agriculture stories in marathi okra pest management | Agrowon

भेंडी पिकावरील किडींचे नियंत्रण 

विवेक सवडे, डॉ. धिरज कदम 
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

भेंडी पिकावरील महत्त्वाच्या किडींची ओळख आणि नियंत्रणाची माहिती घेऊ. 

फळे व शेंडा पोखरणारी अळी (Earias Vitella) 
सक्रिय काळ व नुकसानीचा प्रकार 

भेंडी पिकावरील महत्त्वाच्या किडींची ओळख आणि नियंत्रणाची माहिती घेऊ. 

फळे व शेंडा पोखरणारी अळी (Earias Vitella) 
सक्रिय काळ व नुकसानीचा प्रकार 

 • अळी कोवळ्या शेंड्यावर उपजीविका करते. ज्या वेळेस फळे तयार होतात, फळांत शिरून त्यावर उपजीविका करते. 
 • अळी तपकिरी पांढऱ्या रंगाची असते. तिच्या शरीरावर तपकिरी ठिपके असून, ही अवस्था १० ते १४ दिवसांची असते. 
 • मादी पतंग कोवळ्या शेंड्यांवर, कळ्यांवर, कोवळ्या फळांवर निळसर हिरवी अंडी एकएकटी देते. 
 • सुप्तावस्था ः अळी पुढे रोपावर किंवा जमिनीत रेशमासारख्या कोषात कोषावस्था पूर्ण करते. कोष तपकिरी रंगाचा असून, कोषावस्था ७ दिवसांची असते. 

मावा (Myzus Persicae) 

 • किडीचे पिल्ले आणि प्रौढ पानांच्या खालील बाजूस राहून पानांतील रस शोषतात. ही कीड विषाणूजन्य रोगांचाही प्रसार करते. 
 • मादी पानांच्या खालील बाजूस अंडी देते. वर्षभरात सुमारे २० पिढ्या तयार होतात. 

व्यवस्थापन 

 • कीडग्रस्त भेंडी तोडून अळीसहीत नष्ट करावीत. 
 • शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतामध्ये हेक्टरी ५ कामगंध सापळे (इरिल्युर) लावावेत. 
 • शेतामध्ये मित्र कीटक जसे ढालकिडा, क्रायसोपा, सिराफिड माशी, कोळी, भक्षक ढेकूण इत्यादी व परोपजीवी कीटक उदा. ट्रायकोग्रामा, ब्रॅकॉन इ. संवर्धन करावे. 
 • शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसताच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. 
 • रासायनिक कीटकनाशकाचा वापर फक्त किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच करावी. 

(फवारणी - मात्रा प्रतिलिटर पाणी) 

ठिपक्याच्या अळीकरिता- 
ईमामेक्टिन बेन्झोएट (५ एस.जी.) ०.४ ग्रॅम किंवा क्लोरॲण्ट्रानीलीप्रोल (१८.५ ई. सी.)०. ३ मिली किंवा क्विनॉलफॉस (२५ टक्के इसी) २ मिली. 

मावा किडीकरिता 
थायामेथोक्झाम (२५ टक्के) ०.२५ ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रीड (२० टक्के) ०.२ ग्रॅम. 

विवेक सवडे (आचार्य पदवी विद्यार्थी) ९६७३११३३८३ 
डॉ. धिरज कदम (सहयोगी प्राध्यापक) ९४२१६२१९१० 

(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) 


इतर फळभाज्या
उन्हाळी हंगामात शेवगा पिकाचे छाटणी...शेवग्याचे झाड झपाट्याने वाढणारे असून, शेवगा...
भेंडीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनभेंडी पिकाचे उत्पादन कमी येण्यामागे विविध किडींचा...
बटाटा साठवणुकीच्या पद्धतीबटाटा पिकाची अयोग्य काढणी आणि साठवणुकीत योग्य...
उन्हाळी कांदा पिकातील अन्नद्रव्य...कांदा पिकाची मुळे उथळ असल्याकारणे कांदा पिकात...
भेंडी पिकावरील किडींचे नियंत्रण भेंडी पिकावरील महत्त्वाच्या किडींची ओळख आणि...
खरीप कांद्यावरील रोगांचे नियंत्रण खरीप हंगामात कांदा पिकावर प्रामुख्याने करपा व मर...
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
तंत्र शेवगा लागवडीचेमहाराष्ट्रातील सुमारे ८४ टक्के क्षेत्र कोरडवाहू...
कोबीवरील मावा, चौकोनी ठिपक्याचा पतंगाचे...कोबी व फुलकोबी ही थंड हवामानातील पिके असून,...
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळीचे...खरीप हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात भाजीपाला...
सुधारित तंत्राने करा बटाटा लागवडबटाटा पीक यशस्वी होण्यामध्ये जमिनीच्या...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
भाजीपाला रोपवाटिका तयार करताना...रोपवाटिकानिर्मिती करताना जागेची निवड खूप...
माळरानावर साकारले फायदेशीर शेतीचे स्वप्नमनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर...
कोरडवाहूसाठी शेवगा लागवड फायदेशीरपावसाचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी व कोरडवाहू...
भाजीपाला सल्ला वेलवर्गीय भाजीपाला : काकडी, कारली फळमाशी :...
खरीप हंगामातील भाजीपाला पिकांतील...भाजीपाला पिकांच्या उत्पादनामध्ये तणांमुळे मोठ्या...
मिरची-ऊस-टोमॅटोतून उंचावला आर्थिक आलेखसुमारे १२ वर्षांपासून मिरची पिकात सातत्य,...