भेंडी पिकावरील किडींचे नियंत्रण 

भेंडी पिकावरील किडींचे नियंत्रण 
भेंडी पिकावरील किडींचे नियंत्रण 

भेंडी पिकावरील महत्त्वाच्या किडींची ओळख आणि नियंत्रणाची माहिती घेऊ.  फळे व शेंडा पोखरणारी अळी (Earias Vitella)  सक्रिय काळ व नुकसानीचा प्रकार 

  • अळी कोवळ्या शेंड्यावर उपजीविका करते. ज्या वेळेस फळे तयार होतात, फळांत शिरून त्यावर उपजीविका करते. 
  • अळी तपकिरी पांढऱ्या रंगाची असते. तिच्या शरीरावर तपकिरी ठिपके असून, ही अवस्था १० ते १४ दिवसांची असते. 
  • मादी पतंग कोवळ्या शेंड्यांवर, कळ्यांवर, कोवळ्या फळांवर निळसर हिरवी अंडी एकएकटी देते. 
  • सुप्तावस्था ः अळी पुढे रोपावर किंवा जमिनीत रेशमासारख्या कोषात कोषावस्था पूर्ण करते. कोष तपकिरी रंगाचा असून, कोषावस्था ७ दिवसांची असते. 
  • मावा (Myzus Persicae) 

  • किडीचे पिल्ले आणि प्रौढ पानांच्या खालील बाजूस राहून पानांतील रस शोषतात. ही कीड विषाणूजन्य रोगांचाही प्रसार करते. 
  • मादी पानांच्या खालील बाजूस अंडी देते. वर्षभरात सुमारे २० पिढ्या तयार होतात. 
  • व्यवस्थापन 

  • कीडग्रस्त भेंडी तोडून अळीसहीत नष्ट करावीत. 
  • शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतामध्ये हेक्टरी ५ कामगंध सापळे (इरिल्युर) लावावेत. 
  • शेतामध्ये मित्र कीटक जसे ढालकिडा, क्रायसोपा, सिराफिड माशी, कोळी, भक्षक ढेकूण इत्यादी व परोपजीवी कीटक उदा. ट्रायकोग्रामा, ब्रॅकॉन इ. संवर्धन करावे. 
  • शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसताच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. 
  • रासायनिक कीटकनाशकाचा वापर फक्त किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच करावी. 
  • (फवारणी - मात्रा प्रतिलिटर पाणी)  ठिपक्याच्या अळीकरिता-  ईमामेक्टिन बेन्झोएट (५ एस.जी.) ०.४ ग्रॅम किंवा क्लोरॲण्ट्रानीलीप्रोल (१८.५ ई. सी.)०. ३ मिली किंवा क्विनॉलफॉस (२५ टक्के इसी) २ मिली.  मावा किडीकरिता  थायामेथोक्झाम (२५ टक्के) ०.२५ ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रीड (२० टक्के) ०.२ ग्रॅम.  विवेक सवडे (आचार्य पदवी विद्यार्थी) ९६७३११३३८३  डॉ. धिरज कदम (सहयोगी प्राध्यापक) ९४२१६२१९१०  (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com