मिल्क केक बनविण्याची प्रक्रिया

मिल्क केक बनविण्याची प्रक्रिया
मिल्क केक बनविण्याची प्रक्रिया

मिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी त्यातील भौतिक व रासायनिक गुणधर्मामुळे वेगळा आहे. हा दाणेदार खवा किंवा म्हशीच्या दुधापासून बनवतात. कलाकंदापेक्षा कमी ओलावा, साखरेचे प्रमाण जास्त, भौतिक रचना थोडीशी चिकट अशी त्याचे गुणधर्म आहेत. मिल्क केक हा दोन विशिष्ट थरांपासून बनलेला असून बरोबर मध्यभागी गडद्द तपकिरी व बाजूंच्या दोन्ही बाजूस हलक्या स्वरूपाचा तपकिरी रंगाचा असतो. कलाकंद हा एकसारख्या पांढरा ते हलक्या तपकिरी रंगांचा असतो.  मिल्क केक बनविण्यासाठी पद्धत :  म्हशीचे उच्च प्रतीचे दूध उकळविणे.  ⇒ ०.०२ टक्के सायट्रिक आम्ल द्रावण टाकणे.  ⇒ घेतलेल्या दुधाच्या ५० टक्के बाष्पीभवन करणे.  ⇒ घेतलेल्या दुधाच्या ६ टक्के साखर टाकणे.  ⇒ पुन्हा बाष्पीभवन करणे.  ⇒ इच्छित बाष्पीभवन होऊन अंतिम पदार्थ हा कोरडा दिसेपर्यंत  ⇒ गरम असस्थेत पदार्थ तबकामध्ये काढून घेणे.  ⇒ वातावरणातील तापमानापर्यंत थंड करून घेणे.  ⇒ इच्छित आकारात कापून घेणे. 

  • उच्च प्रतीचे म्हशीचे दूध घेऊन त्यास कापडाच्या सहाय्याने गाळून एका स्वच्छ अशा लोखंडी कढईत घेणे. दुधाला गरम करून उकळी आल्यानंतर सायट्रीक आम्लाचे द्रावण ०.०२ टक्के थोड्या प्रमाणात दुधात मिसळून घेऊन ते पूर्ण दूध सतत ढवळत राहावे. दुधामध्ये एकदम छोटे-छोटे दाणे दिसू लागतील. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान ढवळण्याची क्रिया सुरू ठेवावी. 
  • लोखंडी कढईतील पदार्थ कढईची बाजू सोडून मध्यभागी येण्यास चालू होईल, त्या वेळी एकूण दुधाच्या १२.५ टक्के या प्रमाणात साखर टाकावी. परत खुंटीच्या किंवा सराट्याच्या सहाय्याने ढवळत राहावे. अशा परिस्थितीत कढईतील पदार्थ जळू नये म्हणून नियंत्रित तापमान देणे आवश्यक असते. जेव्हा पदार्थातील जास्तीत जास्त पाण्याचे बाष्पीभवन झाल्यावर कोरडे झालेले मिश्रण दिसताच कढई उष्णतेवरून उतरवून बाजूला घ्यावी. कढईतील मिल्क केकचे मिश्रण एका तूप किंवा तेल लावलेल्या परातीत/तबकात काढून घ्यावे. थंड होण्यासाठी ठेवून द्यावे. 
  • तबकातील मिश्रण थंड झाल्यानंतर योग्य आकार देऊन तुकडे करावेत. 
  • मिल्क केकमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असून, ओलाव्याचे प्रमाण कमी असते. यामुळे याची टिकवण क्षमता कलाकंदपेक्षा जास्त असते. 
  • मिल्क केकची रासायनिक रचना (टक्के) :-  एकूण घन घटक : ८४.१७ स्निग्धांश : २१.३२ प्रथिने : ११.३८  कर्बोदके : ७.६७ साखर : ४०.४६ खनिजे : २.२९ निळकंठ पवार, ९४२३६७२६१६  (दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय, उदगीर) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com