agriculture stories in marathi, A new way to turn heat into useful energy | Agrowon

वाया जाणाऱ्या उष्णतेपासून विद्युत ऊर्जा मिळवणे शक्य

वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

कारचा एक्झॉस्ट पाइप, औद्योगिक प्रक्रियामध्ये सध्या वाया जाणाऱ्या उष्णता ऊर्जेचा अधिक कार्यक्षम वापर करून विद्युत ऊर्जानिर्मितीसाठी आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट कार्यरत आहे. हे संशोधन ‘जर्नल सायन्स ॲडव्हान्सेस’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

असे आहे संशोधन ः

कारचा एक्झॉस्ट पाइप, औद्योगिक प्रक्रियामध्ये सध्या वाया जाणाऱ्या उष्णता ऊर्जेचा अधिक कार्यक्षम वापर करून विद्युत ऊर्जानिर्मितीसाठी आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट कार्यरत आहे. हे संशोधन ‘जर्नल सायन्स ॲडव्हान्सेस’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

असे आहे संशोधन ः

ओहियो राज्य विद्यापीठातील अब्जांशी तंत्रज्ञान (नॅनो टेक्नॉलॉजी) विषयातील संशोधक जोसेफ हेरेमान्स यांनी सांगितले, की आजवर वाया जात असलेल्या उष्णता ऊर्जेचा वापर विद्युत ऊर्जेच्या उपलब्धतेसाठी करणे शक्य आहे. हे संशोधन पॅरामॅग्नोन्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अतिसूक्ष्म कणांवर आधारित आहे. सामान्य चुंबकाला उष्णता दिली असता त्याचे चुंबकीय गुणधर्म नष्ट होतात. त्यानंतर शिल्लक राहणाऱ्या घटकांना पॅरामॅग्नेटिक अशी संज्ञा आहे. या कणांमध्ये काही चुंबकीय फ्लक्स किंवा स्पिन असतो. या फिरण्यातून तयार होणारी ऊर्जेला मॅन्गोन संचलित उष्मा विद्युत म्हणतात. आजवर सामान्य तापमानामध्ये त्याचा वापर ऊर्जेच्या संग्रहणासाठी करण्यात आलेला नव्हता.

पारंपरिक शहाणपणानुसार, पॅरामॅग्नेटला उष्णता दिली असता काही घडत नाही असे मानले जाते. मात्र, हेरेमान्स म्हणाले, की हे पारंपरिक शहाणपणा सत्य नसल्याचे आम्हाला दिसून आले. त्यातून आम्ही उष्मा विद्युत अर्धवाहकांच्या (थर्मोइलेक्ट्रीक सेमीकंडक्टर) निर्मितीची नवी पद्धत शोधली. सध्या उष्णतेपासून विद्युत ऊर्जेच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती या अकार्यक्षम असून, त्यांचा वापर फारसा शक्य होत नाही.

चुंबक हे उष्णता गोळा करण्यासाठी महत्त्वाचे असून, जेव्हा चुंबकांची एक बाजू उष्ण केली जाते, त्या वेळी त्याची दुसरी बाजू थंड राहून अधिक चुंबकीय होते. त्यातून त्यातील इलेक्ट्रॉन्सला एक गती मिळते. या गतीमुळे चुंबकातील इलेक्ट्रॉन्स पुढे ढकलले जातात आणि विद्युत ऊर्जा तयार होते. या प्रक्रियेमध्ये त्याचे चुंबकीयत्व कमी होत असले तरी त्याचे पॅरामॅग्नेट तयार होते. इलेक्ट्रॉन पुढे ढकलण्याची कृती सेकंदाच्या दशलक्षाव्या भागाच्या अब्जाव्या भाग इतक्या अत्यल्प वेळेसाठी होते. मात्र, तरीही तो उष्णता ऊर्जा ग्रहण करण्यासाठी योग्य ठरते.

संशोधकांच्या गटामध्ये ओहिओ राज्य विद्यापीठ, नॉर्थ कॅरोलिना राज्य विद्यापीठ, चायनीज अॅकेडमी ऑफ सायन्सेस येथील संशोधकांचा समावेश होता.

 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...
अत्यावश्यक वेळीच रासायनिक तणनियंत्रक...हिंगोली : ‘‘शेतकऱ्यांनी तणनियंत्रणासाठी केवळ...
सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांत गेल्या...सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघू ८४ प्रकल्पांची...
कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी...रत्नागिरी  : अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात...
`म्हैसाळ’ची कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण...सोलापूर  : म्हैसाळ योजनेतून सांगोला,...
काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला...नाशिक  : जगात भारत नारळ उत्पादनात आघाडीवर...
बियाणे बदलून देण्याच्या आदेशाची...अकोला  ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन...
मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची वरिष्ठ...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या...
शेती नियोजनातून साधावा आर्थिक प्रगतीचा...नागपूर  : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच...
भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीरमुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...
राज्यात चांगल्या पावसाचा अंदाजभारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कृषी मोसम...
पुणे जिल्हा परिषदेची मागासवर्गीय...पुणे  : पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय...
नगरमध्ये १८ हजार हेक्टरवर उडदाची पेरणीनगर  ः नगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
अकोला जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा...अकोला  ः यंदाच्या हंगामात मृग नक्षत्रात...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची संख्या वाढलीजळगाव  ः खानदेशात यंदा रोपवाटिकांची संख्या...