरीराबाहेर टाकण्याचे काम यकृत करते. या विविध क्रियांमध्ये यकृत पेशी व शरीराची झीज होते. यादरम्यान काही अपायकारक घटक म्हणजेच ऑक्सिडेंट तयार होत असतात. हे नित्य चालणारे काम आहे. या ऑक्सिडेंट घटकांची निर्मिती कमी करण्याचे काम आवळा करते.
३) आवळा अन्नपचनास मदत करतो. आवळ्याच्या तुरट चवीमुळे विविध पाचक रसांची निर्मिती होण्यामध्ये तसेच यकृत पेशींची कार्यक्षमता वाढविण्यामध्ये मदत होते.

माका
१) माका किंवा भृंगराज नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती यकृत उत्तेजक म्हणून अत्यंत प्रसिद्ध आहे.
२) माका या वनस्पतीमुळे यकृताच्या पेशी बळकट होतात. यकृताचे कार्य सुधारते. पर्यायाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
३) यकृत उत्तेजक गुणामुळे पित्तरसांची निर्मिती वाढून अन्नपचनास मदत होते. म्हणजेच अपचन दूर होऊन जनावराची मंदावलेली भूक वाढते.

कासनी
१) कासनी किंवा कासविंदा या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती.
२) कासनी ही वनस्पती श्‍वासाच्या आजारात देखील उपयुक्त आहे. याशिवाय कासनी चा उपयोग यकृत उत्तेजक म्हणून होतो.
३) यकृताची कार्यक्षमता वाढवणे, शरीरात तयार होणाऱ्या ऑक्सिडेंट विरोधात कार्य करणे हे कासनीचे वैशिष्ट्य.

टीप ः या लेखात दिलेल्या सर्व वनस्पती एकत्र करून वापरल्यास याचा चांगला उपयोग होतो. परंतु काही कारणास्तव काही वनस्पती जर आपल्याला मिळाल्या नाही तर ज्या वनस्पती उपलब्ध आहेत त्यांचा वापर करावा.

संपर्क ः डॉ. सुधीर राजूरकर, ९४२२१७५७९३
(प्राध्यापक, पशू औषधी व विषशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, परभणी)


इतर कृषिपूरक
वेळेवर उपचार करा, कासदाह टाळाकासदाह बाधित जनावरांना पशुवैद्यकाच्या सह्याने...
त्वचाविकारावर कडुलिंब, करंज उपयुक्तसंक्रमित त्वचा विकाराच्या आजारांमुळे हे...
अळिंबी उत्पादनामध्ये मोठ्या संधीभारतामध्ये अळिंबीचे विविध प्रकार उत्पादित केले...
कुक्कुटपालनाचे नियोजनकरार पद्धतीने कुक्कुटपालन करत असल्याने...
जनावरांतील गर्भाशयाचा दाहगर्भाशयाचा दाह हा विशेषतः दुधाळ व कमी...
प्रतिजैविकांचा योग्य वापर महत्त्वाचा...प्रतिजैविकांच्या अनावश्‍यक वापरामुळे...
जनावरांना उन्हाळ्यात द्या ऊर्जायुक्त...उन्हाळ्यामध्ये वाढलेल्या तापमानाचा जनावरांचे...
मत्स्यशेतीतील फसवणुकीचे नवनवीन फंडेसुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळ्या मार्गाने नव्या...
मत्स्यपालन व्यवसायाची महत्त्वाची सूत्रेमत्स्य संवर्धन करताना मातीची पोत, पाणी धरून...
खूर समस्येवर योग्य पोषण हाच उपायआवश्यकतेपेक्षा कमी, जास्त किंवा असमतोल...
जनावरांमधील पोटफुगीवर जिरे, हळद, बडीशेप...पोटफुगी आजारावर उपचार तत्काळ करणे आवश्यक असते....
मत्स्यबीजांमधील फसवणूक जाणून नुकसान टाळाशेतकऱ्यांना मत्स्यशेतीविषयी फारशी माहिती उपलब्ध...
पशुखाद्य निर्मितीसाठी आधुनिक यंत्रणादळलेले आणि योग्य प्रकारे मिसळले पशुखाद्य पावडर...
दुधाळ गायींमधील लंगडेपणावर उपायखुरांच्या समस्या हे लंगडेपणाचे प्रमुख कारण आहे....
यकृत आजारावर चिरायता, कटुकी, माका उपयोगीजनावरांमध्ये आजारावर उपचार करताना प्रतिजैविकांचा...
कुक्कुटपालनाचे नियोजननाव: सतीश पोपट कुळधर गाव: सायगाव, ता.येवला, जि....
सुधारित तंत्रातून वाढते पशुआहाराची...सर्वसाधारणपणे भौतिक, रासायनिक, जैविक,...
शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला, ॲ...झाडपाल्याचा शेळ्यांसाठी चारा म्हणून वापर केल्यास...
दुधी अळिंबी लागवड तंत्रज्ञान दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी...
प्लॅस्टिकमुळे जनावरांच्या कोठीपोटावर...पॉलिबॅग आणि प्लॅस्टिक साहित्य जनावरांच्या...