पृथ्वीवरील ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यासाठी ज्वालामुखी महत्त्वाचे

पृथ्वीवरील ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यासाठी ज्वालामुखी महत्त्वाचे
पृथ्वीवरील ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यासाठी ज्वालामुखी महत्त्वाचे

श्वसनयोग्य ऑक्सिजन हा पृथ्वीवरील सजीव सृष्टीसाठी अत्यावश्यक असून, त्याचा पृथ्वीवरील उगम कशा प्रकारे झाला, याबाबत अनेक शक्यता मांडल्या जातात. राईस विद्यापीठातील भूशास्त्रज्ञांनी केलेल्या नव्या संशोधनानुसार पृथ्वीवरील ऑक्सिजनचा पहिला स्रोत हा ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाल्याची बाब मांडण्यात आली आहे. हे संशोधन ‘नेचर जिओसायन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. राईस विद्यापीठातील संशोधकांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार २.५ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीच्या वातावरणामध्ये लक्षणीय तीव्रतेमध्ये प्राणवायूंची मात्रा असल्याची बाब पुढे आली आहे. यामध्ये त्या वेळी होत असलेल्या ज्वालामुखीचा मोठा वाटा होता. या घटनेला ग्रेट ऑक्सिडेशन इव्हेंट असे म्हटले जाते. रिव्हरसाईड येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील पोस्टडॉक्टरल संशोधक जेम्स इगुची हेही या संशोधनामध्ये सामील होते. त्यांनी सांगितले, की पृथ्वीवरील ऑक्सिजनचा एकदम उगम होण्याची ही घटना अनेक अर्थांने महत्त्वाची आहे. त्यातून केवळ पृथ्वीच्या वातावरणाचेच गूढ उलगडते असे नाही, तर त्याच्याशी संबंधित पृष्ठभागाच्या भूरासायनिकतेविषयी अधिक माहिती मिळते. कार्बन आयसोटोपच्या रचनेमध्ये होणारे बदल कार्बोनेट दगडांमध्ये ऑक्सिडेशनच्या घटनेनंतर तुलनेने अत्यल्प काळामध्ये नोंदवण्यात आले आहेत. पृथ्वीच्या खोलवर असलेल्या टेक्टोनिक प्लेटमध्ये कार्यरत यंत्रणेविषयी आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रक्रियेमुळे ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण कमी राखणे शक्य झाले. राईस विद्यापीठातील भूरसायनतज्ज्ञ आणि प्रो. राजदीप दासगुप्ता आणि जॉन सिल्स (पदवीचे विद्यार्थी) यांनी या संशोधनामध्ये प्रारूप गणिती क्रिया करण्यामध्ये मोलाची मदत केली. सायनोबॅक्टेरियाशी जोडले जाते ऑक्सिजनचे प्रमाण ः

  • दीर्घकाळापासून संशोधक प्रकाश संश्लेषण क्रियेकडे ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यासाठी लक्ष वेधत आले आहेत. दासगुप्ता यांच्या मते, नव्या सिद्धांतानुसार प्रकाश संश्लेषण करणाऱ्या पहिल्या सजीवांचा - सायनोबॅक्टेरियांची भूमिका नाकारली जात नाही. बहुतांश लोक वाढलेल्या ऑक्सिजनच्या प्रमाणासाठी सायनोबॅक्टेरियांना श्रेय देतात. मात्र, त्यांची वेळ ही ऑक्सिडेशन घटनेशी जोडली जाते.
  • सायनोबॅक्टेरिया हे या घटनेच्या आधी सुमारे ५०० दशलक्ष वर्ष जिवंत होते. त्यामुळे त्यांच्याभोवती ऑक्सिजनच्या निर्मितीचे अनेक सिद्धांत फिरतात. या घटनेनंतरच्या १०० दशलक्ष वर्षांनंतरच्या काळामध्ये कार्बोनेट खनिजांतील कार्बन आयसोटोपचे गुणोत्तर बदललेले दिसून येते. या प्रक्रिया भूशास्त्रज्ञ लोमागुंडी घटना म्हणतात. ही घटना पूर्ण होण्यासाठी सुमारे १०० दशलक्ष वर्षांचा कालावधी लागला. त्या वेळीच्या १०० कार्बन अणूपैकी एक आयसोटोप कार्बन-१३ असून, उर्वरीत ९९ अणू हे कार्बन-१२ आहे. हे १ः९९ चे गुणोत्तर कार्बोनेटमध्ये व्यवस्थित नोंदवलेले आहे. त्याची निर्मिती लोमागुंडी घटनाच्या आधी आणि नंतर झाली आहे. मात्र, ऑक्सिडेशन घटनेच्या दरम्यान कार्बन-१३ चे प्रमाण १० टक्क्याने वाढल्याचे स्पष्ट होते.
  • इगुची यांनी सांगितले, की सायनोबॅक्टेरिया हे प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन-१२ ऐवजी कार्बन-१३ ला प्राधान्य देतात. त्यामुळे जेव्हा अधिक सेंद्रिय कर्ब किंवा सायनोबॅक्टेरिया निर्मिती होते, तेव्हा कार्बोनेटच्या साठ्यातून तयार झालेले कार्बन हे कार्बन-१२ असतात. अनेकांनी लोमागुंडी घटनेचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यामध्ये त्याची वेळ आव्हान ठरते. भौगोलिक नोंदीचा विचार करता कार्बन-१३ ते कार्बन-१२ हे गुणोत्तर ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्यानंतर काहीशे लक्ष वर्षांनी वाढले होते. या दोन्ही घटनांचे विश्लेषण देणे अवघड ठरते.
  • एकूणच या अभ्यासावरून पृथ्वीच्या इतिहासामध्ये टेक्टॉनिक घटक हे महत्त्वाची भूमिका निभावत असल्याचे दिसून येते. त्यांच्यामुळे पृथ्वीवर राहण्यायोग्य वातावरण होण्यास मदत झाल्याचे म्हणता येईल. अर्थात, ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यामध्ये आणि शाश्वत राहण्यामध्ये अन्य अनेक घटकांचा समावेश असू शकतो. बहूस्तरीय शेती कशी करायची हे जाणण्यासाठी येथे क्लिक करा.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com