राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका मोठा 

राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका मोठा 
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका मोठा 

इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन टीबी, निलजिव्हा विषाणब अशा प्राणघातक रोगांचा प्रसार रोखण्यासाठी जनावरांच्या वाहतुकीवर बंदी आणण्यात आली आहे. या निर्णयांचा एकूण व्यापार आणि अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे युनिव्हर्सिटी ऑफ वारविक यांनी केलेल्या अभ्यासामध्ये दिसून आले आहे. प्राणघातक रोगांचा प्रसार रोखण्याच्या धोरणामध्ये वाहतूक बंदीचा आर्थिक विचार होणे आवश्यक असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.  गाई, मेंढ्या आणि अन्य प्राण्यांमध्ये लाळ्या खुरकुत रोगांचा २००१ मध्ये मोठा उद्रेक झाला होता. या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर रोगाचा प्रसार रोखण्यासाठी या प्राण्यांच्या वाहतुकीवर बंदी आणण्यात आली. अशाच प्रकारे २००७ मध्ये निलजिव्हा या विषाणूजन्य रोगाचा मोठा उद्रेक इंग्लंडमध्ये आढळून आला. या कारणांमुळे पूर्व इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांची ने- आण करण्यावर बंधने आणण्यात आली होती. अशा वाहतुकीच्या बंदीचा पशुपालन उद्योगावर आणि शेतकरी व्यावसायिकांवर अनेक मार्गाने परिणाम होत असतो. विशेषतः दोन शेतामधील प्रवास किंवा शेतापासून कत्तलखान्यापर्यंत प्रवास यावर अनेक मर्यादा येतात. विशेषतः २००१ मध्ये ग्रामीण भागामध्ये रोगाचा प्रसार असल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर पर्यटन उद्योगालाही मोठा फटका बसला होता.  या सर्व परिस्थितीमध्ये पशुधनामध्ये रोगाच्या प्रादुर्भावामुळे वाहतुकीवर घातलेल्या बंधनांच्या भूमिकेमुळे होणारे आर्थिक परिणाम या विषयावर वारविक विद्यापीठातील `झीमन इन्स्टिट्यूट फॉर सिस्टिम्स बायोलॉजी ॲण्ड इन्फेक्शियस डिसीज इपिडेमिऑलॉजी रिसर्च’ येथील संशोधक डॉ. माईक टिल्डेस्ले यांच्या नेतृत्वाखालील संशोधक गटाने अभ्यास केला आहे. त्याचे निष्कर्ष नेचर सस्टेनेबिलिटी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.  इंग्लंड येथील शासकीय धोरणानुसार राष्ट्रीय पातळीवर घातलेल्या वाहतूक बंदीमुळे अनावश्यक आर्थिक नुकसान पोचते. वास्तविक ज्या प्रदेशामध्ये रोगांचा प्रादुर्भाव किंवा तीव्रता अधिक आहे, अशा ठिकाणी स्थानिक वाहतूक बंदी अधिक उपयुक्त ठरू शकते. अशा केवळ ज्ञात प्रादुर्भावित फार्म निकटच्या भागामध्ये घातलेल्या स्थानिक वाहतूक बंदीमुळे रोगाचा प्रसाराला अटकाव करता येतो.  विशेषतः ज्या भागामध्ये प्रादुर्भाव नाही, अशा ठिकाणी पशुपालन उद्योगातील सर्व कार्ये सुरू राहतात. एकूण अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम कमी करता येणे शक्य आहे.  निष्कर्ष डॉ. टिल्डेस्ले यांनी आपल्या संशोधनावर प्रतिक्रिया देताना सांगितले, की प्राणघातक व संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव ही अत्यंत काळजीने हाताळण्याची गरज आहेच, मात्र त्यासोबत आपल्या दिशा आणि धोरणे ठरवताना त्याचे आर्थिक परिणामही विचारात घेतले पाहिजे. सध्याच्या राष्ट्रीय वाहतूक बंदीच्या तुलनेमध्ये प्रादुर्भाव असलेल्या भागांमध्ये बंदीचा अधिक फायदा दिसून येईल. आमच्या अभ्यासातून लाळ्या खुरकूत रोगासाठी वाहतुकीवरील बंदी केवळ १५ ते ६० किमी परिसरासाठी (ज्या भागामध्ये पर्यटन उद्योग नाही, अशा ठिकाणी ती थोडी अधिक ठेवणे शक्य आहे.) असावी. तर निलजिव्हा विषाणूसाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीला फारशी आडकाठी करण्याची गरज वाटत नाही.  अनिश्चिततेच्या आशंकेमुळे रोगाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्णय घेण्याचे धोरण सर्वसामान्यपणे राबवले जाते. त्याऐवजी ज्ञात रोगाचा प्रादुर्भाव ही बाब वाहतुकीवरील बंदीसाठी सुचविण्यात येत आहे. बोव्हाईन ट्युबरकॉलिसिस रोगाच्या बाबतीत तर वाहतुकीच्या बंदीमुळे होणारे आर्थिक परिणाम हे त्याच्या फायद्यापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. या रोगाच्या बाबतीत निदान चाचण्या पुरेशा स्वस्त असून, स्थानिक पातळीवर उपलब्ध आहेत. त्यांचा वापर योग्य तितक्या कार्यक्षमतेने करण्याची आवश्यकता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com