agriculture stories in marathi organic & micro nutrient management for sugarcane | Page 2 ||| Agrowon

उसासाठी सेंद्रिय खत, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर

डॉ. प्रीती देशमुख, ज्योती खराडे
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीची पिके वाढवून जमिनीत गाडावीत. ताग किंवा धैंचा ही हिरवळीची पिके फायदेशीर ठरतात. माती परीक्षण अहवालानुसार ऊस पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्यांचा शिफारशीनुसार वापर करणे फायदेशीर ठरते.

ऊस लागवडीपूर्वी एकरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत रोटाव्हेटरच्या साहाय्याने जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. त्यानंतर एकरी ५ टन शेणखत आणि रासायनिक खताचा पहिला हप्ता लागवडीच्या सरीमध्ये मातीत मिसळावा. सेंद्रिय खतासाठी हिरवळीची पिके वाढवून जमिनीत गाडावीत. ताग किंवा धैंचा ही हिरवळीची पिके फायदेशीर ठरतात.
 

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीची पिके वाढवून जमिनीत गाडावीत. ताग किंवा धैंचा ही हिरवळीची पिके फायदेशीर ठरतात. माती परीक्षण अहवालानुसार ऊस पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्यांचा शिफारशीनुसार वापर करणे फायदेशीर ठरते.

ऊस लागवडीपूर्वी एकरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत रोटाव्हेटरच्या साहाय्याने जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. त्यानंतर एकरी ५ टन शेणखत आणि रासायनिक खताचा पहिला हप्ता लागवडीच्या सरीमध्ये मातीत मिसळावा. सेंद्रिय खतासाठी हिरवळीची पिके वाढवून जमिनीत गाडावीत. ताग किंवा धैंचा ही हिरवळीची पिके फायदेशीर ठरतात.
 

सेंद्रिय खते आणि त्यांचे प्रतिएकरी प्रमाण
सेंद्रिय खते नत्र (टक्के) स्फुरद (टक्के) पालाश (टक्के) एकरी प्रमाण (टन)
शेणखत ०.५ ते ०.८ ०.४ ते १.८ ०.५ ते ०.९ १० 
कंपोस्ट ०.५ ते १.५ ०.५ ते १.४ १.४ ते १.६ १० 
कोंबडी खत ३.० ते ४.५ ४ ते ५ २ ते २.५ १.५ ते २ 
मासळी खत ८ ते ९ २ ते ८ ०.२ ते १.५ १ 
लेंडी खत ०.५ ते ०.६ ०.८ ते १.८ ०.५ ते १.२ २ 

सुक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर ः

१) माती परीक्षण अहवालानुसार जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास, ऊस लागवडीच्या वेळी देण्यात येणाऱ्या खतांसोबत लोहाच्या कमतरतेसाठी प्रतिहेक्‍टर फेरस सल्फेट २५ किलो, जस्तासाठी झिंक सल्फेट २० किलो, तसेच मॅंगेनीज कमतरतेसाठी मॅंगेनीज सल्फेट १० किलो व बोरॉनसाठी बोरॅक्‍स किंवा बोरीक ॲसिड ५ किलो शेणखतात मिसळून द्यावे.
२) व्हीएसआय- मायक्रोसोल हे घनरूप विद्राव्य खत ठिबक संचाद्वारे एकरी २.५ किलो १०० लिटर पाण्यात विरघळवून लागवडीच्यावेळी, लागवडीनंतर ६०, १२० आणि १८० दिवसांनी असे चार वेळा सोडावे. ठिबक संच नसल्यास शेणखत किंवा कंपोस्ट खतामध्ये मिसळून लागवडीच्या वेळी एकरी ५ किलो आणि ऊस बांधणीच्या वेळी ५ किलो या प्रमाणात द्यावे.

मल्टिमॅक्रोन्युट्रियंट, मल्टिमायक्रोन्युट्रियंटची फवारणी 

१) ऊस पिकाला सूक्ष्मअन्नद्रव्यांची गरज कमी असली तरी योग्य प्रमाणात त्यांचा पुरवठा होणे आवश्‍यक असते. यासाठी व्हीएसआय मल्टिमायक्रोन्युट्रियंट (लोह २.५ टक्के, मॅंगेनीज १ टक्के, जस्त ३ टक्के, कॉपर १ टक्के, मॉलिब्डेनम ०.१ टक्के आणि बोरॉन ०.५ टक्के) आणि मल्टिमॅक्रोन्युट्रियंट (नत्र ८ टक्के, स्फुरद ८ टक्के आणि पालाश ८ टक्के) या द्रवरूप खताच्या पानावर दोन फवारण्या कराव्यात.
१) पहिली फवारणी ः
लागवडीनंतर ६० दिवसांनी, मल्टिमॅक्रोन्युट्रियंट द्रवरूप खताची २ लिटर अधिक मल्टिमायक्रोन्युट्रियंट २ लिटर मात्रा प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) दुसरी फवारणी ः
लागवडीनंतर ९० दिवसांनी, मल्टिमॅक्रोन्युट्रियंट द्रवरूप खताची एकरी ३ लिटर आणि मल्टिमायक्रोन्युट्रियंट ३ लिटर मात्रा प्रति ३०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

संपर्क ः डॉ. प्रीती देशमुख, ०२०- २६९०२२७८
(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.) पुणे)


इतर नगदी पिके
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनगुलाबी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण, मित्र कीटकांचे...
कपाशीवरील तुडतुड्याचे नियंत्रणतुडतुडे ही बी टी कपाशीवरील सर्वात महत्त्वाची रस...
आडसाली उसासाठी खतमात्रेचे नियोजनउसाच्या योग्य वाढीसाठी माती परिक्षणाच्या...
नियोजन आडसाली ऊस लागवडीचेलागवड १५ जुलै ते १५ ऑगष्टपर्यंत करावी.जोडओळ पट्टा...
कोरडवाहू कपाशीचे लागवड नियोजनअयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, लागवडीचे...
शेतकरी नियोजन (पीक कापूस)पीक - कापूस गणेश शामराव नानोटे, निंभारा, ता....
कपाशी लागवडीमध्ये नवा दृष्टिकोन हवा दरवर्षी कपाशीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे...
कापूस सल्ला कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल...
एकात्मिक व्यवस्थापनातून वाढवा बीटी...अलीकडील वर्षांपासून कापूस पिकाचे उत्पादन घटत...
गुलाबी बोंडअळी रोखण्यासाठी पूर्वहंगामी...कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंडअळीच्या...
ऊस पिकासाठी योग्य ठिबक सिंचन पद्धतउसासाठी योग्य ठिबक सिंचन ठिबक सिंचन पद्धती...
सुधारित पद्धतीने खोडवा उसाचे व्यवस्थापन खोडवा उसाची योग्य जोपासना केल्यास लागवडीएवढेच...
सुरु उसाला द्या शिफारशीत खतमात्रा रासायनिक खते प्रत्येक वेळी सेंद्रिय खतांमध्ये...
उसासाठी सेंद्रिय खत, सूक्ष्म...जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीची पिके...
उसाला द्या शिफारशीनुसार खतमात्रारासायनिक खते जमिनीवर पसरून न देता चळी घेऊन किंवा...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
ऊस पीक सल्ला१) साधारणपणे १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत...