agriculture stories in Marathi, New microbe discovered in wheat stem sawfly | Agrowon

गव्हावरील किडीच्या नियंत्रणासाठी सहजीवी सूक्ष्मजीवांचा अभ्यास

वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

मोंटाना राज्य विद्यापीठातील कृषी महाविद्यालयातील संशोधकांच्या गटाने गहू स्टेम सॉफ्लाय या किडीसोबत सहजीवी पद्धतीने राहणाऱ्या व आजवर अज्ञात असलेल्या सूक्ष्मजीवांचा शोध लावला होता. त्याचे नाव स्पायरोप्लाझ्मा स्पे. असे ठेवले आहे. या सूक्ष्मजीवांचा या किडीच्या नियंत्रणासाठी कशाप्रकारे उपयोग करून घेता येईल, यावर सध्या अभ्यास करण्यात येत आहे. कार्ल येवोमन आणि डेव्हिड विव्हर यांचे संशोधन जर्नल पीआरजेमध्ये प्रकाशित केले आहे.

मोंटाना राज्य विद्यापीठातील कृषी महाविद्यालयातील संशोधकांच्या गटाने गहू स्टेम सॉफ्लाय या किडीसोबत सहजीवी पद्धतीने राहणाऱ्या व आजवर अज्ञात असलेल्या सूक्ष्मजीवांचा शोध लावला होता. त्याचे नाव स्पायरोप्लाझ्मा स्पे. असे ठेवले आहे. या सूक्ष्मजीवांचा या किडीच्या नियंत्रणासाठी कशाप्रकारे उपयोग करून घेता येईल, यावर सध्या अभ्यास करण्यात येत आहे. कार्ल येवोमन आणि डेव्हिड विव्हर यांचे संशोधन जर्नल पीआरजेमध्ये प्रकाशित केले आहे.

उत्तरेतील पठारी प्रदेशातील गहू पिकाचे दरवर्षी स्टेम सॉफ्लाय या किडीमुळे गहू पिकाचे सुमारे ३५० दशलक्ष डॉलर इतक्या किमतीचे नुकसान होते. नुकसान होते. कीटकासोबत सहजीवी संबंध असलेल्या असंख्य सूक्ष्मजीव प्रजाती आहेत. हे सहजीवी संबंध दोघासाठीही फायद्याचे असल्याचे दिसून येते. अगदी कीटकांच्या पचनसंस्थेमध्ये अन्नद्रव्यांचे पचन करण्यापासून प्रजोत्पादनासारख्या महत्त्वाच्या जैविक प्रक्रियेमध्येही अशा सूक्ष्मजीवांचा समावेश असतो. म्हणजेच या सूक्ष्मजीवांची संख्या नियंत्रित करता आली तरी कीटकांच्या जीवनामध्ये अनेक बदल घडू शकतात. काही कीटक, शेतीतील किडीची रोगप्रतिकारशक्तीही अशा सहजीवी सूक्ष्मजीवांच्या कार्यावर अवलंबून असल्याचे दिसून येते. म्हणजेच किडींना होणारे रोगही आपल्या या सूक्ष्मजीवांच्या साह्याने ठरवता येऊ शकतात. या गृहीतकावर गहू पिकातील स्टेम सॉफ्लायच्या नियंत्रणासाठी अभ्यास करण्यात येत आहे.
विव्हर यांनी सांगितले, की गहू पिकाच्या काडीमध्ये ही कीड अंडी घालते. त्यातून बाहेर पडलेली अळी आतील गाभा खाऊन टाकते. पर्यायाने मध्ये काडी मोडून नुकसान होते. दाण्यांच्या वजनामध्ये २० ते ३० टक्क्यांपर्यंत नुकसान नोंदवले आहे. मात्र, जर काडी मोडून पडले तर नुकसानीचे प्रमाण ३० टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत पोचते.
संशोधकांच्या गटाने दोन ठिकाणावरून गहू पिकावरील खोडमाशीच्या अळी आणि प्रौढ जमा केले. प्रयोगशाळेमध्ये विश्लेषण केले असता त्यांच्या व सॉफ्लायच्या डीएनए जनुकांमध्ये तीन घटक आढळून आले.
अन्य एका प्रकल्पामध्ये वॉन्नर आणि विव्हर यांचा गट सॉफ्लाय यांनी खालेल्या पदार्थांचे शर्करेमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्पायरोप्लाझ्मा मदत करते. कर्बोदकप्रधान आहार घेणाऱ्या या किडीला अन्य घटक आणि जीवनसत्त्वे मिळवून देण्यासाठी मदत होते.

ही पद्धत अन्य किडींसाठीही उपयुक्त आहे. चीन येथील संशोधकांचा एक गट वाटाणाऱ्यावरील मावा कीड आणि सहजीवी सूक्ष्मजीव यातील संबंधाचा अभ्यास करत आहेत. मावा किडीच्या प्रजोत्पादनाचे प्रमाण कमी राखण्यासाठी विंचवाच्या विषापासून रसायन वेगळे केले जात आहे.


इतर ताज्या घडामोडी
नागपूर जिल्ह्यात मोठा आणि तान्हा पोळा...नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे...
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना ८५००...औरंगाबाद :  जिल्ह्यातील ९६३ शेतकऱ्यांकडून...
मराठवाड्यात सुमारे ४७ लाख हेक्टरवर खरीपऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण...
खानदेशात तीन दिवसांपासून भिज पाऊसजळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून भिज...
अमळनेरमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलावावडे, जि. जळगाव  : अमळनेर तालुक्यात जवळपास...
खडकवासलातून ११ हजार ७३५ क्युसेक विसर्गपुणे : खडकवासला धरणातून बुधवार (ता. १२) पासून...
सातपुड्यात मूगाच्या नुकसानीची शक्यताजळगाव  ः खानदेशात सातपुडा पर्वत भागात पाऊस...
गडचिरोलीत युरियाची कृत्रिम टंचाईगडचिरोली : जिल्ह्यात दोन महिन्यानंतर बरसलेल्या...
परभणीत बँकांचे उंबरठे झिजवून...परभणी : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंका...
मुंगळा परिसरात रानडुकरांचा धुडगूसमुंगळा जि. वाशीम ः चांगल्या पावसामुळे यंदा या...
‘रासाका’ सुरू करा, अन्यथा उपोषण’नाशिक : यंदाचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई...नांदेड ः प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया...
वणी उपविभागातील शेतकऱ्यांना विमा...यवतमाळ : पीक विमा काढल्यानंतरही ही गेल्या तीन...
वाढीव वीज बिले कमी न केल्यास आंदोलन...सोलापूर  ः लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील...
बुलडाणा जिल्ह्यात शेततळ्यांचे अनुदान...बुलडाणा ः या वर्षात शेततळे खोदलेल्या शेतकऱ्यांना...
सोलापूर जिल्ह्यात उसावर ‘हुमणी’चा...सोलापूर  : जिल्ह्यात खरिपातील मूग, उडदावर...
राधानगरीतून २८०० क्युसेक विसर्गकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर...
सांगली जिल्ह्यात तुरीच्या पेरणी...सांगली : जिल्ह्यात गतवर्षी परतीचा झालेला पाऊस आणि...
मका बनले नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीकयेवला : कांद्याचा अन् द्राक्षाचा जिल्हा अशी...
रत्नागिरीत मत्स्य शेतीकडे छोट्या...रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोंचे...