आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसार

आजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने बदल होत आहेत. १९७० आणि ८० च्या दशकाच्या तुलनेमध्ये आनंद आणि संपत्ती यांचा संबंध अधिक दाट होत गेल्याचे सॅन दियागो राज्य विद्यापीठातील संशोधकांचे मत आहे. हे संशोधन ‘जर्नल इमोशन’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसार
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसार

आजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने बदल होत आहेत. १९७० आणि ८० च्या दशकाच्या तुलनेमध्ये आनंद आणि संपत्ती यांचा संबंध अधिक दाट होत गेल्याचे सॅन दियागो राज्य विद्यापीठातील संशोधकांचे मत आहे. हे संशोधन ‘जर्नल इमोशन’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. गेल्या काही दशकांमध्ये माणसांची जीवनशैली वेगाने बदलत आहे. या बदलत्या जीवनशैलीशी मिळवून घेण्यासाठी आर्थिक घटक अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. अशा वेळी सॅन दियागो राज्य विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये आनंद या घटकाशी उत्पन्न आणि शिक्षण यांचा संबंध असल्याचे नोंदवण्यात आले आहे. म्हणजेच ज्या लोकांचे उत्पन्न अधिक आहे, ते अधिक आनंदी राहण्याची शक्यता आहे. या विषयी पूर्वी झालेल्या अभ्यासामध्ये उत्पन्नांचा नेमका आकडा मिळवण्याचे प्रयत्न झाले होते. त्यात वार्षिक ७५ हजार डॉलरपेक्षा अधिक उत्पन्न अशी सीमारेषा आखली होती. मात्र, ती फारशी योग्य नसल्याचे संशोधकांना आढळले आहे. मानसशास्त्रज्ञ जेन त्वेंगे यांनी सांगितले की, आनंद आणि उत्पन्न यांचा इतका घनिष्ठ संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आम्हीही आश्चर्यचकित आहोत. मूलभूत गरजा भागल्यानंतरही शिल्लक राहणारा अधिक पैसा म्हणजे अधिक आनंद असे काहीसे समीकरण यातून दिसून येत आहे.

  • या अभ्यासामध्ये अमेरिकेतील ३० आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील ४४,१९८ प्रौढ व्यक्तींच्या राष्ट्रीय प्रातिनिधिक सामान्य सामाजिक सर्वेक्षणातील आकडेवारीचा आधार घेतला आहे. ही आकडेवारी १९७२ ते २०१६ या कालावधीतील आहे.
  • सर्वसामान्य नियमानुसार, अधिक उत्पन्न असलेल्या लोकांमध्ये आनंदाची पातळी आणि जीवनातील समाधान अधिक असल्याचे दिसून येतो. हा कल १९७० आणि ८० च्या दशकाच्या तुलनेमध्ये अधिक वाढता दिसून येतो. सध्याच्या काळामध्ये पैशाने अधिक आनंद विकत घेणे पूर्वीच्या तुलनेमध्ये अधिक शक्य असल्याचे दिसून येते.
  • ज्या अमेरिकनांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले नाही, त्या लोकांमध्ये सन २००० नंतर आनंदामध्ये घट झाल्याचे दिसून आले. तर ज्यांचे महाविद्यालयीन पदवी घेतली आहे, त्यांच्यामध्ये आनंदाची पातळी तुलनेने स्थिर आहे. वांशिकदृष्ट्या विचार केल्यास महाविद्यालयीन शिक्षण नसलेल्या काळ्या लोकांमध्ये आनंदाची पातळी तुलनेने स्थिर आहे. मात्र, त्यातही ज्यांच्याकडे पदवी आहे, ते अधिक आनंदी असल्याचे दिसून येते.
  • गेल्या काही दशकांमध्ये श्रीमंत हे अधिक श्रीमंत होत असून गरीब अधिक गरीब होत चालले आहेत. या आर्थिक असमानतेमुळे आनंद मिळवण्यातील भेदही निर्माण होत असावा. - जेन त्वेंगे, मानसशास्त्रज्ञ

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com