कोबी व फुलकोबी ही थंड हवामानातील पिके असून, राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये त्यांची लागवड केली जाते. सध्याचे थंड आणि मधूनच होणारे ढगाळ वातावरण यामुळे मावा आणि चौकोनी ठिपक्यांच्या पतंगाच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
मावा (अफिड्स) शा. नाव ः Brevicoryne brassicae कोबीवर्गीय भाजीपाला पिकांवर ही कीड आढळते. त्याची पिले पिवळसर रंगाची, तर प्रौढ काळसर रंगाचे असतात. पिले व प्रौढ कीटक कोवळ्या पानांतून रस शोषतात. परिणामी पाने पिवळी होऊन गळून पडतात.
आर्थिक नुकसान संकेत पातळी, मावा कीड ः १० प्रति पान प्रादुर्भाव दिसताच, फवारणी प्रतिलिटर पाणी अॅसिटामीप्रिड (२० एसपी) ०.२ ग्रॅम किंवा इमिडाक्लोरोप्रीड (२० एसपी) ०.२ मि. लि. किंवा डायमिथोएट ३० (ईसी) २ मि. लि. किंवा फिप्रोनील (५ एससी) ३ मि. लि.
चौकोनी ठिपक्याचा पतंग (डायमंड बॅक मॉथ) शा. नाव ः Plutella xylostella
व्यवस्थापन
आर्थिक नुकसान संकेत पातळी चौकोनी ठिपक्याचा पतंगाच्या अळ्या ः २ ते ३ प्रतिझाड. प्रादुर्भाव दिसताच, फवारणी प्रतिलिटर पाणी निंबोळी तेल (०.०३ टक्का) किंवा कडुनिंब आधारित कीटकनाशक (ॲझाडिरेक्टीन ३००० पीपीएम) ०.५ मि. लि. किंवा सायॲण्ट्रानीलीप्रोल (१०.२६ ओडी) १.२ मि. लि. किंवा डायफेंथुरॉन (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम किंवा फिप्रोनिल (५ ईसी) ३ मिलि किंवा फ्लुबेंडिअमाइड (३९.३५ एससी) ०.२५ मि. लि. किंवा ल्यूफेन्युरॉन (५.४ इसी) १.२ मि. लि.
- डॉ. पी. आर. झंवर (सहयोगी प्राध्यापक), ७५८८१५१२४४ - योगेश मात्रे, ७३८७५२१९५७ (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.