agriculture stories in marathi medicine Kadu nim (Azadirachta indica) | Agrowon

बहुगुणी कडुनिंब

डॉ. विनिता कुलकर्णी
सोमवार, 27 जानेवारी 2020

विविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ उठणे, खरूज (कोरडी) यावरील उपचारासाठी कडुनिंबाचे तेल उपयुक्त आहे. गोवर, कांजिण्या येऊन बऱ्या झाल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुनिंबाची पाने घालून स्नान करावे. कारण कडुनिंब कृमिनाशक, रक्तदोषनाशक म्हणून कार्य करते.

विविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ उठणे, खरूज (कोरडी) यावरील उपचारासाठी कडुनिंबाचे तेल उपयुक्त आहे. गोवर, कांजिण्या येऊन बऱ्या झाल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुनिंबाची पाने घालून स्नान करावे. कारण कडुनिंब कृमिनाशक, रक्तदोषनाशक म्हणून कार्य करते.

आपल्या घराच्या अंगणात किंवा रस्त्याच्या बाजूला असलेली कडुनिंबाची झाडे सर्वांना परिचित आहेत. विविध औषधी गुणधर्मांमुळे कडुनिंबाला महत्त्वाचे स्थान प्राप्त होते. कडुनिंबाच्या पानांना गुढीपाडव्याला विशेष महत्त्व असते. या झाडाची पाने, फुले, बिया, खोडाची साल असे सर्वच भाग उपयुक्त असतात. विविध औषधांमध्ये कडुनिंबाचा वापर केला जातो.

  • कोणत्याही प्रकारचा ताप, कडकी यासाठी कडुनिंबाची साल आणि गुळवेल यांचा काढा करून दिला जातो. या वनस्पतीची पावडर मेडिकल किंवा काष्ठौषधीच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होते. तसेच झाडाचे खोड उगाळून त्यात खडीसाखर मिसळून दिल्यास मुरलेली उष्णता किंवा कडकी कमी होते.
  • विविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ उठणे, खरूज (कोरडी) यावरील उपचारासाठी कडुनिंबाचे तेल उपयुक्त आहे.
  • कडुनिंब हे कृमींवरसुद्धा उत्तम कार्य करते. कडुनिंब पानाच्या रसामध्ये मध, वावडिंग पावडर घालून दिल्यास कृमीवर चांगला परिणाम होतो.
  • दातांच्या उत्तम आरोग्यासाठी कडुनिंब खूप फायदेशीर आहे. रोज कडुनिंबाच्या काडीने दात घासावेत, त्यामुळे दात स्वच्छ आणि निरोगी राहतात. दात किडलेले असल्यास, कडुनिंबाच्या काढ्याने गुळण्या कराव्यात. तसेच तोंडामध्ये त्याजागी थोडा वेळ काढा धरून ठेवावा.
  • त्वचेवरील जखम, व्रण आकाराने लहान असेल तर कडुनिंबाच्या काढ्याने जखम स्वच्छ धुऊन घ्यावी आणि नंतर कोरडी करून त्यावर निंबतेल लावावे.
  • गोवर, कांजिण्या येऊन बऱ्या झाल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुनिंबाची पाने घालून स्नान करावे. कारण कडुनिंब कृमिनाशक, रक्तदोषनाशक म्हणून कार्य करते. त्वचेवरील खाज, आग कमी करण्यासाठी तसेच रक्तशुद्धीसाठी कडुनिंबाचा उपयोग होतो. विविध आजारांच्या लक्षणांनुसार इतर औषधांसमवेत काढा तसेच पावडर स्वरूपात त्याचा उपयोग होतो.

पथ्य ः
बहुगुणी कडुनिंबाचा उपयोग करताना काही पथ्य पाळणे आवश्‍यक आहे. आहारात तिखट, तेलकट, बाहेरचे पदार्थ, फळे, दूध, लोणचे, दही, आंबट ताक यांचे सेवन करणे पूर्ण बंद करावे. त्यामुळे कृमी, त्वचाविकार व रक्तदोषाला प्रतिबंध होतो.

टीप ः खूप बळावलेला जुनाट त्वचाविकार, वारंवार ताप येणे, खोकला, सर्दी अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत.

डॉ. विनिता कुलकर्णी, ९४२२३१०३७७


इतर कृषिपूरक
हिरव्या चाऱ्याच्या पूर्ततेसाठी मुरघास...हिरव्या चाऱ्याच्या व्यवस्थापनावर उपाययोजना म्हणून...
वाहतूक शेळ्या, मेंढ्यांची...तापमानात जास्त वाढ झाल्यास, शेळ्यांना शरीराचे...
व्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणीभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली. सर्व बचत...
कृषी पर्यटन ः आव्हानात्मक पूरक व्यवसायवसंताच्या मनातील कृषी पर्यटनाच्या विचाराला...
ऋतुमानानुसार म्हशीतील प्रजनन व्यवस्थापनअधिक दूध उत्पादनाकरिता म्हशीमधील प्रजनन सक्षम...
जैवपुंज निर्मितीसाठी विविध कार्बन स्रोतपाण्याचे तापमान, सामू, विरघळलेला प्राणवायू...
जनावरांच्या आहारामध्ये पोषकद्रव्ये...दुधाळ जनावरांच्या शरीराची प्रसूतिदरम्यान झालेली...
मेंढ्यांची संवाद साधण्याची पद्धतमेंढ्यांचे आवाज हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात...
मत्स्यशेतीसाठी पाण्याची गुणवत्ता...मत्स्यशेती यशस्वी होण्यासाठी मत्स्य टाक्यांची...
वयानुसार पुरवा कोंबड्यांना संतुलित खाद्यकुक्कुटपालनामध्ये एकूण खर्चाच्या जवळ जवळ ६० ते ७०...
फळबागेला दिली शेळीपालनाची जोडअजगणी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जगदीश...
जनावरांतील गोचीड तापगोचीड कान, पंजा, उदर, बारीक व नाजूक त्वचा तसेच...
जाणून घ्या ग्राहक संरक्षण अधिनियम, १९८६ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी...
शेळ्यांना द्या समतोल आहार शेळीच्या प्रजननक्षमता वाढीस आहाराचे...
मेंढीपालनाचे वार्षिक वेळापत्रकगाभण मेंढ्यांकडे विशेष लक्ष द्यावे. नवजात...
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
आरोग्यदायी शेळीचे दूधशेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील...
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...
..अशी ओळखा दुधातील भेसळवाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ...