तेलबिया प्रक्रिया उद्योगात आहेत संधी

तेलबिया
तेलबिया

खाद्यतेलाच्या गरजा भागवण्यासाठी तेलबिया प्रक्रिया उद्योग ग्रामीण तसेच शहरी भागात सुरू झाले आहेत. काही भागात मोठ्या प्रमाणावर तेल काढण्यासाठी सॉल्व्हंट प्लांटची सुरवात झाली. अशाप्रकारे काढलेले तेल रसायनांच्या मदतीने शुद्ध करून बाजारात उपलब्ध केले जाऊ लागले.   अलीकडे तेलघाणीतील तेलाचा वापर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे तेलबिया प्रक्रियाचा कुटीर ते मध्यम स्तरीय उद्योग ही एक चांगली संधी तयार झाली आहे. २०१६-१७ या वर्षात देशामध्ये तेलबियांचे उत्पादन २३२.८ लाख मेट्रिक टन अनुमानित आहे.  याचबरोबरीने जवस, कारळे, सरकी, खोबरे तसेच भाताच्या कोंड्याच्या तेलाचा समावेश होतो. यापासून ६९.६० लाख टन खाद्यतेल मिळते.   खाद्यतेलाची बाकीची गरज पूर्ण करण्यासाठी आपण ते आयात करतो. तेलबियापासून तेल काढणे एवढाच एक तेलबिया प्रक्रिया उद्योग नसतो. बऱ्याचदा उद्योग म्हणजे मोठी जागा, त्यावर उभा केलेला कारखाना, त्यामध्ये काम करणारे मजूर इ. असे चित्र डोळ्यासमोर उभे रहाते. परंतु, आता वेगवेगळे उद्योग उभे राहात आहेत.  काही तेलबिया आपण पूर्ण दाण्याच्या रूपात खाद्योपयोग करतो. शेंगदाणे, सोयाबीन, जवस, सूर्यफूल, तीळ इ. मात्र उपयोग करण्यासाठी प्रत्येक तेलबियांवर वेगवेगळी प्रक्रिया करणे आवश्‍यक असते. अशा प्रकारचा प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यासाठी जास्त जागा अथवा भांडवल लागत नाही.

भारतामध्ये तेलबियांचे उत्पादन (वर्ष २०१६-१७) (आकडे लाख टनांत)

तेलबिया उत्पादन खरीप अनुमानित उत्पादन रब्बी एकूण उत्पादन
भुईमूग ४५.० १७.०   ६२.०
सोयाबीन ९५.० -- ९५
सूर्यफूल  १.० ३.५ ४.५
तीळ ४.० ३.५ ७.५
मोहरी ६३.० -- ६३.०
करडई -- ०.३० ०.३०
एकूण १४५.० ८७.८० २३२.८०

संपर्क -  डॉ. एस. डी. कुलकर्णी ९७५२२७५३०४ (लेखक केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ येथे कार्यरत होते)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com