भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
टेक्नोवन
डाळिंबाचे नवीन अधिक पोषक वाण ः सोलापूर लाल
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रामध्ये भगवा, गणेश, नाना, दारू अशा विविध वाणांच्या संकरातून नवीन वाण सोलापूर लाल हे वाण विकसित करण्यात आले आहे.
- भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रामध्ये भगवा, गणेश, नाना, दारू अशा विविध वाणांच्या संकरातून नवीन वाण सोलापूर लाल हे वाण विकसित करण्यात आले आहे.
- २०१७ मध्ये विकसित केलेल्या या वाणाच्या फळामध्ये मोठ्या प्रमाणात लोह, जस्त, व्हिटॅमिन-सी आणि अँथोसायनिन आहे. मानवी शरीरातील पोषक घटकांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हे फळ वरदान ठरणार आहे.
- शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही सोलापूर लाल हे वाण लवकर परिपक्व होणारे आणि अधिक उत्पादन देणारे आहे. पक्वतेत या वाणाचा टीएसएस १७ अंश ब्रिक्सच्या वर आहे. त्यामुळे हा वाण प्रक्रियेसाठीही आशादायक ठरू शकेल.
- १७ अंश ब्रिक्स पेक्षा अधिक टीएसएस आणि पौष्टिकदृष्ट्या समृद्ध असल्याने निर्यातीमध्येही चांगली मागणी राहू शकेल.
- २०२० मध्ये सततच्या पावसाच्या दिवसातही सोलापूर लाल वाणाच्या झाडावरील फूल गळ कमी होती आणि चांगली फळधारणा झाल्याचे दिसून आले होते.
- -भगवा वाणाप्रमाणेच ‘सोलापूर लाल’ हे एक नवीन वाणही तेलकट डाग रोगाला संवेदनशील आहे.
सोलापूर लाल डाळिंबाची वैशिष्ट्ये ः
झाडाची उंची (मी) ः २.० ते २.३*
फळ परिपक्वता (दिवस) ः १६०-१६५*
फळांचे वजन (ग्रॅम) ः २६०-२७० ग्रॅम
फळांची संख्या (संख्या / झाड) ः भगवापेक्षा अधिक. (अनावश्यक फळे काढल्यावर) १३०-१४०*
सहाव्या वर्षी उत्पादन (टन / हेक्टर) ः २६-२७*
फळांचा रंग ः पूर्णपणे लाल*
सालीची जाडी (मिमी) ः मध्यम (३.३-३.५)
दाणे ः टपोरे आणि गडद लाल*
बियांचा पोत ः मध्यम**
टीएसएस (अंश ब्रिक्स) ः १७ पेक्षा अधिक*
व्हिटॅमिन-सी, अँथोसायनिन, जस्त, लोह ः भगवा वाणापेक्षा अधिक
जिवाणू जन्य रोग (तेलकट डाग) आणि इतर रोगांना संवेदनशीलता ः भगवा प्रमाणेच
(टिप :
१) कंसात एक तारा (*) चिन्हांकित केलेल्या बाबी अक्षरे भगवापेक्षा वरिष्ठ आणि दुहेरी तारा (**) चिन्हांकित अक्षरे भगवापेक्षा निकृष्ट आहेत.
२) वरील वैशिष्टे ६ वर्षापेक्षा जास्त वयाच्या शारीरिकदृष्ट्या परिपक्व झाडांवर आधारित आहेत. सोलापुरात पावसाळ्याच्या हंगामातील पिकाच्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या ठिकाणी, हवामान परिस्थिती, पीक हंगाम आणि व्यवस्थापन पद्धतींमध्ये बदल होवू शकतात.
सर्वसामान्य शेतकऱ्यांना सोलापूर लाल या नव्या वाणांच्या निरोगी रोपांची उपलब्धता व्हावी, यासाठी डाळिंब संशोधन केंद्रामार्फत राज्य शासनाकडून प्रथम नर्सरी प्रमाणपत्र घेण्याच्या अटीवर काही शेतकरी व रोपवाटिकांनाच केवळ तीन वर्षाच्या मर्यादित कालावधीसाठी परवाने दिले आहेत. रोपांची खरेदी करण्यापूर्वी संबंधित फर्मकडे 'सोलापूर लाल' करिता राज्य शासनाने दिलेले वैध नर्सरी प्रमाणपत्र असल्याची खात्री करून घ्यावी. पीपीव्ही व एफआरए, नवी दिल्ली अंतर्गत विविध प्रकारच्या अस्थायी संरक्षणाखाली असल्याने या वनस्पतींच्या विक्रीस इतर कोणत्याही स्रोतास परवानगी नाही. नर्सरी परवाना नसलेल्या फर्मकडून रोपांची खरेदी व लागवड केल्यास संस्था जबाबदार राहणार नाही.
सोलापूर लाल हे नव्याने प्रसारित केलेले वाण असून, सोलापूर येथील संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर उपलब्ध परिस्थितीत त्याचे मूल्यांकन केले आहे. वेगवेगळ्या कृषी प्रक्षेत्रामध्ये, शेतकऱ्यांच्या शेतातील परिस्थितीत, प्रत्यक्ष कामगिरीचे नेमके आकलन होण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरुवातीला कमी क्षेत्रावर लागवड करून पाहणे गरजेचे आहे.
- 1 of 22
- ››