agriculture stories in marathi, packaging is important at buying decision | Agrowon

खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो प्रभाव
वृत्तसेवा
रविवार, 16 जून 2019

एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित करण्यामध्ये व खरेदी करण्याची इच्छा निर्माण होण्यामध्ये त्या पदार्थांचे पॅकेजिंग अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावते. ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी चॉकलेट पॅकेजिंग आरेखनाचे विश्लेषण केले असून, या घटकांचे माणसांच्या आवडीनिवडीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला आहे. 

पॅकेजिंगशी जोडलेल्या भावना या त्या चॉकलेटच्या चवीपेक्षा अधिक तीव्र असल्याचे संशोधकांना आढळले आहे. खरेदीमध्ये चव हा महत्त्वाचा मुद्दा असला तरी, योग्य चव असल्याचा आभास हा पॅकेजिंगमधून आणता येते. हे निष्कर्ष हेलियोनमध्ये प्रकाशित केले आहे. 

एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित करण्यामध्ये व खरेदी करण्याची इच्छा निर्माण होण्यामध्ये त्या पदार्थांचे पॅकेजिंग अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावते. ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी चॉकलेट पॅकेजिंग आरेखनाचे विश्लेषण केले असून, या घटकांचे माणसांच्या आवडीनिवडीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला आहे. 

पॅकेजिंगशी जोडलेल्या भावना या त्या चॉकलेटच्या चवीपेक्षा अधिक तीव्र असल्याचे संशोधकांना आढळले आहे. खरेदीमध्ये चव हा महत्त्वाचा मुद्दा असला तरी, योग्य चव असल्याचा आभास हा पॅकेजिंगमधून आणता येते. हे निष्कर्ष हेलियोनमध्ये प्रकाशित केले आहे. 

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठातील संशोधिका फ्रॅंक आर. डूनेशिया यांनी सांगितले, की गंध, स्वाद, पोत अशा अनेक घटकांचा परिणाम ग्राहकांच्या चवीसंदर्भात नैसर्गिकरीत्या जोडलेला असतो. मात्र, त्याव्यतिरिक्त बाह्यघटक उदा. पॅकेजिंग, त्यावरील माहिती, ब्रॅंडचे नाव आणि किंमत यांचाही त्याच्या खरेदीवर परिणाम होतो. कारण या बाबीही माणसांच्या मानसिक आणि अंतर्गत बाबींवर परिणाम करतात. 

  • संशोधकांनी खरेदीच्या निर्णयावर पॅकेजिंगचा परिणाम तपासला. त्यासाठी त्यांनी २५ ते ५५ वयोगटातील ७५ सहभागी लोकांना (त्यात ५९ टक्के महिला) चॉकलेटची चव घेऊन विश्लेषण करण्यास सांगितले. त्यात डोळे बांधलेल्या स्थितीमध्ये चॉकलेटची चव, पॅकेजिंगची संकल्पना केवळ आणि चॉकलेट आणि पॅकेजिंग एकत्रित अशा तीन प्रकारांचा समावेश होता. 
  • त्यानंतर एकच चॉकलेट वेगवेगळ्या सहा पॅकेजिंगमध्ये देण्यात आले. त्याचे आरेखन बोल्ड, फन, दैनंदिन, विशेष, आरोग्यपूर्ण आणि प्रीमियम अशा संकल्पनांवर आधारित होते. प्रत्येक टप्प्यावर सहभागींना आपल्या भावना लेक्सिकन आधारित निकषांवर मांडण्यास सांगितले. 

 निष्कर्ष 

  • सहभागींच्या चवीबाबतच्या भावना व अपेक्षांवर पॅकेजिंगवर असलेल्या घटकांनुसार फरक पडला. जेव्हा पॅकेजिंगवर मांडलेल्या नोंदीमुळे तयार झालेल्या अपेक्षांची पूर्ती न झाल्यास तीव्र भावना व्यक्त करतात.  
  • ६० टक्के ग्राहकांचा उत्पादन खरेदीचा प्राथमिक निर्णय हा पॅकेजिंगकडे पाहूनच होतो. 
  • डोळे बांधलेल्या स्थितीमध्ये खाताना केवळ चवीवर आधारित होतो. 
  • आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून विशेषतः संवेदना, ग्राहकशास्त्र, मानसशास्त्राच्या अनुषंगाने हा अभ्यास केला आहे. त्यात बाजारातील उत्पादनाकडून लोकांच्या अपेक्षा कशावर ठरतात, यावर भर दिला होता. 

इतर ताज्या घडामोडी
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सातारा जिल्हा परिषदेचा १०० कोटींचा...सातारा : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मूळ...
पुण्यात पीकविम्यासाठी शिवसेना रस्त्यावरपुणे ः ‘कोण म्हणतो देणार नाय विमा घेतल्याशिवाय...
पुणे विभागातील कोरडवाहू पट्ट्यात टंचाई...पुणे : विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला १...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गंत खरिपासाठी...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १५ चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील घटलेली चारा छावण्यांची...
अचूक पीक पेरणी अहवाल देणे शक्य नाही ः...बुलडाणा  ः जिल्ह्यातील पीक पेरणीचा...
आडसाली ऊस लागवडीला कोल्हापूर जिल्ह्यात...कोल्हापूर  : जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात...
परभणी कृषी विद्यापीठ उत्पादित अडीच हजार...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी ९१.३३ टक्के ...अकोला  ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम...
एचटी कापूस बियाण्यांबाबतचा अहवाल १५...मुंबई  : प्रतिबंधित एचटी (हर्बीसाइड टॉलरंट)...
शिवसेना शेतकऱ्यांची दिशाभूल करतेय ः...मुंबई  ः पीकविम्यासंदर्भात विमा कंपन्यांवर...
पीकविम्याचे पैसे पंधरा दिवसांत न...मुंबई  : कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची...
फळपीक विमा योजनेला मुदतवाढ देण्याची...पुणे  : राज्यातील दुष्काळी स्थिती आणि...
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....