agriculture stories in marathi, New insights on impacts of crop trading in China | Page 2 ||| Agrowon

आंतरराष्ट्रीय व्यापारातून कमी होईल नत्र प्रदूषण, जमीन वापरावरील ताण

वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

एकविसाव्या शतकामध्ये मानवासमोर असलेल्या आव्हानामध्ये वाढत्या लोकसंख्येला पुरेसे खाद्य पुरविणे हे सर्वात महत्त्वाचे आव्हान राहणार आहे. त्यातही चीनसारख्या पिकाखालील जमिनीचे प्रमाण कमी (७ टक्के) आणि जगाच्या एक चतुर्थांश (२२ टक्के) लोकसंख्येच्या देशांसाठी तर ते अनेक अर्थाने आव्हानात्मक ठरणार आहे. चीनमधील पिकाच्या व्यापाराचे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणावरील परिणामांचा नुकताच अभ्यास करण्यात आला. एकूण आंतरराष्ट्रीय व्यापाराचा योग्य दिशेने वापर केल्यास चीनमधील नत्र प्रदूषण आणि जमीन वापरावरील ताण कमी करणे शक्य असल्याचे मत त्यातून व्यक्त केले आहे.

एकविसाव्या शतकामध्ये मानवासमोर असलेल्या आव्हानामध्ये वाढत्या लोकसंख्येला पुरेसे खाद्य पुरविणे हे सर्वात महत्त्वाचे आव्हान राहणार आहे. त्यातही चीनसारख्या पिकाखालील जमिनीचे प्रमाण कमी (७ टक्के) आणि जगाच्या एक चतुर्थांश (२२ टक्के) लोकसंख्येच्या देशांसाठी तर ते अनेक अर्थाने आव्हानात्मक ठरणार आहे. चीनमधील पिकाच्या व्यापाराचे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणावरील परिणामांचा नुकताच अभ्यास करण्यात आला. एकूण आंतरराष्ट्रीय व्यापाराचा योग्य दिशेने वापर केल्यास चीनमधील नत्र प्रदूषण आणि जमीन वापरावरील ताण कमी करणे शक्य असल्याचे मत त्यातून व्यक्त केले आहे.

चीनमध्ये उत्पादकतावाढीसाठी गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा (विशेषतः नत्रयुक्त खतांचा) वापर केला जातो. मात्र, त्यापैकी ६० टक्क्यांपेक्षा अधिक नत्राचा ऱ्हास होत आहे. या ऱ्हास होणाऱ्या नत्रामुळे वातावरणाचे, पाण्याचे प्रदूषण ही मोठी समस्या झाली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलॅंड सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल सायन्स येथील संशोधकांनी ऐतिहासिक माहितीसाठ्याचा वापर करीत अभ्यास केला आहे. त्यातून चीनमधील अन्नाची मागणी, पिकांचे उत्पादन यांच्यात संतुलन साधणारी शाश्वत धोरणे तयार करणे, व्यापार खर्च आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

त्याविषयी माहिती देताना संशोधक डॉ. क्षीन झांग यांनी सांगितले, की अन्नधान्याची मागणी आणि पुरवठा यांचे नेमके प्रमाण जाणून घेण्यासोबतच आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या धोरणातून त्यावर कशा प्रकारे मार्ग काढता येईल, यावर भर देण्यात येत आहे. आजवर शाश्वत प्रक्रियेच्या अभावामुळे व्यापाराचे नेमके परिणाम जाणून घेण्यात आलेले नाहीत. वेगवेगळ्या मार्गाच्या एकत्रिकरणातून मागणी, पुरवठा याबरोबरच पर्यावरणाच्या समस्यावर मार्ग काढता येईल.
सहलेखक ग्युओलीन यावो म्हणाले, की निर्यातक्षम पीक उत्पादनासाठी पर्यावरणामध्ये होत असलेल्या प्रदूषणाची आर्थिक मूल्य जाणून घेणे आवश्यक आहे. ते मूल्य हे व्यापारातून मिळालेल्या नफ्याशी तुलना करून पाहिले पाहिजे.

या संशोधनामध्ये चीन येथील १९८६ ते २०१५ या काळातील पीक उत्पादन आणि व्यापार यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्यातून व्यापाराचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण करण्यात आले. त्यात प्राधान्याने पर्यावरण (उदा. नत्राचे प्रदुषण, जमिनीचा वापर), सामाजिक (उदा. देशाचे पिकातील स्वावलंबित्त्व) आणि आर्थिक (उदा. व्यापाराचा खर्च, पर्यावरणाच्या ऱ्हासाची किंमत.) यांचा समावेश होता.
आयातीच्या माध्यमातून आलेल्या शेतीमालामुळे नत्राचे प्रदूषण आणि चीनमधील जमिनीच्या वापरावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. सध्याच्या व्यापारावरील खर्चाच्या तुलनेमध्ये आयातीचा खर्च कमी राहील.

  • या संशोधनामध्ये नायट्रोजन आणि जमीन यासाठी वेगळ्या पर्यायांचा विचार करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. जर चीनने आयात करण्याऐवजी पिकांची लागवड स्थानिक पातळीवर केली तर त्यासाठी नेमके किती नत्र खत आणि जमिनीची आवश्यकता असेल? अर्थात, आतापर्यंत नत्र वापराची कार्यक्षमता आणि पिकांचे उत्पादकता ही चीनमध्ये अन्य प्रगत देशांच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी आहे. हे देश उत्तम तंत्रज्ञान किंवा अतियोग्य वातावरणामध्ये पिकाचे उत्पादन घेत आहेत. त्यामुळे या देशातून पिकांची आयात केल्यास चीनवरील आणि एकूण जागतिक पर्यावरणातील ताण कमी होऊ शकेल. थोडक्यात, अन्नधान्यांच्या व्यापारातून जागतिक नत्रयुक्त खतांचा वापर, वितरणावरील खर्च कमी होईल.
  • सध्या एकूण मानवी वापरातील अन्नापैकी सुमारे २३ टक्के अन्नधान्य हे आंतरराष्ट्रीय व्यापारातून उपलब्ध होऊ शकते. मात्र, हा व्यापार अन्य देशांच्या तुलनेमध्ये अधिक उत्पादन कार्यक्षमता असलेल्या देशांकडून झाल्यास पर्यावरणावरील ताणही कमी होईल.
  • आम्ही केवळ गेल्या ३० वर्षातील उत्पादन आणि व्यापाराच्या माहितीचा अभ्यास केला नाही, तर चीनची एकूण क्षमता तपासण्यात आली. यामध्ये नत्र प्रदूषण कमी करण्यासोबत व्यापाराचा प्रवाह नेमका कोणत्या देशांशी करता येईल, या संबंधीचा आलेख तयार केला. नत्राची वापर कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रातील सुधारणा याकडेही लक्ष दिलेच पाहिजे.
  • हे संशोधन एन्व्हायर्नमेंटल रिसर्च लेटर्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

इतर ताज्या घडामोडी
नगर : चारा उत्पादनाबाबत मिळतेय अंदाजे...नगर ः खरीप, रब्बी हंगामासह चारापिके, कुरण, जंगल...
कर्जमाफीची दुसरी यादी उद्यासोलापूर : महाविकास आघाडीने महात्मा जोतिराव फुले...
सातारा जिल्ह्यात अवघे ३२ टक्के कर्जवाटपसातारा ः जिल्ह्यातील कर्जमाफीत अडकलेल्या...
नाशिक विभागात पहिल्या टप्प्यात होणार ७१...नगर  ः राज्यात ५० कोटी वृक्षलागवडीचे...
खानदेशात कापसाची खेडा खरेदी मंदावलीजळगाव  ः खानदेशात कापसाची बाजारातील आवक कमी...
मुली, स्त्रियांमध्ये अजूनही...जळगाव  : मुली, स्त्रियांमध्ये अजूनही...
दोडामार्ग : साडेतीन हजार केळी झाडांचे...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यातील वीजघर, बांबर्डे (...
पवनारमधील शेती कसण्यासाठी करावा लागतोय...वर्धा  ः धाम नदीच्या दुसऱ्या बाजूस शेती...
व्यवस्थापन मसाला पिकांचे...मिरी वेल आणि जायफळास पुरेसे पाणी आणि खत...
उष्ण तापमानाचा केळी बागेवर परिणामउष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी...
लागवड पालेभाज्यांची....पाण्याची उपलब्धता असल्यास कमी कालावधीत...
वर्षभरात चार हंगामांत फायदा देणारा घेवडासातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात बहुतांशी उसाचे...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची १८७५ ते २८१०...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे विद्यापीठात पश्चिम विभागीय औषधी...पुणे  ः केंद्र सरकारच्या आयुष...
शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठीची...शिर्डी, जि. नगर  : साई सिद्धी चॅरिटेबल...
माळेगाव कारखान्यात सत्तापरिवर्तन;...माळेगाव, जि. पुणे  ः राज्यात लक्षवेधी...
नगर जिल्ह्यातील सहा केंद्रांवर तूर...नगर  ः जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी आठ...
कर्जमाफीवरून विरोधक दुसऱ्या दिवशीही...मुंबई  ः भाजपने शेतकरी कर्जमाफी आणि महिला...
सातारा जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्रावर...सातारा  ः जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी...
मसाला, सुगंधी वनस्पतीवर्गीय पिकांची...अकोला  ः ‘‘आपल्याकडील हवामान, जमीन हे मसाला...