agriculture stories in marathi Our happiness is more dependent on money today than in the ७०s and ८०s | Page 2 ||| Agrowon

आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसार

वृत्तसेवा
शनिवार, 11 जुलै 2020

आजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने बदल होत आहेत. १९७० आणि ८० च्या दशकाच्या तुलनेमध्ये आनंद आणि संपत्ती यांचा संबंध अधिक दाट होत गेल्याचे सॅन दियागो राज्य विद्यापीठातील संशोधकांचे मत आहे. हे संशोधन ‘जर्नल इमोशन’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

आजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने बदल होत आहेत. १९७० आणि ८० च्या दशकाच्या तुलनेमध्ये आनंद आणि संपत्ती यांचा संबंध अधिक दाट होत गेल्याचे सॅन दियागो राज्य विद्यापीठातील संशोधकांचे मत आहे. हे संशोधन ‘जर्नल इमोशन’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

गेल्या काही दशकांमध्ये माणसांची जीवनशैली वेगाने बदलत आहे. या बदलत्या जीवनशैलीशी मिळवून घेण्यासाठी आर्थिक घटक अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. अशा वेळी सॅन दियागो राज्य विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये आनंद या घटकाशी उत्पन्न आणि शिक्षण यांचा संबंध असल्याचे नोंदवण्यात आले आहे. म्हणजेच ज्या लोकांचे उत्पन्न अधिक आहे, ते अधिक आनंदी राहण्याची शक्यता आहे. या विषयी पूर्वी झालेल्या अभ्यासामध्ये उत्पन्नांचा नेमका आकडा मिळवण्याचे प्रयत्न झाले होते. त्यात वार्षिक ७५ हजार डॉलरपेक्षा अधिक उत्पन्न अशी सीमारेषा आखली होती. मात्र, ती फारशी योग्य नसल्याचे संशोधकांना आढळले आहे.

मानसशास्त्रज्ञ जेन त्वेंगे यांनी सांगितले की, आनंद आणि उत्पन्न यांचा इतका घनिष्ठ संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आम्हीही आश्चर्यचकित आहोत. मूलभूत गरजा भागल्यानंतरही शिल्लक राहणारा अधिक पैसा म्हणजे अधिक आनंद असे काहीसे समीकरण यातून दिसून येत आहे.

  • या अभ्यासामध्ये अमेरिकेतील ३० आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील ४४,१९८ प्रौढ व्यक्तींच्या राष्ट्रीय प्रातिनिधिक सामान्य सामाजिक सर्वेक्षणातील आकडेवारीचा आधार घेतला आहे. ही आकडेवारी १९७२ ते २०१६ या कालावधीतील आहे.
  • सर्वसामान्य नियमानुसार, अधिक उत्पन्न असलेल्या लोकांमध्ये आनंदाची पातळी आणि जीवनातील समाधान अधिक असल्याचे दिसून येतो. हा कल १९७० आणि ८० च्या दशकाच्या तुलनेमध्ये अधिक वाढता दिसून येतो. सध्याच्या काळामध्ये पैशाने अधिक आनंद विकत घेणे पूर्वीच्या तुलनेमध्ये अधिक शक्य असल्याचे दिसून येते.
  • ज्या अमेरिकनांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले नाही, त्या लोकांमध्ये सन २००० नंतर आनंदामध्ये घट झाल्याचे दिसून आले. तर ज्यांचे महाविद्यालयीन पदवी घेतली आहे, त्यांच्यामध्ये आनंदाची पातळी तुलनेने स्थिर आहे. वांशिकदृष्ट्या विचार केल्यास महाविद्यालयीन शिक्षण नसलेल्या काळ्या लोकांमध्ये आनंदाची पातळी तुलनेने स्थिर आहे. मात्र, त्यातही ज्यांच्याकडे पदवी आहे, ते अधिक आनंदी असल्याचे दिसून येते.

 

गेल्या काही दशकांमध्ये श्रीमंत हे अधिक श्रीमंत होत असून गरीब अधिक गरीब होत चालले आहेत. या आर्थिक असमानतेमुळे आनंद मिळवण्यातील भेदही निर्माण होत असावा.
- जेन त्वेंगे, मानसशास्त्रज्ञ


इतर अॅग्रो विशेष
आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारांसोबत...मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य...
कीडनाशकांवर बंदीबाबत अभ्यासच झालेला नाहीपुणे: कृषी रसायन क्षेत्रात काही कीडनाशकांवर...
जालन्यात रेशीम कोषांची उलाढाल ६६...जालना: येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेची यंदाच्या...
कलिंगड, भातशेतीसोबत ब्रॉयलर पक्षांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर कनकवाडी येथील दीपक...
दूध आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणारनगर ः दुधाला प्रतिलिटर तीस रुपये दर मिळावा आणि...
पॉवर टीलर आयातीवर निर्बंधपुणे: भारत-चीन वादाचा फटका आता पॉवर टीलर...
नगर जिल्ह्यात तेलकट डागांमुळे डाळिंब...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा छोटी तसेच तोडणीला...
शेळीपालन, श्‍वान, देशी कोंबडीपालनातून...शेळीपालन, मग श्‍वानपालन व आता देशी कोंबडीपालन अशी...
राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरीपुणे ः  कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश,...
लक्ष वळविण्याची राजकीय खेळी!एखाद्या महासंकटाचा राजकीय लाभ कसा उठवायचा हे...
जो पारदर्शी तोच टिकेलकेंद्र सरकारने ‘एक देश एक बाजार’ योजनेची घोषणा...
आदिवासी महामंडळातर्फे ४९ लाख क्विंटल...नाशिक : कोरोनाच्या संकट काळात आदिवासी विकास...
संशोधनासाठी मोसंबी वाणांचे जतन फायदेशीर...बदनापूर, जि. जालना : मोसंबी फळपिकांच्या विविध...
परभणी जिल्ह्यात कापसाची ३६ लाख क्विंटल...परभणी ः कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी...
अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या सबलीकरणावर भर नवी दिल्ली: शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी...
रानभाज्या विक्रीतून रोजगार निर्मितीचा...नाशिक: राज्यातील आदिवासी भागात नैसर्गिक पद्धतीने...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा शिडकावा पुणे ः पावसाचा जोर कमी झाल्याने कोकण, मध्य...
चीनकडून बियाणे दहशतवादाचा धोका पुणेः देशातील बियाणे वारसा आणि बीजोत्पादन उद्योग...
बेकायदा ‘एचटीबीटी’मुळे तीनशे कोटींचा...पुणे : बेकायदेशीर तणनाशक सहणशील (एचटीबीटी) कापूस...
कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला कोल्हापूर: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे....