कोंबड्यांच्या योग्य व्यवस्थापनाकडे द्या लक्ष

 कोंबड्यांच्या योग्य व्यवस्थापनाकडे द्या लक्ष
कोंबड्यांच्या योग्य व्यवस्थापनाकडे द्या लक्ष
  • कुक्कुटपालन प्रक्षेत्राची जागा उंचावर असावी. जमीन शक्यतो मुरमाड व पाण्याचा निचरा होणारी असावी. 
  • कोंबड्यांच्या शेडची जागा गावापासून दूर पण स्वच्छ, मुबलक पाणी व विजेची सोय असावी. 
  • शेडमध्ये हवा नेहमी खेळती राहावी. 
  • शेडमध्ये एक दिवसाची पिले येण्यापूर्वी शेडची व उपकरणांची स्वच्छता केलेली असावी. पिलांसाठी आवश्यक खाद्य तयार असावे. 
  • पिले निरोगी, सशक्त आणि झपाट्याने वाढणाऱ्या जातीची असावीत, त्यांची अनुवंशिकता कशी आहे ? हे माहीत असावे. 
  • पाण्याच्या आणि खाद्याच्या भांड्यांचे प्रमाण हे पक्षांच्या संख्येच्या प्रमाणात असावे. त्यांची मांडणी पद्धतशीर व योग्य असावी. 
  • पिलांना पुरेसे संतुलित खाद्य आणि स्वच्छ पाणी वेळेवर द्यावे. खाद्याचे भांडे अर्धे भरावे. खाद्य दिवसातून तीनवेळा द्यावे. - एका कोंबडीमागे ५ ग्रॅम खाद्याचे नुकसान वाचविले तर खाद्यात १० टक्के बचत होईल (१०० पक्षांमागे २ महिन्यांत ३० किलो खाद्य वाचेल) 
  • प्रकाश (रात्रीचा कृत्रिम प्रकाश धरून) दिवसातून २३ तास पुरवावा (फक्त १ तास अंधार ठेवावा). 
  • शेडमधील लिटर (गादी) नेहमी कोरडे ठेवावे. 
  • कर्मचाऱ्यांनी कोंबड्यांच्या कळपात कमीतकमी वेळ फिरावे. 
  • शेडच्या आकारमानाप्रमाणे कोंबड्यांची संख्या ठेवावी. 
  • वयाच्या ८ आठवड्यांपर्यंत मांसल कोंबड्या ठेवाव्यात. झपाट्याने वाढ झालेल्या कोंबड्या आधी विकाव्यात. 
  • कोंबड्यांची विक्री झाल्यावर नवीन पिले आणण्यापूर्वी शेडची साफसफाई व जंतुनाशकाची फवारणी करावी. 
  • कांबड्यांना प्रतिबंधक लस व औषधी वेळेवर व ठरल्या दिवशी द्यावी. 
  • हे करू नये 

  • मांसल कोंबड्यांचे शेड ओलसर व खोलगट जागी बांधू नयेत. 
  • प्रक्षेत्राची जागा मानवी वस्तीच्या ठिकाणी नसावी. 
  • कोंबड्यांच्या शेडची, उपकरणांची व खाद्याची पूर्वतयारी झाल्याशिवाय पिले आणू नयेत. 
  • कोंबड्यांच्या खाद्यात वारंवार बदल करू नये. 
  • खाद्याची साठवण ओलसर व दमट जागी करू नये. 
  • मांसल कोंबड्यांच्या पिलांची आनुवंशिकता जर माहीत नसेल तर अशी पिले विकत घेऊ नयेत. 
  • मांसल कोंबड्या शक्यतोवर ८ आठवड्यांपेक्षा जास्त दिवस ठेऊ नयेत. 
  • कोंबड्यांना अपुरे व असमतोल खाद्य देणे टाळावे. 
  • कर्मचाऱ्यांशिवाय इतर व्यक्तीस शेडमध्ये प्रवेश करू देऊ नये. 
  • मोठ्या प्रमाणावर एकदम व्यवसायाला सुरुवात करू नये. 
  • शेडमध्ये अचानक १-२ कोंबड्या मेल्यास दुर्लक्ष करू नये. पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन कारण शोधून उपचार करावेत. 
  •  ः डॉ. शुभांगी वारके, ९५६१२१४३९५  (सूक्ष्मजीवशास्त्र विभाग,  नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com