उसासाठी सेंद्रिय खत, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर

उसासाठी सेंद्रिय खत, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर
उसासाठी सेंद्रिय खत, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीची पिके वाढवून जमिनीत गाडावीत. ताग किंवा धैंचा ही हिरवळीची पिके फायदेशीर ठरतात. माती परीक्षण अहवालानुसार ऊस पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्यांचा शिफारशीनुसार वापर करणे फायदेशीर ठरते. ऊस लागवडीपूर्वी एकरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत रोटाव्हेटरच्या साहाय्याने जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. त्यानंतर एकरी ५ टन शेणखत आणि रासायनिक खताचा पहिला हप्ता लागवडीच्या सरीमध्ये मातीत मिसळावा. सेंद्रिय खतासाठी हिरवळीची पिके वाढवून जमिनीत गाडावीत. ताग किंवा धैंचा ही हिरवळीची पिके फायदेशीर ठरतात.  

सेंद्रिय खते आणि त्यांचे प्रतिएकरी प्रमाण
सेंद्रिय खते नत्र (टक्के) स्फुरद (टक्के) पालाश (टक्के) एकरी प्रमाण (टन)
शेणखत ०.५ ते ०.८ ०.४ ते १.८ ०.५ ते ०.९ १० 
कंपोस्ट ०.५ ते १.५ ०.५ ते १.४ १.४ ते १.६ १० 
कोंबडी खत ३.० ते ४.५ ४ ते ५ २ ते २.५ १.५ ते २ 
मासळी खत ८ ते ९ २ ते ८ ०.२ ते १.५ १ 
लेंडी खत ०.५ ते ०.६ ०.८ ते १.८ ०.५ ते १.२ २ 

सुक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर ः १) माती परीक्षण अहवालानुसार जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास, ऊस लागवडीच्या वेळी देण्यात येणाऱ्या खतांसोबत लोहाच्या कमतरतेसाठी प्रतिहेक्‍टर फेरस सल्फेट २५ किलो, जस्तासाठी झिंक सल्फेट २० किलो, तसेच मॅंगेनीज कमतरतेसाठी मॅंगेनीज सल्फेट १० किलो व बोरॉनसाठी बोरॅक्‍स किंवा बोरीक ॲसिड ५ किलो शेणखतात मिसळून द्यावे. २) व्हीएसआय- मायक्रोसोल हे घनरूप विद्राव्य खत ठिबक संचाद्वारे एकरी २.५ किलो १०० लिटर पाण्यात विरघळवून लागवडीच्यावेळी, लागवडीनंतर ६०, १२० आणि १८० दिवसांनी असे चार वेळा सोडावे. ठिबक संच नसल्यास शेणखत किंवा कंपोस्ट खतामध्ये मिसळून लागवडीच्या वेळी एकरी ५ किलो आणि ऊस बांधणीच्या वेळी ५ किलो या प्रमाणात द्यावे. मल्टिमॅक्रोन्युट्रियंट, मल्टिमायक्रोन्युट्रियंटची फवारणी  १) ऊस पिकाला सूक्ष्मअन्नद्रव्यांची गरज कमी असली तरी योग्य प्रमाणात त्यांचा पुरवठा होणे आवश्‍यक असते. यासाठी व्हीएसआय मल्टिमायक्रोन्युट्रियंट (लोह २.५ टक्के, मॅंगेनीज १ टक्के, जस्त ३ टक्के, कॉपर १ टक्के, मॉलिब्डेनम ०.१ टक्के आणि बोरॉन ०.५ टक्के) आणि मल्टिमॅक्रोन्युट्रियंट (नत्र ८ टक्के, स्फुरद ८ टक्के आणि पालाश ८ टक्के) या द्रवरूप खताच्या पानावर दोन फवारण्या कराव्यात. १) पहिली फवारणी ः लागवडीनंतर ६० दिवसांनी, मल्टिमॅक्रोन्युट्रियंट द्रवरूप खताची २ लिटर अधिक मल्टिमायक्रोन्युट्रियंट २ लिटर मात्रा प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. २) दुसरी फवारणी ः लागवडीनंतर ९० दिवसांनी, मल्टिमॅक्रोन्युट्रियंट द्रवरूप खताची एकरी ३ लिटर आणि मल्टिमायक्रोन्युट्रियंट ३ लिटर मात्रा प्रति ३०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संपर्क ः डॉ. प्रीती देशमुख, ०२०- २६९०२२७८ (वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.) पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com