agriculture stories in Marathi, moringa leaves gives more profit, Shyamsundar Jaygude | Page 2 ||| Agrowon

बांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न 

सतीश कुलकर्णी
सोमवार, 15 जुलै 2019

पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील श्यामसुंदर जायगुडे यांच्याकडे सेंद्रिय पद्धतीने फळबाग, ४० प्रकारच्या परदेशी भाज्यांची लागवड असते. त्यांच्या शेतीचे बांधही जिवंत असून, त्यावर विविध झाडांची लागवड केली आहे. त्यात १२० शेवगा झाडे आहेत. अन्य सेंद्रिय भाज्यांसह शेवगा शेंगाची विक्री पुणे, मुंबई येथील सेंद्रिय उत्पादनांची घरपोच विक्री करणाऱ्या कंपन्यांना केली जाते. वर्षभर त्याचा दर ८० रुपये प्रति किलो असा बांधलेला आहे. जानेवारी ते जून या काळात शेंगाचे उत्पादन मिळते. हा हंगाम संपताच झाडांची छाटणी करून अनावश्यक फुटवे काढून शेतात आच्छादन किंवा कंपोस्टिंगसाठी टाकले जात.

पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील श्यामसुंदर जायगुडे यांच्याकडे सेंद्रिय पद्धतीने फळबाग, ४० प्रकारच्या परदेशी भाज्यांची लागवड असते. त्यांच्या शेतीचे बांधही जिवंत असून, त्यावर विविध झाडांची लागवड केली आहे. त्यात १२० शेवगा झाडे आहेत. अन्य सेंद्रिय भाज्यांसह शेवगा शेंगाची विक्री पुणे, मुंबई येथील सेंद्रिय उत्पादनांची घरपोच विक्री करणाऱ्या कंपन्यांना केली जाते. वर्षभर त्याचा दर ८० रुपये प्रति किलो असा बांधलेला आहे. जानेवारी ते जून या काळात शेंगाचे उत्पादन मिळते. हा हंगाम संपताच झाडांची छाटणी करून अनावश्यक फुटवे काढून शेतात आच्छादन किंवा कंपोस्टिंगसाठी टाकले जात. मात्र, अभ्यासाअंती या पाल्यातून गुणधर्म, पोषकता याची माहिती झाली. ही माहिती थक्क करणारी होती. पाचकक्षमता वाढवणारा, पोटातील अल्सर, अस्थमा, डोकेदुखी अशा अनेक आजारांवर फायदेशीर ठरणारा बी १२ सह अनेक घटकांनी पोषक पाल्याचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय घेतला. 

शेवगा पाला विक्रीचा प्रयत्न ः 

श्यामसुंदर जायगुडे त्यांच्याकडून खरेदी करून घरपोच करणाऱ्या कंपन्यांना शेवगा पाल्याचे महत्त्व सांगू लागले. त्यासाठी यू ट्यूबवरील विविध व्हिडियो, मेसेज आणि माहितीचा वापर केला. त्यांनीही त्यांच्या शहरी ग्राहकांपर्यंत ही माहिती पोचवल्याने शेवगा पाल्याला मागणी येऊ लागली. साधारण २०० ग्रॅम शेवगा पाला गड्डीसाठी २० रुपये याप्रमाणे विक्री सुरू झाली. पहिल्याच हंगामात १०० गड्ड्यांची विक्री झाली. आता प्रति आठवडा सरासरी ५०० ते ७०० गड्ड्यांची मागणी असते. 

वाळलेल्या पाल्यासाठी ड्रायरची खरेदी ः 

अन्य काही कंपन्याकडून सावलीमध्ये वाळलेल्या शेवगा पाल्याची मागणी होऊ लागली. उन्हामध्ये वाळवलेल्या पाल्यातील पोषक घटक कमी होतात. रंग व दर्जा घटतो. हे लक्षात आल्याने शेवगा पाला वाळवण्यासठी विद्युत ऊर्जेवर चालणारा ड्रायर खरेदी केला. त्यामध्ये १० किलोपर्यंत ओला पाला वाळवता येतो. १० किलोपासून एक किलो वाळलेला पाला मिळतो. त्याचे ५० ग्रॅम, १०० ग्रॅम ते १ किलोपर्यंत मागणीनुसार पॅकिंग केले जाते. कंपन्याकडून प्रतिकिलो १००० रुपये दर मिळतो. 

अर्थशास्त्र 

  • ५ वर्षे वयाच्या झाडापासून सुमारे ५० ते ६० किलो ओला पाला मिळू शकतो. पण संपूर्ण पाला काढल्यास शेंगाचे उत्पादन मिळत नाही. त्यामुळे मागणीनुसार विरळणी करून साधारणपणे १० ते १२ किलो पाला काढला जातो. ओला पाला २०० ग्रॅम गड्डीसाठी २० रुपये प्रमाणे (प्रतिकिलो १०० रु.) विकला जातो. 
  • तो वाळवल्यावर शेवगा पाल्याचे वजन १ ते १.२ किलो मिळते. सध्या त्याची विक्री १००० रुपये प्रतिकिलोने केली जात आहे. 
  • शेवगा भुकटी करून घाऊक विक्रीसाठी आयुर्वेदिक कंपन्यांबरोबर बोलणी चालू आहेत. मात्र, या कंपन्याची मागणी ४५० ते ५०० रुपये प्रतिकिलो अशी असल्याने थांबलो आहे. 
  • या व्यतिरिक्त शेंगाचे उत्पादन प्रतिझाड ३० ते ५० किलोपर्यंत होते. त्याला कराराप्रमाणे ८० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. 
  • बांधावरच्या १२० झाडांच्या शेंगा व पाला विक्रीतून सुमारे ५.४ लाख रुपयांचे उत्पन्न प्रतिवर्ष मिळते. 

श्यामसुंदर जायगुडे, ९८९०७९९०७९


इतर अॅग्रोमनी
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
इंडोनेशियात साखर दरावरुन वातावरण तापले कोल्हापूर: लॉकडाऊनमुळे इंडोनेशियात साखर जात...
आत्मनिर्भर भारत योजनेला मंजुरी :...नवी दिल्ली : आत्मनिर्भर (स्वावलंबी) भारत योजनेत...
कीडनाशकांवर बंदीबाबत उद्योगातून तीव्र...पुणे : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या २७ रासायनिक...
काढणी-मळणी यंत्रांना मागणी वाढण्याची...पुणे: कोविड १९ साथीनंतर तयार झालेल्या आपत्कालिन...
देशातून ३६ लाख टन साखर निर्यात पुणे: देशातील साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी...
धोरणं बदलल्यास खाद्यतेलात भारत...एके काळी दोन वेळच्या अन्नासाठी इतर देशांकडे हात...
कृषी सलग्न व्यवसायासाठी ‘मुद्रा’मुद्रा योजनेत तीन प्रकार आहेत.  शिशू...
‘कोरोना’विषयक सेवेतून आम्हाला मुक्त करा...पुणे : ‘राज्यातील ९ हजार कृषी सहायकांना विविध...
एप्रिलमध्ये यंदा खत विक्रीत देशात ७१...नवी दिल्लीः कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात...
तारण अन् गहाणखतज्या चल बाबी आहेत, त्यांचे जे तारण बँक घेते,...
जळगावचा सुवर्णबाजारात ४२ दिवसानंतर...जळगाव ः राज्यभरात प्रसिद्ध असलेला जळगावचा...
पुढील हंगामावरही शिल्लक साखरेचे ओझे? कोल्हापूर: देशात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत...
इंडोनेशिया, इराणकडून साखरेला मागणी कोल्हापूर: गेल्या दोन महिन्यांपासून साखर...
गावबंदी सर्व्हेक्षण : भाज्या, फळांचे ६०...कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे राज्यात लावलेली...
डाळ उद्योग अडचणीत; ३० कोटींचा फटकाजळगाव : कोरोनाच्या संकटात खानदेशातील डाळ...