agriculture stories in Marathi medicinal quality of gram | Page 2 ||| Agrowon

गुणकारी अन् औषधी हरभरा

डॉ. विनिता कुलकर्णी
सोमवार, 28 डिसेंबर 2020

हरभरा पौष्टिक असल्याने अशक्तपणामध्ये जरूर खावा. कोवळे हरभरे भाजून खावेत.

साधारणपणे हिवाळ्यात कोवळा हरभरा येतो. हरभऱ्याचे घाटे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. त्यापासून विविध पदार्थदेखील रुचकर होतात. त्यामुळे गृहिणींमध्ये हरभरा विशेष प्रिय असतो. त्याचे पीठ, फुटाणे असे विविध पदार्थ तयार करता येतात. असा हा हरभरा औषध म्हणूनही उत्तम काम करतो. 
हरभऱ्याची आंब पचनावर उत्तम कार्य करते. अजीर्ण, अपचन, गॅसेससाठी उपयोगी असते. 

  • हरभरा पौष्टिक असल्याने अशक्तपणामध्ये जरूर खावा. कोवळे हरभरे भाजून खावेत.
  • हरभऱ्याच्या डाळीचे पीठ, साय, दूध, हळद, मध हे मिश्रण चेहऱ्याला लेप स्वरूपात लावून वाळले की काढून टाकावे. यामुळे त्वचेचा रंग आणि पोत सुधारतो. 
  • त्वचेच्या खाजेसाठी साबण बंद करून अंघोळीच्या वेळी हरभऱ्याचे पीठ दुधात कालवून लावावे. 
  • बऱ्याचदा सर्दी वारंवार होणे, घशामध्ये कफाचा चिकटा असणे, घसा खाकरावा लागणे अशा तक्रारी असतात. अशा वेळी फुटाणे पाच-सहा प्रमाणात दोन-तीन वेळा सेवन करावेत. पण त्यावर पाणी पिऊ नये. 
  • रात्री कफाचा खोकला असल्यास फुटाणे सेवन करून झोपल्यास कफ कमी होतो. घसा मोकळा होतो. अर्थातच कफ कमी करण्यासाठी औषधे जोडीला हवीतच. 
  • हरभरे भिजत घालून त्याला मोड आणून सेवन केल्यास शक्तिवर्धक म्हणून काम करतात. 
  • सर्दी खूप झाल्यास, नाक सारखे वाहत असल्यास रोज फुटाणे सेवन करावेत. त्याचा फायदा होतो. 
  • हरभरा औषधी असला तरी पचायला जड असतो. विशेषतः पीठ, भिजवलेली डाळ या गोष्टींनी पोट जड होते. म्हणून पचनशक्ती उत्तम असणाऱ्या लोकांनी हरभरा सेवन केल्यास शक्तिवर्धक म्हणून काम होते. हे महत्त्वाचे जरूर लक्षात ठेवावे. 

पथ्य 

  • जेवणाच्या वेळा नियमित ठेवाव्यात. 
  • जेवताना पाणी गरम प्यावे. 
  • शिळे, तेलकट, कमी शिजलेले, मांसाहार वर्ज्य करावा. मांसाहार पचवण्याची शक्ती असेल, तर १५-२० दिवसांतून एकदा करावा. हरभरा पौष्टिक असला तरी पचनशक्ती उत्तम राहावी म्हणून हे पथ्य पाळावे. 
  • काळजी
  • वारंवार कफ, सर्दी, खोकला असल्यास एक्‍स-रे, रक्ततपासणी, आवश्‍यक तपासण्या जरूर कराव्यात. 
  • नेहमीच्या औषधांच्या जोडीला पूरक म्हणून फुटाण्यांचा औषध म्हणून उपयोग करावा. अशा प्रकारे पदार्थात वापरला जाणारा हरभरा विविध रूपांत औषध म्हणून कार्य करतो.

 : डॉ. विनिता कुलकर्णी, ९४२२३१०३७७

पुणे


इतर कृषी प्रक्रिया
ऑलिव्ह तेलापासून बनवले वनस्पतिजन्य मांसप्राणीज मांसाचा वापर केलेल्या अनेक पदार्थातून...
सोयाबीनचे मूल्यवर्धित पदार्थसोयाबीनपासून सोया-दूध, सोया पनीर, पीठ आणि...
उद्योजकतेमध्ये कुटुंब, समाजाचा हिस्साउद्योग म्हणजे जोखीम. त्याच्याच यश व अपयश या दोन...
बटाट्यापासून वेफर्स, पावडर, फ्रेंच...मानवी आहारामध्ये बटाट्याचा वापर मोठ्या प्रमाणावर...
सब्जा बियांचे आरोग्यदायी फायदे सब्जामध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने...
लघु उद्योग आजारी का पडतात?लघुउद्योगांना दीर्घकाळ नफ्यात चालण्यासाठी अनेक...
भाजीपाल्यावरील प्राथमिक प्रक्रियासौर ऊर्जेवरील ड्रायर, इलेक्ट्रिक ड्रायरच्या...
बीटपासून बनवा पराठा, पावडर, सूपबीट ही भाजी तशी फार लोकांना आवडत नाही. मात्र,...
ग्रामीण सेवा क्षेत्रातील उद्योगांचा...ग्रामीण भागामध्ये सेवा उद्योगाच्या विस्ताराला...
सीताफळापासून बनवा आइस्क्रीम, रबडी,...सीताफळाचा गर वेगळा काढून केलेले पदार्थ आवडीने...
बहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धित पदार्थआवळा हे तुरट व आंबट चवीचे हिवाळ्यात येणारे...
उत्पादन क्षेत्रातील ग्रामीण उद्योगांचे...ग्रामीण भागातील निर्मिती करणाऱ्या एका छोट्या...
छोट्या उपायांद्वारे टाळता येईल अन्न...मागील भागामध्ये कृषी उत्पादनाच्या व वाहतुकीच्या...
लघुउद्योग चालू करण्यापूर्वीची तयारीमागील दोन लेखांमध्ये आपण छोट्या उद्योगात नफ्याचे...
तंत्रज्ञान वापरातून टाळा अन्नाची नासाडीकार्लो पेट्रिनी यांच्या मते, प्रत्येकासाठी अन्न...
डाळिंब फळांची प्रतवारी, साठवणूकमहाराष्ट्रामध्ये गेल्या दोन दशकांपासून डाळिंब एक...
चिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थचिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थांच्या निर्मितीला...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
छोट्या उद्योगात नफा कसा वाढवावा?नवीन लघुउद्योग सुरू केल्यानंतर उद्योजकांना अनेक...
हळदीपासून मूल्यवर्धित पदार्थ...बहुतांश भारतीय भाज्यांमध्ये हळदीचा कमी अधिक वापर...